शत्रू किंवा विरोधक तुम्हाला सामोरे जाण्याचा विचारही करणार नाहीत. कायदेशीर प्रकरणे तुमच्या बाजूने असतील. आर्थिक बाबतीत तुम्हाला नाव, लोकप्रितयता, फायदा आणि यश मिळेल. भाऊ आणि नातेवाईकांकडून सहकार्य मिळेल. तुम्ही तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भेट द्याल आणि लोकांकडून मदत घ्याल. तुम्ही केलेल्या कष्टांना आणि प्रयत्नांना यश मिळेल.
Jul 23, 2025 - Sep 09, 2025
तुमच्या व्यक्तिगत इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला इतरांची मदत मिळेल. तुमच्याकडे आर्थिक आवक निश्चितच वाढेल आणि त्यामुळे व्यक्तिगत विश्वास, स्वप्न आणि तत्वे यावर निश्चितच प्रभाव पडेल. तुमच्या लायकीनुसार तुम्हाला सरकार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ओळख मिळेल. तुमचा मैत्रीपूर्ण स्वभाव आहे आणि विविध प्रकारचे सामाजिक भान असलेल्या माणसांचा सहवास तुम्हाला आवडतो. आरोग्याच्या तक्रारीमुळे तुम्हाला थोडासा मनस्ताप होईल. बाह्यरूपातील बदलापेक्षा व्यक्तिमत्वातील परिवर्तन अधिक महत्त्वाचे असते.
Sep 09, 2025 - Nov 06, 2025
हा तुमच्यासाठी फार समाधानकारक काळ नाही. अचानक आर्थिक नुकसान संभवते. याचिका किंवा वादामुळे आर्थिक तोटा सहन करावा लागेल. प्रयत्न अयशस्वी ठरल्यामुळे तुम्ही त्रासिक व्हाल. कामाचा दबाव खूप असल्यामुळे प्रचंड कष्ट करावे लागतील. कुटुंबातही तणावपूर्ण वातावरण असेल. हा कालावधी फार अनुकूल नसल्याने व्यवसायात फार धोका पत्करू नका. तुमचे शत्रू तुमची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करतील. आर्थिक नुकसान संभवते.
Nov 06, 2025 - Dec 28, 2025
मालमत्तेच्या व्यवहारातून या कालावधीत चांगलाच फायदा होईळ. आर्थिक वादांचा निकाल तुमच्या बाजूने लागेल. दीर्घ काळापासून अपेक्षित असलेली पगारवाढ आता होईल. व्यवसायाच्या निमित्ताने केलेले प्रवास लाभदायक ठरतील. या काळाचा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे तुमच्याविषयी असलेला आदर वाढीस लागेल मग तुमची आय़ुष्याची गाडी कोणत्याही स्थानकावर का असे ना. आरामदायी वस्तुंवर तुम्ही खर्च कराल आणि नवीन वाहन खरेदीची शक्यता आहे.
Dec 28, 2025 - Jan 18, 2026
व्यक्तिगत आणि व्यावसायिक आघाडीवर अडथळे निर्माण होतील. कठीण परिस्थिती शांतपणे आणि चातुर्याने हाताळा कारण या कालावधीत घाई करून उपयोग नाही. प्रवास फार लाभदायी ठरणार नाही, त्यामुळे तो टाळावा. तुमच्या कुटुंबाकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळणार नाही. अपत्याशी निगडीत समस्या उद्भवतील. तुम्हाला नामोहरम करण्याची एकही संधी तुमचे शत्रू सोडणार नाहीत. थोडे धाडस दाखवा आणि तुमच्या योग्य निर्णयांना चिकटून राहा. पोटदुखीचा त्रास संभवतो.
Jan 18, 2026 - Mar 20, 2026
तुम्ही एखादा नवीन प्रकल्प सुरू करण्याचा किंवा योजना राबविण्याचा विचार करत असाल तर नशीब तुमच्या बाजूने असेल. तुमच्या कारकीर्दीतही प्रगती होईल. तुमची काम करायची तयारी असेल तर हा तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल कालावधी आहे. तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी कराल आणि हुशारीने गुंतवणूक कराल. विरुद्ध लिंगी व्यक्तींचा सहवास लाभेल. तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून मिळणाऱ्या सहकार्यात वाढ होईल. चविष्ठ आणि उंची जेवणाप्रती तुमची चव विकसित होईल. घरी एखादे स्नेहभोजन होण्याची शक्यता आहे.
Mar 20, 2026 - Apr 07, 2026
प्रकृती नाजूक असल्यामुळे शारीरिक थकवा येणारे काम करू शकणार नाही. तुमच्या हातून काही अविवेकी काम होण्याची शक्यता. तुम्ही शेती करत असाल तर आर्थिक नुकसान संभवते. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्रास होण्याची शक्यता. आईच्या आजारपणामुळे चिंताग्रस्त राहाल. राहत्या घरी तुम्हाला नको असलेला बदल संभवतो. निष्काळजीपणे वाहन चालवू नका.
Apr 07, 2026 - May 08, 2026
हा तुमच्यासाठी अनुकूल कालावधी आहे. तुमच्या विचारांबाबत तुम्हाला विश्वास असेल आणि बढती मिळण्याची दाट शक्यता आहे. अचानक प्रवास संभवतो आणि हा प्रवास तुम्हाला फलदायी ठरेल. भावंडांकडून आणि जोडीदाराकडून आनंद मिळेल. तुमच्या भावांसाठीसुद्धा हा अनुकूल काळ आहे. जागा किंवा व्यवसाय बदलण्याचा विचार टाळा.
May 08, 2026 - May 29, 2026
कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याच्या तक्रारींमुळे तुम्ही चिंताग्रस्त राहाला. प्रवासाचा काही लाभ होणार नसल्याने तो शक्यतो टाळा. नाहक खर्चाची शक्यता असल्याने या संदर्भात काळजी घ्या. मित्र आणि सहकाऱ्यांशी सांभाळून वागा. तुमची निर्णय घेण्याची आणि तरतमभाव जाणण्याची क्षमता काही प्रसंगी क्षीण होईल. आग किंवा महिलेमुळे जखम होण्याची शक्यता. या काळात हृदयविकार संभवतो, त्यामुळे त्या दृष्टीने काळजी घ्या.
May 29, 2026 - Jul 23, 2026
या काळात तुम्ही धाडसी व्हाल आणि एका वेगळ्या उंचीवर पोहोचाल. वैवाहिक आयुष्यात आनंद लाभेल. प्रभावशाली व्यक्तींशी असलेले तुमचे संबंध वृद्धिंगत होतील. तुमचे शत्रु तुम्हाला सामोरे येऊ शकणार नाहीत. दूरचा प्रवास फलदायी ठरेल. शृंगारासाठी हा अत्यंत अनुकूल कालावधी आहे. कोणत्याही वादामध्ये तुमचा वरचष्मा राहील. आरोग्याच्या कुरबुरी राहतील. कौटुंबिक संबंध सलोख्याचे राहतील. तुमच्या मुलांसोबतचे संबंध मात्र काहीसे तणावपूर्ण असतील.