अवनीत कौर
Oct 13, 2001
12:00:00
Jalandhar *
75 E 34
31 N 19
5.5
Dirty Data
खराब डेटा
तुम्ही तुमच्या जोडीदाराची निवड काळजीपूर्वक कराल. अशा वेळी चूक केली तर त्याचे परिणाम काय होतील ते तुम्हाला चांगलेच माहित असल्यामुळे तुम्ही काळजी घ्याल. यामुळे तुमचे लग्न काहीसे उशीरा होईल. पण एकदा तुमचा निर्णय झाला की, तुम्ही एक उत्तम जोडीदार असाल.
तुमच्या प्रकृतीची काळजी करण्याची तशी आवश्यकता नाही, पण त्याकडे अगदी दुर्लक्षही करून चालणा नाही. अतिउष्ण किंवा अतिथंड वातावरण शक्यतो टाळा. विशेषतः अतिउष्ण. हे दोन्हीही घटक तुमच्यासाठी चांगले नाहीत. तुम्ही थंड प्रदेशातून प्रवास करणार असाल तर सनस्ट्रोक होणार नाही याची काळजी घ्या आणि तुमच्या शरीराचे तापमान वाढेल असे काहीही करू नका. उतारवयात तुमच्या शरीराला बधिरता येणार नाही याकडे लक्ष पुरविण्याची गरज आहे. तुम्ही भरपूर झोप घ्या आणि जागरण टाळा. हे अत्यावश्यक आहे कारण जेव्हा तुम्ही उठता तेव्हा तुम्ही अतिक्रियाशील असता आणि स्थिर कधीच नसता. त्यामुळे तुमच्यातील उर्जा लगेचच वापरली जाते. ही खर्च झालेली उर्जा परत मिळवायची असेल तर भरपूर झोप हाच उपाय आहे.
तुम्हाला आयष्याची मजा घेणे आवडते आणि कामामुळे तुम्हाला त्या आनंदावर विरजण घालावे लागले तर तुम्हाला चीड येते. जास्तीत जास्त वेळ मोकळ्या हवेत घालवता यावा यासकडे तुमचे लक्ष असते आणि अर्थात हा तुमचा एक चांगला गुण आहे. ज्या खेळांमध्ये फार श्रम करावे लागतात, असे खेळ तुम्हाला आवडत नाहीत. पण चालणे, वल्हवणे, मासेमारी आणि निसर्गभ्रमण करणे या अॅक्टिव्हिटीज तुम्हाला आवडतात.