मालमत्तेच्या व्यवहारातून या कालावधीत चांगलाच फायदा होईळ. आर्थिक वादांचा निकाल तुमच्या बाजूने लागेल. दीर्घ काळापासून अपेक्षित असलेली पगारवाढ आता होईल. व्यवसायाच्या निमित्ताने केलेले प्रवास लाभदायक ठरतील. या काळाचा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे तुमच्याविषयी असलेला आदर वाढीस लागेल मग तुमची आय़ुष्याची गाडी कोणत्याही स्थानकावर का असे ना. आरामदायी वस्तुंवर तुम्ही खर्च कराल आणि नवीन वाहन खरेदीची शक्यता आहे.
आठवडा शनि त्यांच्या 2024 पारगमन राशीफल
माणसं तुमचा आदर्श ठेवतील आणि सल्ला घेण्यासाठी तुमच्याकडे येतील. सगळ्या समस्या सुटू लागतील. या सर्व काळ तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल आणि उर्जेचा राहील. हा काळ दैव, क्षमता आणि धाडसाचा असणार आहे. वरिष्ठाकंडून तुम्हाला ऐहिक लाभ मिळेल. त्यामुळे नवीन प्रयत्न करण्यासाठी आणि नवीन ठिकाणी प्रवास करण्यासाठी हा अत्यंत अनुकूल काळ आहे. तुम्ही अनेकांशी संबंध जोडाल आणि यातून चांगल्या प्रकारची देवाण-घेवाण होईल. हा कालावधी तुमच्या भावंडांसाठी आनंद आणि यश घेऊन येईल.
आठवडा राहु त्यांच्या 2024 पारगमन राशीफल
नशीबाची साथ आणि मानसिक स्थैर्य यामुळे तुमचे गृहस्थ जीवन सकारात्मक राहील. पत्नीच्या माध्यमातून लाभ होईल. प्रवास, उच्चशिक्षण, संवाद, नवीन उद्योगाची सुरुवात, व्यवसाय या दृष्टीने हे वर्ष अत्यंत अनुकूल आहे. या कालावधीत सगेसोयरे आणि नातेवाईक यांच्याशी वाद होतील आणि कदाचित शत्रुत्वही निर्माण होईल. व्यावसायिकदृष्ट्या तुम्हाला चांगले निष्कर्ष मिळतील. एकूणातच हा काळ अत्यंत अनुकूल असेल.
आठवडा केतु त्यांच्या 2024 पारगमन राशीफल
या काळाच्या सुरुवातीपासून तुमची कारकीर्दी काही स्फोटक किंवा दिशाहीन होईल. करिअरमध्ये नवे प्रकल्प किंवा मोठे बदल करणे टाळा. तुमचे मित्र आणि नातेवाईक यांच्याशी जुळवून घेणे कठीण होईल. अनिष्ट परिस्थिती उद्भवेल, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात वाद निर्माण होतील. जलद आर्थिक लाभासाठी अनैतिक काम करू नका. नोकरीच्या ठिकाणी समाधान लाभणार नाही. अपघाताची शक्यता आहे. अवघड परिस्थितीला आत्मविश्वासाने सामोरे जाण्याचा प्रयत्न करा. खोकला, श्वासोच्छवासाचे विकार किंवा संधिवाताचा त्रास होऊ शकतो.