नातेवाईकांशी सलोख्याचे संबंध ठेवा. दीर्घ आजाराची शक्यता असल्यामुळे आरोग्याची काळजी घ्या. तुमचे शत्रू तुम्हाला अपाय करण्याची एकही संधी सोडणार नाहीत, त्यामुळे त्यांच्यापासून चार हात लांब उभे राहा. कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्याच्या तक्रारींमुळे तुम्हाला मनस्ताप होईल. ऋण आणि कर्ज नियंत्रणात ठेवा जेणेकरून तुम्ही आर्थिक बाबतीत निश्चिंत राहाल. चोरी आणि भांडणांमुळे आर्थिक नुकसान संभवते. अधिकारी वर्गासोबत भांडण किंवा मतभेद संभवतात.
Jun 10, 2025 - Jul 01, 2025
तुमचे वरिष्ठांसोबत तुमचा सुसंवाद राहील आणि पुढील वाटचालीमध्ये तुम्हाला त्याचा फायदा होईल. या काळात तुमचा हुद्दा जाण्याची शक्यता आहे. तुमच्या मनात सध्या अनेक कल्पक आणि नवनवीन कल्पना येत असतील, पण त्यांच्या चांगल्या वाईट बाजू पाहिल्याशिवाय त्यांची अंमलबजावणी करू नका. तुम्ही तुमच्या घराकडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. प्रवासाचा योग आहे आणि प्रवास लाभकारक ठरेल. तुमच्या कुटुंबियांच्या प्रकृतीच्या तक्रारी असतील, त्यामुळे त्यांच्या आणि तुमच्या स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्या.
Jul 01, 2025 - Aug 31, 2025
जे व्यक्तीगत संबंध प्रस्थापित करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत होतात, त्यात तुमच्या घरच्या आणि कार्य़ालयीन कामामुळे फारसे यश येणार नाही. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि तुमची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करा. विषयासक्त विचार तुम्हाला खच्ची करतात. त्याचबरोबर त्यामुळे तुमची मानहानी होण्याचीही शक्यता आहे. विरुद्ध लिंगी व्यक्तींशी असलेले संबंध बिघडण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या कुरबुरींमुळे मनस्ताप होईल. अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे. एकूणातच हा फार अनुकूल काळ नाही. शारीरिकदृष्ट्या कमकुवत व उद्विग्न वाटेल.
Aug 31, 2025 - Sep 19, 2025
हा तुमच्यासाठी कठीण समय आहे. नशीबाचे दान तुमच्या विरुद्ध पडत आहे. उद्योगातील भागिदारांकडून अडथळे निर्माण होण्याची शक्यता. व्यवसायाच्या निमित्ताने केलेले प्रवास फारसे लाभदायी टरणार नाहीत. स्थानिक पातळीवर रागावर संयम ठेवा आणि कोणत्याही अडचणीचा प्रसंग उद्भवणार नाही, याची काळजी घ्या. जोडीदाराच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे चिंता वाढेल. तुम्हालाही शारीरिक व मानसिक तणाव संभवतो. डोकेदुखी, डोळे, पाय आणि खांदेदुखी होण्याची शक्यता.
Sep 19, 2025 - Oct 19, 2025
तुमच्याकडे भरपूर संधी चालून येणार असल्या तरी त्यांचा लाभ उठवता येणार नाही. तुमच्या किंवा तुमच्या पालकांच्या आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे तुमची स्वत:ची आणि तुमच्या पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या. दूरचे प्रवास संभवतात, पण ते टाळलेलेच बरे कारण त्यातून कोणताही फायदा संभवत नाही. हा तुमच्यासाठी मिश्र घटनांचा कालवधी आहे. लोकांशी आणि तुमच्या सहकाऱ्यांशी भांडणाची शक्यता. सर्दी किंवा तापासारखे विकार संभवतात. कोणत्याही निश्चित कारणाशिवाय मानसिक तणाव राहील.
Oct 19, 2025 - Nov 09, 2025
परीक्षेत यश, बढती, कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठा उंचावणे या काळात घडेल. कुटुंबाकडून मिळणाऱ्या सहकार्य़ात वाढ होईल. तुमच्यापासून लांब राहणाऱ्या आणि परदेशी सहकाऱ्यांकडून मदत मिळेल. तुम्हाला नवीन काम मिळेल आणि ते अत्यंत फायदेशीर असेल. कोणतीही विपरीत परिस्थिती उद्भवली तरी त्याला तुम्ही आत्मविश्वासाने सामोरे जाल.
