सुरुवातीपासूनच तुम्हाला मोठ्या प्रमाणावर लाभ आणि संपत्ती मिळे. सट्टा, लॉटरी किंवा शेअर्समधून हा फायदा होईल. तुमच्या सगळ्या व्यवहारांसाठी मित्र आणि शुभचिंतकांची मदत आणि सहकार्य मिळे. उद्योगात केलेल्या व्यवहारातून तुम्ही चांगला आर्थिक नफा कमवाल. तुम्हाला हुद्दा आणि प्रतिष्ठा प्राप्त होईल. तुम्हाला लोकांकडून आदर मिळेल आणि या काळात तुम्ही रुचकल जेवणाचा आस्वाद घ्याल.
Aug 22, 2024 - Oct 21, 2024
माणसं तुमचा आदर्श ठेवतील आणि सल्ला घेण्यासाठी तुमच्याकडे येतील. सगळ्या समस्या सुटू लागतील. या सर्व काळ तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल आणि उर्जेचा राहील. हा काळ दैव, क्षमता आणि धाडसाचा असणार आहे. वरिष्ठाकंडून तुम्हाला ऐहिक लाभ मिळेल. त्यामुळे नवीन प्रयत्न करण्यासाठी आणि नवीन ठिकाणी प्रवास करण्यासाठी हा अत्यंत अनुकूल काळ आहे. तुम्ही अनेकांशी संबंध जोडाल आणि यातून चांगल्या प्रकारची देवाण-घेवाण होईल. हा कालावधी तुमच्या भावंडांसाठी आनंद आणि यश घेऊन येईल.
Oct 21, 2024 - Nov 09, 2024
हा तुमच्यासाठी आरामदायी कालावधी आहे. तुम्ही आत्मविश्वासपूर्ण असाल आणि दृष्टिकोनही सकारात्मक राहील. तुमचे कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील आणि तुमच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. पण तुमच्या भावाच्या प्रकृतीच्या कुरबुरींची शक्यता आहे. या काळात प्रवास संभवतो. कमी अंतराचा प्रवास फलदायी ठरेल आणि नशीब फळफळेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता. सामाजिक आणि कौटुंबिक जीवनाचा आनंद लुटाल. आरोग्य निरोगी राहील आणि शत्रुवर विजय मिळवाल.
Nov 09, 2024 - Dec 09, 2024
यशाचा आणि समृद्धीचा काळ तुमची वाट पाहत आहे. कल्पक दृष्टिकोन आणि संधी यामुळे तुम्हाला थोडे अधिक उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या वरिष्ठांशी आणि अधिकाऱ्यांशी तुमचा सुसंवाद राहील. तुमच्या उत्पन्नात घसघशीत वाढ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात वाढ होईल आणि तुमची प्रतिमा उंचावेल. एकुणातच हा काळ तुमच्यासाठी सर्वांगीण यशाचा असेल.
Dec 09, 2024 - Dec 30, 2024
आत्मसंतुष्टता आणि उथळ वागणे टाळणे गरजेचे आहे. तुमच्या स्वभावातील दिखाऊपणा कमी करून कष्ट करा, तरच तुम्हाला यश मिळेल. आर्थिक दृष्ट्या हा थोडा कठीण समय आहे. या कालावधीत चोरी, घोटाळे आणि वाद होतील. कामाच्या ठिकाणी वाढीव दबाव आणि जबाबदारीची पातळी वाढेल. तुमच्या आरोग्यासाठी हा थोडा वाईट कालावाधी आहे. डोळ्यांचे आणि कानाचे विकार संभवतात. तुमच्या जोडीदाराला आरोग्याच्या समस्या भेडसावतील. तुमची मन:शांती ढळलेली राहील.
