तुमच्या आर्थिक आणि सामाजिक स्थानाच्या बाबतीत चढ-उतार संभवतात. आर्थिक आणि मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाजूंची नीट काळजी घ्या. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा कारण जवळचे सहकारी आणि नातेवाईक यांच्याशी वाद होण्याची शक्यता आहे. तुमच्या आऱोग्याकडेही लक्ष द्या कारण त्या बाबातीत आजारपण संभवते.
Jan 7, 2024 - Jan 29, 2024
नोकरी करत असाल तर वर्षाची सुरुवात उत्साही असेल. विकास आणि वाढीची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणचे वातावरण मात्र तणावपूर्ण असेल आणि वरिष्ठांसोबत वाद होण्याची शक्यता आहे. एकूणातच हा काळ फार चांगला नाही कारण मित्र, सहकारी, कुटुंबातील सदस्य हे दूर वाटू लागतील. फार बदल अपेक्षित नाही. तुमचा स्वभाव आणि चुकीची भाषा वापरल्यामुळे तुमच्या जवळच्या व्यक्तींचे आणि तुमच्या संबंधात दुरावा निर्माण होईल, त्यामुळे जीभेवर ताबा ठेवा.
Jan 29, 2024 - Mar 30, 2024
तुम्हाला सत्ता मिळेल, या सत्तेची फळं कदाचित तुम्ही या पूर्वी अनुभवलेली नसतील. व्यक्तिगत आय़ुष्यात तुमच्या जवळची माणसे तुमच्यावर अवलंबून असतील. तुम्हाला या काळात खूप प्रसिद्धी मिळेल. तुम्ही मानसिक दृष्ट्या कणखर राहाल. तुमच्या पत्नीसोबतचा तुमचा संवाद आणि तुमचे संबंध प्रेमाचे राहतील. अपत्यप्राप्ती संभवते. तुमचे सहकारी तुम्हाला पूर्ण सहकार्य देतील. एकूणच हा अत्यंत आनंददायी समय असेल.
Mar 30, 2024 - Apr 17, 2024
तुम्ही या काळात जोशपूर्ण असाल. तुम्ही काहीसे धाडसी आणि आक्रमक असाल. मानसिक तोल ढळण्याची शक्यता आणि तरतमभाव ठेवणे कठीण जाईल. तुमची लोकप्रियता कमी होईल आणि भांडणामुळे अडचणीत येण्याची शक्यता. प्रेमासाठी हा कालावधी प्रतिकूल आहे. जोडीदार आणि पाल्यांचे आरोग्य सांभाळा. या काळात अपत्यप्राप्ती होण्याची शक्यता आणि वरिष्ठांकडून लाभ संभवतो.
Apr 17, 2024 - May 17, 2024
हा तुमच्यासाठी समृद्धीचा काळ आहे. तुम्हाला अनेक अनपेक्षित गोष्टी मिळतील, त्या आनंद देणाऱ्याच असतील. तुमची पत्नी आणि नातेवाईकांकडूनही आनंदाचा प्रसाद मिळेल. न्यायालयीन खडले आणि याचिकांमध्ये यश मिळेल. तुम्ही नवीन घर किंवा वाहन खरेदी कराल. करारांमधून भरघोस फायदा मिळेल. तुमच्या शत्रुंवर एकूणच तुमचे वर्चस्व राहील. आर्थिक बाबींचा विचार करता हा काळ अनुकूल आहे.
May 17, 2024 - Jun 08, 2024
कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याच्या तक्रारींमुळे तुम्ही चिंताग्रस्त राहाला. प्रवासाचा काही लाभ होणार नसल्याने तो शक्यतो टाळा. नाहक खर्चाची शक्यता असल्याने या संदर्भात काळजी घ्या. मित्र आणि सहकाऱ्यांशी सांभाळून वागा. तुमची निर्णय घेण्याची आणि तरतमभाव जाणण्याची क्षमता काही प्रसंगी क्षीण होईल. आग किंवा महिलेमुळे जखम होण्याची शक्यता. या काळात हृदयविकार संभवतो, त्यामुळे त्या दृष्टीने काळजी घ्या.
