तुमच्या पत्नीच्या आऱोग्याच्या तक्रारीमुळे तुम्हाला त्रास भोगावा लागेल. तुमचे सहकारी आणि वरिष्ठ यांच्याशी जुळवून घेणे तुम्हाला कठीण जाईल. अपत्यामुळेही तुमच्या आयुष्यात समस्या उभ्या राहतील. इतर बाबींमध्येही अडचणी निर्माण होतील. प्रेमसंबंधांमध्ये किंवा वैवाहिक जीवनात लहान-सहान भांडणे, गैरसमज, वाद-विवाद टाळावेत. जोडीदारासमवेत किंवा नातेवाईकांशी विवाद होतील. या काळात मानसिक संतुलन राखण्याची गरज आहे, कारण अनैतिक कामे करण्याची इच्छा होईल.
Feb 4, 2024 - Feb 22, 2024
प्रकृती नाजूक असल्यामुळे शारीरिक थकवा येणारे काम करू शकणार नाही. तुमच्या हातून काही अविवेकी काम होण्याची शक्यता. तुम्ही शेती करत असाल तर आर्थिक नुकसान संभवते. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्रास होण्याची शक्यता. आईच्या आजारपणामुळे चिंताग्रस्त राहाल. राहत्या घरी तुम्हाला नको असलेला बदल संभवतो. निष्काळजीपणे वाहन चालवू नका.
Feb 22, 2024 - Mar 23, 2024
तुमच्याकडे भरपूर संधी चालून येणार असल्या तरी त्यांचा लाभ उठवता येणार नाही. तुमच्या किंवा तुमच्या पालकांच्या आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे तुमची स्वत:ची आणि तुमच्या पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या. दूरचे प्रवास संभवतात, पण ते टाळलेलेच बरे कारण त्यातून कोणताही फायदा संभवत नाही. हा तुमच्यासाठी मिश्र घटनांचा कालवधी आहे. लोकांशी आणि तुमच्या सहकाऱ्यांशी भांडणाची शक्यता. सर्दी किंवा तापासारखे विकार संभवतात. कोणत्याही निश्चित कारणाशिवाय मानसिक तणाव राहील.
Mar 23, 2024 - Apr 13, 2024
या कालावधीत शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या धाडसी असाल. तुमच्या नातेवाईकांसाठी विशेषत: जोडीदारांसाठी हा अनुकूल कालावधी आहे. तुमच्या करिअरमध्ये तुम्ही प्रयत्न करू शकता कारण यश निश्चित आहे. भौतिक वस्तुंचा तुमच्या आयुष्यात समावेश होईल. तुमचे विरोधक यात अडथळे निर्माण करू शकणार नाहीत. या काळात तुमच्या इच्छा पूर्ण होतील. तुमचा विजय निश्चित आहे.
Apr 13, 2024 - Jun 07, 2024
फायदेशीर व्यवहार कराल. कर्जासाठी अर्ज केला असेल तर कर्ज मंजूर होईल. आरोग्याच्या थोड्याशा कुरबुरी राहतील. व्यावसायिक आणि खासगी आयुष्यात समतोल साधाल आणि आयुष्याच्या या दोन्ही महत्त्वाच्या अंगांकडे तुम्ही उत्तम प्रकारे लक्ष पुरवाल. खूप कष्टांनंतर तुमच्या इच्छा पूर्ण होतील, आणि अखेर तुम्हाला समृद्धी, उत्पन्न आणि लाभ मिळेल. स्पर्धेत विजेते ठराल आणि मुलाखतींमध्ये यशस्वी व्हाल.
