हा तुमच्यासाठी कृती करण्याचा काळ आहे. विविध क्षेत्रातून अनपेक्षित भेटवस्तू आणि लाभ मिळेल. तुमच्या करिअरमध्ये प्रगती आणि सर्वांगीण समृद्धी लाभेल. तुमचे शत्रू तुमच्या मार्गात अडथळ्या होण्याचा विचारही करणार नाहीत आणि तुमच्याकडे इतर लोक आकर्षित होतील व तुमची प्रतिमाही उंचावेल. शासनकर्ते, वरिष्ठ आणि अधिकारी यांची तुमच्यावर मर्जी राहील. तुमचे आरोग्य निरोगी राहील. यंदा वाहनप्राप्तीचा योग आहे.
Feb 5, 2025 - Feb 23, 2025
हा तुमच्यासाठी आरामदायी कालावधी आहे. तुम्ही आत्मविश्वासपूर्ण असाल आणि दृष्टिकोनही सकारात्मक राहील. तुमचे कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील आणि तुमच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. पण तुमच्या भावाच्या प्रकृतीच्या कुरबुरींची शक्यता आहे. या काळात प्रवास संभवतो. कमी अंतराचा प्रवास फलदायी ठरेल आणि नशीब फळफळेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता. सामाजिक आणि कौटुंबिक जीवनाचा आनंद लुटाल. आरोग्य निरोगी राहील आणि शत्रुवर विजय मिळवाल.
Feb 23, 2025 - Mar 25, 2025
शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने हा कालावधी फार अनुकूल नाही. आरोग्याच्या तक्रारी आणि मानसिक तणाव संभवतात. तुमच्या कुटुंबियांसमोर आणि मित्रांसमोर तुमचे शत्रू तुमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यापासून शक्य तेवढे लांब राहण्याचा प्रयत्न करा. आरोग्याच्या तक्रारीची दाट शक्यता आहे, त्यामुळे त्याबाबत सावधानता बाळगा. तुमच्या जोडीदाच्या प्रकृती अस्वास्थ्याचीही शक्यता आहे.
Mar 25, 2025 - Apr 16, 2025
व्यावसायिक आघाडीवर फार उत्साहवर्धक काही घडत नसले तरी त्याचा फार मनस्ताप करून घेणं टाळून थोडा आराम करायला शिका. अचानक भावनेच्या आहारी जाऊन किंवा अपेक्षाभंगामुळे नोकरी सोडण्याची इच्छा दूर करण्याचा प्रयत्न करा. निष्काळजीपणा किंवा दुर्लक्ष केल्यामुळे काही अडचणींचा सामना किंवा अडचणीची परिस्थिती उद्भवू शकते. अपघातासारखे काही प्रसंग ओढवू शकतात आणि आरोग्याची काळजी घेणेही गरजेचे आहे. कौटुंबिक आयुष्यात ताण-तणावर निर्माण होतील आणि लैंगिक विकार होणार नाहीत, याची काळजी घ्या.
Apr 16, 2025 - Jun 09, 2025
हा तुमच्यासाठी फार अनुकूल कालावधी नाही. तुमचे शत्रू तुमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करतील. फायदा मिळवून न देणारे काम करावे लागेल. अचानक नुकसान संभवते. तुमची काळजी घ्या आणि अन्नातून होणाऱ्या विषबाधेमुळे पोटाचे विकार संभवतात. हा अनुकूल काळ नसल्यामुळे कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू नका. मित्र आणि नातेवाईकांशी लहान-सहान मुद्यांवरून वाद होतील. मोठ् निर्णय घेऊ नका. तुम्हाला एखाद्या अशा कामात गुंतावे लागेल, ज्याचा तुम्हाला काहीच फायदा होणार नाही.