Jun 08, 2024 - Aug 01, 2024
नवीन गुंतवणूक करू नका आणि धोका पत्करू नका. या काळात अडथळे आणि अडचणी समोर येतील. तुम्ही व्यावसायिक म्हणून काम करत असाल तर तुम्ही नियमित कष्ट केल्यास आणि बिनधास्तपणे काम केल्यास प्रगती निश्तिच आहे. यशाचा मार्ग सोपा नसतो. चांगल्या परिणामांसाठी तुमचा स्वभाव स्थिर असणे आवश्यक आहे. वर्षाच्या सुरुवातीला कामाच्या ठिकाणी कुरबुरी असतील. या काळात तुम्ही फार झेप घेण्याचा किंवा नवीन उपक्रम सुरू करण्याचा प्रयत्न करू नका. आरोग्याच्या तक्रारीमुळे तुम्ही दिलेली आश्वासने पाळणे शक्य होणार नाही. आरोग्याची तपासणी करा आणि तापाचा त्रास होण्याची शक्यता आहे.
Aug 01, 2024 - Sep 19, 2024
या काळात तुम्हाला नक्कीच अधिकार मिळेल. परदेशातील तुमचे हितसंबंध उपयोगी पडतील आणि त्या संबंधातूनच तुम्हाला अनपेक्षित उत्पन्न आणि तुम्हाला अपेक्षित असलेली सत्ता मिळू शकेल. तुमची गती कायम ठेवा, क्षमतांवर विश्वास ठेवा, या वर्षात तुम्हाला एक वेगळेच स्थान प्राप्त होणार आहे. कुटुंबातील वातावरण तुम्हाला सहकार्य देणारे ठरेल. दूरचे प्रवास केल्यास त्यातून लाभ होऊ शकेल. तुम्ही धार्मिक कार्यात स्वारस्य घ्याल आणि दानधर्म कराल.
Sep 19, 2024 - Nov 16, 2024
तुमच्या कामाच्या ठिकाणी स्पर्धा निर्माण झाल्यामुळे आणि कामच्या दबावामुळे तुमच्या कारकीर्दीमध्ये काही अडथळे निर्माण होतील. ही परिस्थिती हाताळ्यासाठी तुम्ही थोडे लवचिक धोरण अवलंबिण्याची गरज आहे. नवे प्रकल्प आणि करिअरमध्ये धोके पत्करू नका. वाद आणि कामाच्या स्वरूपातील बदल टाळा. संवाद साधताना सकारात्मक असा आणि बोलताना किंवा लिखित स्वरूपात अपमानकारक शब्दांचा वापर करू नका. विरुद्ध लिंगी व्यक्तींसोबतचे तुमचे संबंध सलोख्याचे राहणार नाहीत. जोडीदाराची प्रकृती अस्वस्थ राहील. अनावश्यक प्रवास टाळा. तुम्हाला काही अनपेक्षित दु:ख किंवा कोणताही आधार नसलेल्या आरोपांना सामोरे जावे लागेल.
Nov 16, 2024 - Jan 07, 2025
तुमच्या आजुबाजूच्या माणसांना तुमचे मूल्य कळेल आणि त्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल, तसेच तुम्ही सतत तुमच्या क्षमतेच्या 100 टक्के काम करता हा दुसऱ्यांना प्रेरीत करणारा घटक असेल. प्रवास करण्यास हा अत्यंत अनुकूल काळ आहे. तुमच्याकडे येणाऱ्या सुखाचा उपभोग घ्या. अखेर तुम्ही यशाची फळें चाखू शकता आणि तुमच्या कष्टाचे चीज होण्याचा हा काळ आहे. तुम्ही प्रसिद्ध व्यक्तींच्या सहवासात याल. तुमची अपत्याची इच्छा पूर्ण होईल. तुमच्या कल्पकतेची प्रशंसा होईल.