तुमच्या आर्थिक आणि सामाजिक स्थानाच्या बाबतीत चढ-उतार संभवतात. आर्थिक आणि मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाजूंची नीट काळजी घ्या. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा कारण जवळचे सहकारी आणि नातेवाईक यांच्याशी वाद होण्याची शक्यता आहे. तुमच्या आऱोग्याकडेही लक्ष द्या कारण त्या बाबातीत आजारपण संभवते.
Sep 12, 2024 - Oct 04, 2024
या कालावधीत शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या धाडसी असाल. तुमच्या नातेवाईकांसाठी विशेषत: जोडीदारांसाठी हा अनुकूल कालावधी आहे. तुमच्या करिअरमध्ये तुम्ही प्रयत्न करू शकता कारण यश निश्चित आहे. भौतिक वस्तुंचा तुमच्या आयुष्यात समावेश होईल. तुमचे विरोधक यात अडथळे निर्माण करू शकणार नाहीत. या काळात तुमच्या इच्छा पूर्ण होतील. तुमचा विजय निश्चित आहे.
Oct 04, 2024 - Nov 27, 2024
या काळात जागा आणि नोकरी दोन्ही बदलण्याची शक्यता आहे. मानसिक ताणामुळे तुम्हाला त्रास सहन करावा लागेल. तुमची मन:शांती ढळेल. कुटुंबातील सदस्यांची वागणूकही थोडीशी वेगळी असेल. मोठी गुंतवणूक करू नका, कारण ती फार लाभदायी असणार नाही. तुमचे मित्र आणि सहकारी त्यांची आश्वासने पूर्ण करणार नाहीत. धूर्त मित्रांपासून सावध राहा कारण कदाचित त्यांच्यापासून तुमच्या प्रतिमेला धक्का पाहोचू शकतो. कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या. त्यामुळे प्रवास करून का, शारीरिक आजार होण्याची शक्यता आहे.
Nov 27, 2024 - Jan 15, 2025
तुम्ही तुमच्यात असलेल्या संगीताच्या गुणांचा आनंद घेऊ शकाल. त्याचप्रमाणे एखादी नवी सांगीतिक रचना सुचण्याचीही शक्यता आहे. कामाशी आणि समाजाशी संबंधित तुमची तत्वे व्यक्त करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुमच्या कल्पना प्रत्यक्षात उतरवाल तेव्हा त्यातून आर्थिक लाभ होईल. तुमच्याकडे आर्थिक आवक निश्चितच वाढेल आणि त्यामुळे व्यक्तिगत विश्वास, स्वप्न आणि तत्वे यावर निश्चितच प्रभाव पडेल. तुमचे शत्रू तुमच्या वरचढ होऊ शकणार नाहीत. एकूणातच वातावरण आनंदी राहील. तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये वाढ होईल.
Jan 15, 2025 - Mar 14, 2025
या काळात शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या तुम्ही धाडसी निर्णय घ्याल. तुमच्या नातेवाईकांसाठी हा चांगला काळ आहे. तुमच्या करिअरमध्ये नवीन प्रयत्न करा. यश निश्चित आहे. काही भौतिक सुखाच्या वस्तू विकत घ्याल. तुम्ही जमीन आणि यंत्रांची खरेदी कराल. उद्योग आणि व्यवसायातून फायदा मिळेल. तुमचे शत्रूंचे तुमच्यासमोर काही चालणार नाही. दूरच्या प्रदेशातील लोकांच्या ओळखी होतील. प्रेमप्रकरणाचा विचार करता हा कालावधी अनुकूल आहे. कुटुंबियांकडून पूर्ण सहकार्य मिळेल.
Mar 14, 2025 - May 05, 2025
तुमच्या आजुबाजूच्या माणसांना तुमचे मूल्य कळेल आणि त्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल, तसेच तुम्ही सतत तुमच्या क्षमतेच्या 100 टक्के काम करता हा दुसऱ्यांना प्रेरीत करणारा घटक असेल. प्रवास करण्यास हा अत्यंत अनुकूल काळ आहे. तुमच्याकडे येणाऱ्या सुखाचा उपभोग घ्या. अखेर तुम्ही यशाची फळें चाखू शकता आणि तुमच्या कष्टाचे चीज होण्याचा हा काळ आहे. तुम्ही प्रसिद्ध व्यक्तींच्या सहवासात याल. तुमची अपत्याची इच्छा पूर्ण होईल. तुमच्या कल्पकतेची प्रशंसा होईल.
May 05, 2025 - May 26, 2025
खासगी आणि व्यावसायिक आयुष्यातील भागिदाऱ्या फलदायी ठरतील. महत्त्वाचे म्हणजे इतकी वर्षे तुम्ही ज्या आयुष्य बदलून टाकणाऱ्या बदलाची वाट पाहात होतात, तो बदल आता घडणार आहे. संवाद आणि वाटाघाटी यामुळे तुम्हाला नव्या संधी प्राप्त होतील. तुम्ही लोकांना मदत कराल. कामधंद्याच्या निमित्ताने तुम्ही प्रवास कराल आणि हे प्रवास तुमच्यासाठी फलदायी ठरतील. नोकरी करत असाल तर कामच्या ठिकाणी असलेल्या परिस्थितीत सुधारणा होईल.
May 26, 2025 - Jul 26, 2025
जे व्यक्तीगत संबंध प्रस्थापित करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत होतात, त्यात तुमच्या घरच्या आणि कार्य़ालयीन कामामुळे फारसे यश येणार नाही. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि तुमची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करा. विषयासक्त विचार तुम्हाला खच्ची करतात. त्याचबरोबर त्यामुळे तुमची मानहानी होण्याचीही शक्यता आहे. विरुद्ध लिंगी व्यक्तींशी असलेले संबंध बिघडण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या कुरबुरींमुळे मनस्ताप होईल. अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे. एकूणातच हा फार अनुकूल काळ नाही. शारीरिकदृष्ट्या कमकुवत व उद्विग्न वाटेल.
Jul 26, 2025 - Aug 13, 2025
तुम्ही या काळात जोशपूर्ण असाल. तुम्ही काहीसे धाडसी आणि आक्रमक असाल. मानसिक तोल ढळण्याची शक्यता आणि तरतमभाव ठेवणे कठीण जाईल. तुमची लोकप्रियता कमी होईल आणि भांडणामुळे अडचणीत येण्याची शक्यता. प्रेमासाठी हा कालावधी प्रतिकूल आहे. जोडीदार आणि पाल्यांचे आरोग्य सांभाळा. या काळात अपत्यप्राप्ती होण्याची शक्यता आणि वरिष्ठांकडून लाभ संभवतो.
Aug 13, 2025 - Sep 12, 2025
कुटुंबात एकोपा आणि समजुतदारपणा वाढेल. तुमचे ज्ञान वाढविण्यासाठी, तुमच्या सहकाऱ्यांकडून शिकण्यासाठी हा अनुकूल कालावधी आहे. मित्र आणि अनोळखी व्यक्तींशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध लाभकारक ठरतील. जमिनीच्या व्यवहारातून फायदा होईल. या काळात तुम्ही चांगल्या कार्यासाठी दानधर्म कराल. तुमच्या मुलांनाही यश मिळेल आणि तुमच्या आयुष्यात आनंद निर्माण होईल. एक सुखासीन आयुष्य तुमची वाट पाहत आहे.