Jun 07, 2024 - Jul 26, 2024
तुमच्या आरोग्याबाबत तुमचे सजग असणे, आरोग्याची काळजी घेणे आणि गरजा पुरवणे यामुळे तुमची उर्जा अधिक चांगल्या प्रकारे तुम्ही वापरू शकता, कदाचित एखाद्या मैदानी खेळात भाग घेणे उचित ठरेल. तुमच्या उर्जेमुळे तुम्हाला अनेकांचे सहकार्य मिळेल. तुमच्या आनंदात आणि यशात तुमच्या जोडीदाराचा सहभाग असेल. कामाच्या ठिकाणी तुम्ही नेतृत्व स्वीकारावे, यासाठी तुम्हाला पाचारण करण्यात येईल. तुम्हाला आदर-सन्मान मिळेल आणि तुम्ही प्रसिद्ध व्हाल.
Jul 26, 2024 - Sep 22, 2024
नोकरीच्या संदर्भातली कामे फार आशादायक नसतील आणि समाधानकारकही नसतील. कामाच्या ठिकाणी अशांत वातावरण असेल आणि फार दबाव असेल. धोका पत्करण्याच्या वृत्तीला पूर्ण आवर घालावा. कोणतेही मोठे काम करण्याचे टाळा. एक व्यावसायिक म्हणून काम करत असाल तर या वर्षी तुम्हाला अनेक अडथळ्यांचा आणि आव्हानांचा सामना करावा लागेल. अस्थैर्य आणि गोंधळाचे वातावरण असेल. तुमच्या अजिझ कुरेशी ्तेष्टांकडून पूर्ण सहकार्य मिळणार नाही. तुमच्याविरोधात कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे. तुमच्या जवळची माणसे तुम्हाला दु:ख देतील. अपत्यांशी संबंधित कामांमध्ये समस्या निर्माण होतील. या काळात शांतच राहा आणि बदल टाळा.
Sep 22, 2024 - Nov 12, 2024
मालमत्तेच्या व्यवहारातून या कालावधीत चांगलाच फायदा होईळ. आर्थिक वादांचा निकाल तुमच्या बाजूने लागेल. दीर्घ काळापासून अपेक्षित असलेली पगारवाढ आता होईल. व्यवसायाच्या निमित्ताने केलेले प्रवास लाभदायक ठरतील. या काळाचा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे तुमच्याविषयी असलेला आदर वाढीस लागेल मग तुमची आय़ुष्याची गाडी कोणत्याही स्थानकावर का असे ना. आरामदायी वस्तुंवर तुम्ही खर्च कराल आणि नवीन वाहन खरेदीची शक्यता आहे.
Nov 12, 2024 - Dec 04, 2024
हा काळ तुमच्यासाठी फार अनुकूल नाही. तुमच्याकडून अनावश्यक खर्च होईल पण तुम्हाला त्यावर आवर घालावा लागेल. कोणत्याही प्रकारचा सट्टा खेळू नका. कामाचा दबाव खूप असल्याने प्रचंड कष्ट करावे लागतील. उद्योगात कोणताही धोका पत्करू नका कारण हा काळ तुमच्यासाठी फार अनुकूल नाही. तुमचे शत्रू तुमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करतील. कौटुंबिक वातावरणही फार एकोप्याचे नसेल. या मनस्तापाचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होईल. मंत्र आणि अध्यात्मिक कार्याकडे तुमचा कल राहील.
Dec 04, 2024 - Feb 03, 2025
माणसं तुमचा आदर्श ठेवतील आणि सल्ला घेण्यासाठी तुमच्याकडे येतील. सगळ्या समस्या सुटू लागतील. या सर्व काळ तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल आणि उर्जेचा राहील. हा काळ दैव, क्षमता आणि धाडसाचा असणार आहे. वरिष्ठाकंडून तुम्हाला ऐहिक लाभ मिळेल. त्यामुळे नवीन प्रयत्न करण्यासाठी आणि नवीन ठिकाणी प्रवास करण्यासाठी हा अत्यंत अनुकूल काळ आहे. तुम्ही अनेकांशी संबंध जोडाल आणि यातून चांगल्या प्रकारची देवाण-घेवाण होईल. हा कालावधी तुमच्या भावंडांसाठी आनंद आणि यश घेऊन येईल.