सुरुवातीपासूनच तुम्हाला मोठ्या प्रमाणावर लाभ आणि संपत्ती मिळे. सट्टा, लॉटरी किंवा शेअर्समधून हा फायदा होईल. तुमच्या सगळ्या व्यवहारांसाठी मित्र आणि शुभचिंतकांची मदत आणि सहकार्य मिळे. उद्योगात केलेल्या व्यवहारातून तुम्ही चांगला आर्थिक नफा कमवाल. तुम्हाला हुद्दा आणि प्रतिष्ठा प्राप्त होईल. तुम्हाला लोकांकडून आदर मिळेल आणि या काळात तुम्ही रुचकल जेवणाचा आस्वाद घ्याल.
Aug 8, 2024 - Sep 08, 2024
उद्योग किंवा नवीन व्यवसायाबाबत एखादी वाईट बातमी कानी पडण्याची शक्यता आहे. या काळात खूप धोका पत्करू नका, कारण हा कालावधी तुमच्यासाठी अनुकूल नाही. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यामुळे तुमची काळजी वाढेल. सट्टेबाजारात सौदा करू नका कारण त्यातून नुकसान होण्याची शक्यता आहे. तुमचे विरोधक तुमच्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्यात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. पाण्यापासून दूर राहा कारण बुडण्याचा धोका आहे. ताप आणि सर्दी यामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढतील.
Sep 08, 2024 - Sep 29, 2024
मित्र, नातेवाईक आणि सहकाऱ्यांशी काळजीपूर्वक वागा कारण वाद होण्याची शक्यता आहे. उद्योगासाठी हा चांगला कालावधी नाही आणि आर्थिक नुकसान संभवते. काही गुप्त कामांसाठी खर्च होण्याची शक्यता आहे. मानसिक तणाव आणि दु:ख सहन करावे लागेल. जखमा आणि घाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहन सांभाळून चालवा.
Sep 29, 2024 - Nov 23, 2024
नवीन प्रकल्प किंवा मोठी गुंतवणूक टाळावी. व्यावसायिक म्हणून काम करत असाल तर हे वर्ष साधारणच राहील. नियमित अडथळे जाणवतील आणि साधारण वाढ होईल. निश्चित अशा प्रगतीसाठी वाट पाहावी लागेल. अस्थैर्य आणि संशयास्पद समय आहे. कोणताही बदल करू नका कारण तो तुम्हाला घातक ठरेल. या काळात तुमची पत काहीशी घसरेल. घरचा विचार करता काही असुरक्षितता जाणवेल.
Nov 23, 2024 - Jan 10, 2025
तुमच्या कुटुंबियांशी अधिक सखोल नाते निर्माण व्हावे, अशी तुमची इच्छा आहे. नवनवीन कल्पनांचा शोध घेणे, तुम्ही तुमच्या पालकांकडून शिकला आहात. कुटुंबात एकोपा राहील. तुमची नीतीमूल्ये आणि आदर्श राहणीमानामुळे तुम्हाला अनेक आशीर्वाद मिळतात. तुमच्या या उर्जेमुळे तुमचा जोडीदार आणि नातेवाईक यांना काकणभर अधिक सुख मिळते. या काळात तुमच्या आयुष्यात होणारे बदल हे जाणवणारे आणि दीर्घकाळापर्यंत टिकणारे असतील. तुम्ही तुमची एक गाडी विकून दुसरी घ्याल किंवा गाडी विकून तुम्हाला फायदा होईल.
