तुमच्या बुद्धिमत्तेची सर्व स्तरांतून प्रशंसा होईल. तुमचा व्यवसाय आणि उद्योग यात तुम्ही चमकाल. कुटुंबात होणारा बाळाचा जन्म तुम्हाला आनंद देईल. या काळात ज्ञान आणि धार्मिक शिकवण मिळेल. या काळात तीर्क्षक्षेत्री किंवा एखाद्या मनोरंजन स्थळाला भेट द्या. तुमचा सन्मान होईल आणि शासनकर्ते व उच्च अधिकारी यांच्याकडून तुमची प्रशंसा होईल.
Aug 23, 2024 - Oct 23, 2024
तुमच्यावर आणि तुमच्या कार्यावर प्रकाश पडेल. ही अशी वेळ आहे की तुम्हाला तुमच्या कामाचे श्रेय मिळालेच पाहिजे. तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडाल आणि तुमचे पालक, भावंड आणि नातेवाईक यांच्याशी जवळीक साधाल. संवादातून तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकेल. हीच लय कायम ठेवा आणि क्षमतेवर विश्वास ठेवा, या वर्षात तुम्हाला एक वेगळीच ओळख मिळेल. दूरचा प्रवास फलदायी असेल. या कालावधीत तुम्ही उच्चभ्रू जीवन जगाल.
Oct 23, 2024 - Nov 11, 2024
तुम्ही या काळात जोशपूर्ण असाल. तुम्ही काहीसे धाडसी आणि आक्रमक असाल. मानसिक तोल ढळण्याची शक्यता आणि तरतमभाव ठेवणे कठीण जाईल. तुमची लोकप्रियता कमी होईल आणि भांडणामुळे अडचणीत येण्याची शक्यता. प्रेमासाठी हा कालावधी प्रतिकूल आहे. जोडीदार आणि पाल्यांचे आरोग्य सांभाळा. या काळात अपत्यप्राप्ती होण्याची शक्यता आणि वरिष्ठांकडून लाभ संभवतो.
Nov 11, 2024 - Dec 11, 2024
तुमच्याकडे भरपूर संधी चालून येणार असल्या तरी त्यांचा लाभ उठवता येणार नाही. तुमच्या किंवा तुमच्या पालकांच्या आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे तुमची स्वत:ची आणि तुमच्या पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या. दूरचे प्रवास संभवतात, पण ते टाळलेलेच बरे कारण त्यातून कोणताही फायदा संभवत नाही. हा तुमच्यासाठी मिश्र घटनांचा कालवधी आहे. लोकांशी आणि तुमच्या सहकाऱ्यांशी भांडणाची शक्यता. सर्दी किंवा तापासारखे विकार संभवतात. कोणत्याही निश्चित कारणाशिवाय मानसिक तणाव राहील.
Dec 11, 2024 - Jan 01, 2025
आर्थिक लाभ होण्यासाठी हा कालावधी अनुकूल नाही. तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू संभवतो. कौटुंबिक वादामुळे तुमची मन:शांती ढळण्याची शक्यता आहे. तुम्ही वापरलेल्या कठोर शब्दांमुळे तुम्ही गोत्यात याल. उद्योगाशी संबंधित एखादी वाईट बातमी मिळू शकते. मोठे नुकसान संभवते. आरोग्याच्या तक्रारी तुम्हाला अस्वस्थ करण्याची शक्यता आहे.
Jan 01, 2025 - Feb 25, 2025
या काळात जागा आणि नोकरी दोन्ही बदलण्याची शक्यता आहे. मानसिक ताणामुळे तुम्हाला त्रास सहन करावा लागेल. तुमची मन:शांती ढळेल. कुटुंबातील सदस्यांची वागणूकही थोडीशी वेगळी असेल. मोठी गुंतवणूक करू नका, कारण ती फार लाभदायी असणार नाही. तुमचे मित्र आणि सहकारी त्यांची आश्वासने पूर्ण करणार नाहीत. धूर्त मित्रांपासून सावध राहा कारण कदाचित त्यांच्यापासून तुमच्या प्रतिमेला धक्का पाहोचू शकतो. कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या. त्यामुळे प्रवास करून का, शारीरिक आजार होण्याची शक्यता आहे.
Feb 25, 2025 - Apr 15, 2025
तुम्ही तुमच्यात असलेल्या संगीताच्या गुणांचा आनंद घेऊ शकाल. त्याचप्रमाणे एखादी नवी सांगीतिक रचना सुचण्याचीही शक्यता आहे. कामाशी आणि समाजाशी संबंधित तुमची तत्वे व्यक्त करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुमच्या कल्पना प्रत्यक्षात उतरवाल तेव्हा त्यातून आर्थिक लाभ होईल. तुमच्याकडे आर्थिक आवक निश्चितच वाढेल आणि त्यामुळे व्यक्तिगत विश्वास, स्वप्न आणि तत्वे यावर निश्चितच प्रभाव पडेल. तुमचे शत्रू तुमच्या वरचढ होऊ शकणार नाहीत. एकूणातच वातावरण आनंदी राहील. तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये वाढ होईल.
Apr 15, 2025 - Jun 11, 2025
या काळात शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या तुम्ही धाडसी निर्णय घ्याल. तुमच्या नातेवाईकांसाठी हा चांगला काळ आहे. तुमच्या करिअरमध्ये नवीन प्रयत्न करा. यश निश्चित आहे. काही भौतिक सुखाच्या वस्तू विकत घ्याल. तुम्ही जमीन आणि यंत्रांची खरेदी कराल. उद्योग आणि व्यवसायातून फायदा मिळेल. तुमचे शत्रूंचे तुमच्यासमोर काही चालणार नाही. दूरच्या प्रदेशातील लोकांच्या ओळखी होतील. प्रेमप्रकरणाचा विचार करता हा कालावधी अनुकूल आहे. कुटुंबियांकडून पूर्ण सहकार्य मिळेल.
Jun 11, 2025 - Aug 02, 2025
मालमत्तेच्या व्यवहारातून या कालावधीत चांगलाच फायदा होईळ. आर्थिक वादांचा निकाल तुमच्या बाजूने लागेल. दीर्घ काळापासून अपेक्षित असलेली पगारवाढ आता होईल. व्यवसायाच्या निमित्ताने केलेले प्रवास लाभदायक ठरतील. या काळाचा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे तुमच्याविषयी असलेला आदर वाढीस लागेल मग तुमची आय़ुष्याची गाडी कोणत्याही स्थानकावर का असे ना. आरामदायी वस्तुंवर तुम्ही खर्च कराल आणि नवीन वाहन खरेदीची शक्यता आहे.
Aug 02, 2025 - Aug 23, 2025
खासगी आणि व्यावसायिक आयुष्यातील भागिदाऱ्या फलदायी ठरतील. महत्त्वाचे म्हणजे इतकी वर्षे तुम्ही ज्या आयुष्य बदलून टाकणाऱ्या बदलाची वाट पाहात होतात, तो बदल आता घडणार आहे. संवाद आणि वाटाघाटी यामुळे तुम्हाला नव्या संधी प्राप्त होतील. तुम्ही लोकांना मदत कराल. कामधंद्याच्या निमित्ताने तुम्ही प्रवास कराल आणि हे प्रवास तुमच्यासाठी फलदायी ठरतील. नोकरी करत असाल तर कामच्या ठिकाणी असलेल्या परिस्थितीत सुधारणा होईल.