शत्रू किंवा विरोधक तुम्हाला सामोरे जाण्याचा विचारही करणार नाहीत. कायदेशीर प्रकरणे तुमच्या बाजूने असतील. आर्थिक बाबतीत तुम्हाला नाव, लोकप्रितयता, फायदा आणि यश मिळेल. भाऊ आणि नातेवाईकांकडून सहकार्य मिळेल. तुम्ही तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भेट द्याल आणि लोकांकडून मदत घ्याल. तुम्ही केलेल्या कष्टांना आणि प्रयत्नांना यश मिळेल.
Jul 1, 2024 - Jul 31, 2024
तुमच्या कारकिर्दीमध्ये एक पुढचे पाऊल टाकण्यासाठी आणि मोठी झेप घेण्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे. भागिदार किंवा सहकाऱ्यांकडून तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराकडून तुम्हाला आनंदाचे क्षण मिळतील. प्रेम आणि रोमान्स या दोन्ही प्रकारात सुख लाभेल. व्यवहार आणि परदेशी प्रवासातून लाभ होईळ. आरोग्याच्या तक्रारीमुळे मन:शांती ढळेल. रोजच्या जीवनात स्वयंशिस्त, स्वयंनियंत्रण अंगी बाणवणे तुम्हाला फायदेशीर ठरेल. ताप आणि संधीवातापासून सावध राहा आणि काळजी घ्या. या काळात तुमच्या जोडीदाराची प्रकृती अस्वस्थ होण्याची शक्यता आहे.
Jul 31, 2024 - Aug 22, 2024
या वर्षी केवळ एक घटक टाळा तो म्हणजे अति-आत्मविश्वास. घरावर आणि कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यविषयक तक्रांरींवर जरा अधिक खर्च होईल. कौटुंबिक नाती जपण्याकडे कल असू दे. तुमचे कच्चे दुवे शोधून त्यांचा गैरवापर करण्याचा प्रयत्न होईल, त्यामुळे तुम्हाला मनस्ताप होण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदारामुळे तुमच्या आयुष्यात तणाव निर्माण होईल किंवा तुमच्या प्रेमभावनांना ठेच पोहोचण्याची शक्यता आहे. तुमचा प्रवास व्यर्थ जाईल आणि त्याने नुकसान होण्यीचच शक्यता आहे.
Aug 22, 2024 - Oct 16, 2024
फायदेशीर व्यवहार कराल. कर्जासाठी अर्ज केला असेल तर कर्ज मंजूर होईल. आरोग्याच्या थोड्याशा कुरबुरी राहतील. व्यावसायिक आणि खासगी आयुष्यात समतोल साधाल आणि आयुष्याच्या या दोन्ही महत्त्वाच्या अंगांकडे तुम्ही उत्तम प्रकारे लक्ष पुरवाल. खूप कष्टांनंतर तुमच्या इच्छा पूर्ण होतील, आणि अखेर तुम्हाला समृद्धी, उत्पन्न आणि लाभ मिळेल. स्पर्धेत विजेते ठराल आणि मुलाखतींमध्ये यशस्वी व्हाल.
Oct 16, 2024 - Dec 03, 2024
तुम्ही स्वत:ची काळजी घ्या आणि स्वत:वर जास्त दबाव येऊ देऊ नका, जेणेकरून तुम्ही दीर्घकाळपर्यंत व्यवस्थित काम करू शकाल. काही अपेक्षाभंगाचे प्रसंग घडतील. तुमचे धाडस आणि अंदाज हे तुमचे बलाढ्य गुण आहेत, पण त्यामुळे तुम्हाला थोडा अहंकार चढू शकेल. मोठी गुंतवणूक करू नका, कारण तुमच्या अपेक्षेप्रमाणे त्यातून फायदा होणार नाही. तुमचे मित्र आणि सहकारी यांच्याकडून तुम्हाला योग्य सहकार्य मिळणार नाही. कुटुंबातील व्यक्तींचा दृष्टिकोन वेगळा असू शकेल. आरोग्याच्या कुरबुरी सुरू राहतील आणि तुम्हाला मळमळ, ताप, कानाची दुखणी आणि उलट्या यासारखे विकार संभवतात.
