अमित सिंग
Jun 21, 1981
12:0:0
Bidar
77 E 35
17 N 56
5.5
Unknown
खराब डेटा
तुम्ही तुमच्या जोडीदाराची निवड काळजीपूर्वक कराल. अशा वेळी चूक केली तर त्याचे परिणाम काय होतील ते तुम्हाला चांगलेच माहित असल्यामुळे तुम्ही काळजी घ्याल. यामुळे तुमचे लग्न काहीसे उशीरा होईल. पण एकदा तुमचा निर्णय झाला की, तुम्ही एक उत्तम जोडीदार असाल.
तुमची प्रकृती उत्तम आहे. तुमच्यात सळसळते चैतन्य आहे आणि तुम्ही व्यायाम करत राहिलात तर अगदी उतारवयापर्यंत ते तसेच राहील. पण यात काहीसा अतिरेक होऊ शकतो. तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त व्यायाम केलात तर तुमच्या श्वसनेंद्रियांवर परिणाम होईल आणि तुम्हाला फुफ्फुसाचा त्रास होऊ शकतो. वयाच्या पंचेचाळीशीनंतर तुम्हाला सायटिका किंवा संधिवाताचा त्रास होण्याची शक्यता आहे. याची कारणे शोधणे कठीण असेल, पण याची कारणेच शोधायची झाली तर रात्रीच्या हवेत खूप फिरल्यामुळे असे घडण्याची शक्यता आहे.
तुम्ही अनेक छंद जोपासाल. तुम्ही त्या छंदांमध्ये व्यस्त राहाल. अचानक तुमचा संयम सुटेल आणि तो छंदही सोडून द्याल. दुसरा छंद धराल आणि त्याबाबतही असेच होईल. तुम्ही तुमचे आयुष्य अशाच प्रकारे जगाल. एकूणातच हे छंद तुम्हाला भरपूर आनंद देतील. तुम्ही त्यातून भरपूर शिकाल.