आहुती प्रसाद
Jan 2, 1958
12:00:00
Koduru
78 E 8
14 N 53
5.5
Dirty Data
खराब डेटा
तुम्ही अगदी सहज लग्न कराल. बरेचदा प्रेमापेक्षा मैत्रीला जास्त महत्त्व दिले जाते. तुम्ही फार प्रेमपत्र वगैरे लिहिणार नाही. तुमच्या संबंधांमध्ये जितका कमी रोमान्स येईल, तितके चांगले राहील. पण लग्नानंतर मात्र असे करणे उचित राहणार नाही. लग्नानंतर मात्र तुम्ही रोमान्स अगदी मनपासून कराल आणि काही वर्ष उलटून गेल्यावरही तुम्ही तसेच राहाल.
तुमची प्रकृती उत्तम आहे. तुमच्यात सळसळते चैतन्य आहे आणि तुम्ही व्यायाम करत राहिलात तर अगदी उतारवयापर्यंत ते तसेच राहील. पण यात काहीसा अतिरेक होऊ शकतो. तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त व्यायाम केलात तर तुमच्या श्वसनेंद्रियांवर परिणाम होईल आणि तुम्हाला फुफ्फुसाचा त्रास होऊ शकतो. वयाच्या पंचेचाळीशीनंतर तुम्हाला सायटिका किंवा संधिवाताचा त्रास होण्याची शक्यता आहे. याची कारणे शोधणे कठीण असेल, पण याची कारणेच शोधायची झाली तर रात्रीच्या हवेत खूप फिरल्यामुळे असे घडण्याची शक्यता आहे.
फावला वेळ जोमदारपणे घालवणे तुम्हाला आवडते आणि त्याचा तुम्ही सदुपयोग करता. तुमच्या उर्जेचा विचार करता फुटबॉल, टेनिस इत्यादी खेळ तुमच्यासाठी उत्तम राहतील आणि तुमचे कौशल्य त्यात उत्तम असेल. प्रौढ वयात तुम्हाला चालण्याचा व्यायाम जास्त आवडेल. पण चार मैल चालण्याऐवजी चौदा मैल चालण्याचा तुम्ही विचार कराल. सुट्टी घालविण्यासाठी समुद्रकिनारी बसणे आणि केवळ खाण्यापिण्यात वेळ घालवणे तुम्हाला मान्य नसते. दूरवर दिसणाऱ्या टेकड्या तुम्हाला साद घालतात आणि त्या जवळून कशा दिसतात हे पाहण्याची तुम्हाला हौस असेल.