Dec 30, 2024 - Feb 23, 2025
हा काळात तुम्ही तुमच्या कारकीर्दीत मोठी झेप घ्याल. तुमचे सहकारी/भागिदारांकडून तुम्हाला लाभ होईल. अनैतिक मार्गाने पैसा कमावण्याकडे तुमचा कलजाईल. तुमची स्वयंशिस्त, स्वयंनिरीक्षण आणि स्वयंनियंत्रण हे तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. वरिष्ठ आणि अधिकारी व्यक्तींशी तुमचे मैत्रीपूर्ण संबंध राहतील आणि त्याचप्रमाणे तुमचे औद्योगिक वर्तुळ वाढेल. आरोग्याच्या तक्रारीमुळे तुमची मन:शांती ढळेल.
Feb 23, 2025 - Apr 13, 2025
काही त्रास आणि खच्चीकरण येऊ शकते, पण या परिस्थितीत तुम्ही वस्तुस्थितीकडे सकारात्मकतेने पाहणे गरजेचे आहे आणि कोणतेही काम अपूर्ण ठेवता कामा नये. कामाच्या ठिकाणी प्रत्येक बाबीचे सखोल अवलोकन करणे गरजेचे आहे. अचानक नुकसान संभवते. परदेशी संबंधांतून तुम्हाला फायदा होईल. आरोग्याच्या तक्रारींमुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. तुम्हाला फारसा फायदा करून न देणाऱ्या कामात गुंतावे लागेल. कुटुंबात काही कुरबुरी होतील. तुमचे शत्रू तुमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करतील. हा काळ तुमच्यासाठी फार अनुकूल नाही.
Apr 13, 2025 - Jun 10, 2025
ही चांगल्या कालावधीची सुरुवात असू शकते. तुमच्या हातून सत्कार्य घडेल. या काळात तुम्ही अत्यंत आनंदी असाल. विपरित परिस्थितीसुद्धा चांगल्या प्रकारे हाताळू शकाल. कौटुंबिक सौख्य लाभेल. तुमच्या भावंडांना थोडाफार त्रास सहन करावा लागू शकतो. तुमच्या स्वत:च्या प्रयत्नांमुळे तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. तुमचे शत्रू तुम्हाला दुखवू शकणार नाहीत. आरोग्याच्या थोड्याशा कुरबुरी राहतील. तुमच्या छंदांसाठी तुमचे मित्र आणि सहकारी मदत करतील.
Jun 10, 2025 - Jul 31, 2025
प्रवासात तुम्ही तुमच्यासारख्या व्यक्तींना भेटाल आणि त्यांच्यासोबत खूप चांगला संवाद घडेल. तुमच्या व्यावसायिक आणि कौंटुबिक आयुष्याचा चांगल्या प्रकारे समतोल साधाल आणि दोन्ही ठिकाणी उत्तम प्रकारे जबाबदारी पार पाडाल. तुमच्या इच्छा खूप कष्टांनंतर पूर्ण होतील पण अखेर त्यातून तम्हाला समृद्धी, लोकप्रियता आणि चांगले उत्पन्न व लाभ मिळेल. जुन्या मित्रांशी भेट होईल. विरुद्ध लिंगी व्यक्तींचा सहवास लाभेल. वरिष्ठांकडून आणि प्रभावशाली व्यक्तींकडून सहकार्य मिळेल.
Jul 31, 2025 - Aug 22, 2025
तुमच्या फिरण्याच्या आंतरिक इच्छेमुळे तुम्ही या काळात चंचल असाल. तुम्हाला एका कोपऱ्यात बसणे आवडत नाही. त्यामुळे तुम्हाला थोडा त्रास होईल. धार्मिक कार्यांकडे तुमचा ओढा असेल आणि तुम्ही तीर्थ पर्यटन कराल. हा काळ तुमच्यासाठी स्फोटक असेल आणि कारकीर्दीत दबाव निर्माण होईल. तुमचे चिरंजीवी ्तेष्ट आणि नातेवाईक यांच्याशी असलेल्या नात्यात दुरावा निर्माण होईल. रोजच्या कामाकडे नीट लक्ष द्या. तुमच्या कुटुंबियांच्या अपेक्षा पूर्ण करणे कठीण होईल. कोणत्याही प्रकारच्या उद्योगात शिरण्याची ही वेळ नव्हे. तुमच्या आईसाठी हा कसोटीचा काळ असणार आहे.