Jan 10, 2025 - Mar 09, 2025
नवीन नाते/मैत्री सुरू करण्यासाठी हा चांगला कालावधी नाही. तुमच्या व्यावसायिक किंवा खासगी आयुष्यात काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित होतील, ज्यामुळे तुम्ही चिंताग्रस्त व्हाल. नकारात्मक राहण्यापेक्षा सकारात्मक राहणे कधीही चांगले. प्रेमप्रकरणात काहीशी उदासीनता निर्माण होईल. घरी अपत्याच्या आगमनाची शक्यता असल्यामुळे आनंदी वातावरण राहील. नवीन नातेसंबंध फारसे वृद्धिंगत होणार नाहीत, उलट त्यामुळे काही वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. वारा आणि थंडीशी संबंधित आजार होतील. या काळाच्या शेवटी मानसिक स्थैर्य लाभेल.
Mar 09, 2025 - Apr 30, 2025
अत्यंत उत्पादनक्षम वर्ष असेल त्यामुळे तुम्ही जे काही ध्येय गाठले आहे, त्याचे समाधान तुम्हाला मिळेल. या काळात तुम्ही आयुष्य पूर्ण सकारात्मकतेने आणि चैतन्याने जगाल. प्रवास, ज्ञानार्जन आणि प्रगतीच्या भरपूर संधी या काळात उपलब्ध होतील. तुमच्या कार्यक्षेत्रात विरुद्ध लिंगी व्यक्तीकडून सहकार्य मिळेल. तुम्ही ज्या आदरास लायक आहात, तो आदर तुम्हाला या काळात मिळेल आणि तुमचे जीवन अधिक स्थिर होईल. सट्टेबाजारातील व्यवहार फायदेशीर ठरतील. जमीन किंवा वाहन खरेदी कराल.
Apr 30, 2025 - May 21, 2025
या काळात तुम्ही धार्मिक कार्य कराल आणि तुमची वागणूक चांगली असेल. तुम्ही धर्म आणि अध्यात्म यात रुची घ्याल. या वर्षी खासगी आणि व्यावसायिक आयुष्यात तुम्हाला भागिदारी लाभदायी ठरेल. महत्त्वाचे म्हणजे इतकी वर्षे तुम्ही ज्या आयुष्य बदलून टाकणाऱ्या बदलाची वाट पाहात होतात, तो बदल आता घडणार आहे. या काळात तुम्हाला अधिकार प्राप्त होईल. कामाच्या ठिकाणी, मित्रांसमवेत आणि कुटुंबियांशी चांगले संबंध कसे ठेवावेत याबाबत तुम्ही नवीन धडे घेत आहात. कौटुंबिक वर्तुळात आनंद असेल.
May 21, 2025 - Jul 21, 2025
कल्पक आणि बौद्धिक उर्जेच्या दृष्टीने हा काळ अत्यंत अनुकूल आहे. तुम्ही रोमँटिक व्हाल आणि तुमच्या कामाला एक कलाप्रकार म्हणून समजून अनेक नवीन कल्पना राबवला. संबंध आणि संवाद यातून तुम्हाला नव्या संधी मिळतील आणि त्यातून तुम्ही विस्तार कराल. तुमचे धाडस आणि तुमची बुद्धिमत्ता यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होईल आणि अध्यात्मिक दृष्ट्याही तुम्ही वरची पातळी गाठाल. कौटुंबिक आयुष्यात एकोपा राहील. आरोग्याच्या थोड्याशा कुरबुरी राहतील. घराचे बांधकाम किंवा वाहनखरेदी करण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्या कष्टाचा मोबदला मिळणे निश्चित आहे.
Jul 21, 2025 - Aug 08, 2025
तुम्ही जे काम हाती घ्याल त्यात यशस्वी व्हाल. तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल आणि तुम्ही सर्व अडचणींवर मात कराल. तुमच्या शत्रुंचा पराजय होईल. नोकरीमध्ये बढतीची शक्यता. तुम्हाला शुभेच्छा आणि आदर मिळेल. कायदेशीर बाबीत जिंकाल. एकुणातच हा यशदायी कालावधी आहे. आगीपासून सावध राहा आणि डोळ्यांना जपा. आईच्या किंवा आईच्या नात्यातील व्यक्तींमध्ये आजारपण संभवते.