Nov 09, 2025 - Jan 03, 2026
या काळाच्या सुरुवातीपासून तुमची कारकीर्दी काही स्फोटक किंवा दिशाहीन होईल. करिअरमध्ये नवे प्रकल्प किंवा मोठे बदल करणे टाळा. तुमचे मित्र आणि नातेवाईक यांच्याशी जुळवून घेणे कठीण होईल. अनिष्ट परिस्थिती उद्भवेल, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात वाद निर्माण होतील. जलद आर्थिक लाभासाठी अनैतिक काम करू नका. नोकरीच्या ठिकाणी समाधान लाभणार नाही. अपघाताची शक्यता आहे. अवघड परिस्थितीला आत्मविश्वासाने सामोरे जाण्याचा प्रयत्न करा. खोकला, श्वासोच्छवासाचे विकार किंवा संधिवाताचा त्रास होऊ शकतो.
Jan 03, 2026 - Feb 21, 2026
तुम्ही स्वत:ची काळजी घ्या आणि स्वत:वर जास्त दबाव येऊ देऊ नका, जेणेकरून तुम्ही दीर्घकाळपर्यंत व्यवस्थित काम करू शकाल. काही अपेक्षाभंगाचे प्रसंग घडतील. तुमचे धाडस आणि अंदाज हे तुमचे बलाढ्य गुण आहेत, पण त्यामुळे तुम्हाला थोडा अहंकार चढू शकेल. मोठी गुंतवणूक करू नका, कारण तुमच्या अपेक्षेप्रमाणे त्यातून फायदा होणार नाही. तुमचे मित्र आणि सहकारी यांच्याकडून तुम्हाला योग्य सहकार्य मिळणार नाही. कुटुंबातील व्यक्तींचा दृष्टिकोन वेगळा असू शकेल. आरोग्याच्या कुरबुरी सुरू राहतील आणि तुम्हाला मळमळ, ताप, कानाची दुखणी आणि उलट्या यासारखे विकार संभवतात.
Feb 21, 2026 - Apr 20, 2026
नोकरीच्या संदर्भातली कामे फार आशादायक नसतील आणि समाधानकारकही नसतील. कामाच्या ठिकाणी अशांत वातावरण असेल आणि फार दबाव असेल. धोका पत्करण्याच्या वृत्तीला पूर्ण आवर घालावा. कोणतेही मोठे काम करण्याचे टाळा. एक व्यावसायिक म्हणून काम करत असाल तर या वर्षी तुम्हाला अनेक अडथळ्यांचा आणि आव्हानांचा सामना करावा लागेल. अस्थैर्य आणि गोंधळाचे वातावरण असेल. तुमच्या आकाश भंडारी ्तेष्टांकडून पूर्ण सहकार्य मिळणार नाही. तुमच्याविरोधात कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे. तुमच्या जवळची माणसे तुम्हाला दु:ख देतील. अपत्यांशी संबंधित कामांमध्ये समस्या निर्माण होतील. या काळात शांतच राहा आणि बदल टाळा.
Apr 20, 2026 - Jun 10, 2026
असे असले तरी तुम्ही तुमच्या नशीबावर फार विसंबून राहू नका. तुम्ही तुमचा पैसा बरेच ठिकाणी अडकवल्यामुळे रोख रकमेची कमतरता भासू शकेल. आरोग्याच्या तक्रारी तुम्हाला अस्वस्थ करतील. विशेषत: कफ, निरुत्साह, डोळ्यांचे विकार आणि विषाणूंमुळे होणाऱ्या तापाने तुम्ही त्रासलेले असाल. नातेवाईक, मित्र आणि सहकाऱ्यांशी वर्तणूक करताना सावधानता बाळगा. प्रवास फलदायी होणारा नसल्यानेच तो टाळावा. लहानश्या मुद्दावरून वाद होतील. निष्काळजीपणा आणि दुर्लक्ष यामुळे या काळात अडचणी निर्माण होतील. प्रवास टाळावा.