Jun 09, 2025 - Jul 28, 2025
तुमच्या आरोग्याबाबत तुमचे सजग असणे, आरोग्याची काळजी घेणे आणि गरजा पुरवणे यामुळे तुमची उर्जा अधिक चांगल्या प्रकारे तुम्ही वापरू शकता, कदाचित एखाद्या मैदानी खेळात भाग घेणे उचित ठरेल. तुमच्या उर्जेमुळे तुम्हाला अनेकांचे सहकार्य मिळेल. तुमच्या आनंदात आणि यशात तुमच्या जोडीदाराचा सहभाग असेल. कामाच्या ठिकाणी तुम्ही नेतृत्व स्वीकारावे, यासाठी तुम्हाला पाचारण करण्यात येईल. तुम्हाला आदर-सन्मान मिळेल आणि तुम्ही प्रसिद्ध व्हाल.
Jul 28, 2025 - Sep 24, 2025
प्रवास करण्याच्या इच्छेमुळे तुम्ही काहीसे चंचल असाल. एका कोपऱ्यात बसून राहणे तुम्हाला आवडत नाही, त्यामुळे तुम्हाला थोडा त्रास होईल. या काळात तुमच्या करिअरमध्ये दबावाचे वातावरण राहील. नवीन प्रकल्प हाती घेऊ नका आणि धोका पत्करू नका. नवीन गुंतवणूक आणि नव्या आश्वासनांना आवर घाला. फायदा होण्याची शक्यता आहे परंतु, कामाच्या ठिकाणी होणारे काही बदल पथ्यावर पडतीलच असे नाही. सुविधांच्या दृष्टीने हा काळ फार अनुकूल नाही. धार्मिक आणि अध्यात्मिक कर्मामुळे तुम्हाला या त्रासातून बाहेर पडण्यास मदत होईल. नातेवाईकांमुळे दु:ख सहन करावे लागेल. अचानक होणारे अपघात वा नुकसान सहन करावे लागेल.
Sep 24, 2025 - Nov 15, 2025
प्रवासात तुम्ही तुमच्यासारख्या व्यक्तींना भेटाल आणि त्यांच्यासोबत खूप चांगला संवाद घडेल. तुमच्या व्यावसायिक आणि कौंटुबिक आयुष्याचा चांगल्या प्रकारे समतोल साधाल आणि दोन्ही ठिकाणी उत्तम प्रकारे जबाबदारी पार पाडाल. तुमच्या इच्छा खूप कष्टांनंतर पूर्ण होतील पण अखेर त्यातून तम्हाला समृद्धी, लोकप्रियता आणि चांगले उत्पन्न व लाभ मिळेल. जुन्या मित्रांशी भेट होईल. विरुद्ध लिंगी व्यक्तींचा सहवास लाभेल. वरिष्ठांकडून आणि प्रभावशाली व्यक्तींकडून सहकार्य मिळेल.
Nov 15, 2025 - Dec 06, 2025
वरिष्ठ आणि प्रभावशाली व्यक्तींकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. व्यावसायिक पातळीवर तुम्ही प्रगती कराल. कुटुंबियांकडून सहकार्य मिळेल. तुमच्यापासून दूर असणाऱ्या किंवा परदेशात असणाऱ्या व्यक्तींकडून सहकार्य मिळेल. तुमची कष्ट करण्याची तयारी असेल तर त्या कष्टाचे चीज होण्यासाठी हा अत्यंत अनुकूल काळ आहे. तुम्ही फार प्रयत्न न करताही तुम्हाला अनेक संधी मिळतील. सामाजिक वर्तुळात तुम्हाला आदर आणि सन्मान मिळेल. तुम्ही नवीन घराचे बांधकाम कराल आणि सगळ्या प्रकारचा आनंद लुटाल.
Dec 06, 2025 - Feb 05, 2026
तुमच्यावर आणि तुमच्या कार्यावर प्रकाश पडेल. ही अशी वेळ आहे की तुम्हाला तुमच्या कामाचे श्रेय मिळालेच पाहिजे. तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडाल आणि तुमचे पालक, भावंड आणि नातेवाईक यांच्याशी जवळीक साधाल. संवादातून तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकेल. हीच लय कायम ठेवा आणि क्षमतेवर विश्वास ठेवा, या वर्षात तुम्हाला एक वेगळीच ओळख मिळेल. दूरचा प्रवास फलदायी असेल. या कालावधीत तुम्ही उच्चभ्रू जीवन जगाल.