Dec 03, 2024 - Jan 30, 2025
नोकरीच्या संदर्भातली कामे फार आशादायक नसतील आणि समाधानकारकही नसतील. कामाच्या ठिकाणी अशांत वातावरण असेल आणि फार दबाव असेल. धोका पत्करण्याच्या वृत्तीला पूर्ण आवर घालावा. कोणतेही मोठे काम करण्याचे टाळा. एक व्यावसायिक म्हणून काम करत असाल तर या वर्षी तुम्हाला अनेक अडथळ्यांचा आणि आव्हानांचा सामना करावा लागेल. अस्थैर्य आणि गोंधळाचे वातावरण असेल. तुमच्या अखिलेश यादव ्तेष्टांकडून पूर्ण सहकार्य मिळणार नाही. तुमच्याविरोधात कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे. तुमच्या जवळची माणसे तुम्हाला दु:ख देतील. अपत्यांशी संबंधित कामांमध्ये समस्या निर्माण होतील. या काळात शांतच राहा आणि बदल टाळा.
Jan 30, 2025 - Mar 23, 2025
तुम्ही नेहमीच सकारात्मक दृष्टीकोन बाळगून असता आणि या वर्षातील घटना तुमच्या सकारात्मक दृष्टिकोनात भरच घालतील. तुमच्या राशीला उत्तम कालखंडात तुम्ही गुंतवणूक केलीत तर तुम्हाला चांगला फायदा होऊ शकेल. तुमच्या जवळच्या व्यक्ती आणि सहकाऱ्यांकडून सहकार्य आणि आनंद मिळेल. विरोधकांवर मात करू शकाल आणि लग्न किंवा रोमँटिक प्रसंगांमुळे देण्यात येणारी पार्टी असे काही प्रसंग घडतील. कौटुंबिक आयुष्य समाधानी राहील.
Mar 23, 2025 - Apr 13, 2025
हा काळ तुमच्यासाठी फार अनुकूल नाही. तुमच्याकडून अनावश्यक खर्च होईल पण तुम्हाला त्यावर आवर घालावा लागेल. कोणत्याही प्रकारचा सट्टा खेळू नका. कामाचा दबाव खूप असल्याने प्रचंड कष्ट करावे लागतील. उद्योगात कोणताही धोका पत्करू नका कारण हा काळ तुमच्यासाठी फार अनुकूल नाही. तुमचे शत्रू तुमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करतील. कौटुंबिक वातावरणही फार एकोप्याचे नसेल. या मनस्तापाचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होईल. मंत्र आणि अध्यात्मिक कार्याकडे तुमचा कल राहील.
Apr 13, 2025 - Jun 13, 2025
एखाद्या तीर्थक्षेत्राला भेट द्याल. तुमचं वागणं रोमँटिक आणि प्रभावशाली असेल आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या ओळखीच्या माणसांशी मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित करण्यास आणि ज्यांना तुम्ही ओळखत नाही, अशांशी संपर्क साधण्यास मदत होईल. तुमची थोडीफार इच्छापूर्ती होईल. म्हणजेच एखाद्या व्यवहारातून तुम्हाला आर्थिक लाभ होईल अथवा कामच्या ठिकाणी बढती मिळेल. वाहनखरेदी अथवा मालमत्तेची खरेदी कराल. एकूणच हा काळ अत्यंत अनुकूल असा आहे.
Jun 13, 2025 - Jul 01, 2025
हा कालावधी मिश्र घटनांचा राहील. तुम्ही काही प्रभावशाली व्यक्तिमत्वांना आकर्षित करू शकाल, आणि त्या व्यक्ती तुमच्या योजना आणि प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी सहाय्य करण्यास तयार असतील. तुमच्या कष्टांचे चीज होण्यासाठी तुम्हाला फार काळ वाट पाहावी लागणार नाही. तुमच्या भावंडांमुळे काही समस्या किंवा तणावाचे प्रसंग उद्भवतील. तुमच्या पालकांच्या आरोग्याच्या तक्रारी सुरू होण्याची शक्यता असल्यामुळे त्यांच्याकडे अधिक लक्ष पुरविण्याची आवश्यकता आहे. काही धार्मिक कार्य होण्याची शक्यता. आर्थिक बाबींचा विचार करता हे वर्ष लाभदायी असले.