अचानक आर्थिक नुकसान संभवते. प्रयत्न अपयशी ठरल्यामुळे तुम्ही निराश व्हाल. कामाचा दबाव खूप असल्याने प्रचंड कष्ट करावे लागतील. बाहेरच्या जमिनींतून तुम्ही विस्थापित व्हाल, तिथून रवानगी होईल किंवा त्याबाबत समस्या उद्भवतील. कुसंगत जडण्याची शक्यता आहे, त्यामुळे सावध राहा. आरोग्य कमकुवत राहील आणि तुम्हाला अनेक विकार होण्याची शक्यता आहे. तुमच्या सामाजिक स्थानालाही धक्का पोहोचण्याची शक्यता आहे. समाजातील चांगल्या व्यक्तींसोबत वाद होतील.
Jun 21, 2024 - Aug 20, 2024
माणसं तुमचा आदर्श ठेवतील आणि सल्ला घेण्यासाठी तुमच्याकडे येतील. सगळ्या समस्या सुटू लागतील. या सर्व काळ तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल आणि उर्जेचा राहील. हा काळ दैव, क्षमता आणि धाडसाचा असणार आहे. वरिष्ठाकंडून तुम्हाला ऐहिक लाभ मिळेल. त्यामुळे नवीन प्रयत्न करण्यासाठी आणि नवीन ठिकाणी प्रवास करण्यासाठी हा अत्यंत अनुकूल काळ आहे. तुम्ही अनेकांशी संबंध जोडाल आणि यातून चांगल्या प्रकारची देवाण-घेवाण होईल. हा कालावधी तुमच्या भावंडांसाठी आनंद आणि यश घेऊन येईल.
Aug 20, 2024 - Sep 08, 2024
हा तुमच्यासाठी आरामदायी कालावधी आहे. तुम्ही आत्मविश्वासपूर्ण असाल आणि दृष्टिकोनही सकारात्मक राहील. तुमचे कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील आणि तुमच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. पण तुमच्या भावाच्या प्रकृतीच्या कुरबुरींची शक्यता आहे. या काळात प्रवास संभवतो. कमी अंतराचा प्रवास फलदायी ठरेल आणि नशीब फळफळेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता. सामाजिक आणि कौटुंबिक जीवनाचा आनंद लुटाल. आरोग्य निरोगी राहील आणि शत्रुवर विजय मिळवाल.
Sep 08, 2024 - Oct 08, 2024
उद्योग किंवा नवीन व्यवसायाबाबत एखादी वाईट बातमी कानी पडण्याची शक्यता आहे. या काळात खूप धोका पत्करू नका, कारण हा कालावधी तुमच्यासाठी अनुकूल नाही. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यामुळे तुमची काळजी वाढेल. सट्टेबाजारात सौदा करू नका कारण त्यातून नुकसान होण्याची शक्यता आहे. तुमचे विरोधक तुमच्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्यात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. पाण्यापासून दूर राहा कारण बुडण्याचा धोका आहे. ताप आणि सर्दी यामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढतील.
Oct 08, 2024 - Oct 29, 2024
हा तुमच्यासाठी संमिश्र घटनांचा काळ आहे. आऱोग्याच्या किरकोळ तक्रांरींकडे दुर्लक्ष करू नका. कारण या समस्यांचे भविष्यात गंभीर स्वरूपात रूपांतर होऊ शकते. अल्सर, संधीवात, मळमळ, डोक्याशी आणि डोळ्यांशी संबंधित तक्रारी, सांधेदुखी किंवा एखाद्या धातुमुळे होणारी जखम याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. तुमच्या मार्गात कठीण परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. परंतु, खच्चीकरण होऊ देऊ नका कारण तुमचा आत्मविश्वास तुमचे काम निभावून नेईल. सरकार किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वाद होण्यीच शक्यता आहे म्हणूनच या संदर्भात सतर्क राहण्याचा सल्ला आहे. सट्टेबाजारातील व्यवहार किंवा धोका पत्करण्यासाठी हा काळ अनुकूल नाही.
Oct 29, 2024 - Dec 23, 2024
या काळात जागा आणि नोकरी दोन्ही बदलण्याची शक्यता आहे. मानसिक ताणामुळे तुम्हाला त्रास सहन करावा लागेल. तुमची मन:शांती ढळेल. कुटुंबातील सदस्यांची वागणूकही थोडीशी वेगळी असेल. मोठी गुंतवणूक करू नका, कारण ती फार लाभदायी असणार नाही. तुमचे मित्र आणि सहकारी त्यांची आश्वासने पूर्ण करणार नाहीत. धूर्त मित्रांपासून सावध राहा कारण कदाचित त्यांच्यापासून तुमच्या प्रतिमेला धक्का पाहोचू शकतो. कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या. त्यामुळे प्रवास करून का, शारीरिक आजार होण्याची शक्यता आहे.
Dec 23, 2024 - Feb 10, 2025
तुम्ही तुमच्यात असलेल्या संगीताच्या गुणांचा आनंद घेऊ शकाल. त्याचप्रमाणे एखादी नवी सांगीतिक रचना सुचण्याचीही शक्यता आहे. कामाशी आणि समाजाशी संबंधित तुमची तत्वे व्यक्त करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुमच्या कल्पना प्रत्यक्षात उतरवाल तेव्हा त्यातून आर्थिक लाभ होईल. तुमच्याकडे आर्थिक आवक निश्चितच वाढेल आणि त्यामुळे व्यक्तिगत विश्वास, स्वप्न आणि तत्वे यावर निश्चितच प्रभाव पडेल. तुमचे शत्रू तुमच्या वरचढ होऊ शकणार नाहीत. एकूणातच वातावरण आनंदी राहील. तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये वाढ होईल.
Feb 10, 2025 - Apr 09, 2025
या काळात शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या तुम्ही धाडसी निर्णय घ्याल. तुमच्या नातेवाईकांसाठी हा चांगला काळ आहे. तुमच्या करिअरमध्ये नवीन प्रयत्न करा. यश निश्चित आहे. काही भौतिक सुखाच्या वस्तू विकत घ्याल. तुम्ही जमीन आणि यंत्रांची खरेदी कराल. उद्योग आणि व्यवसायातून फायदा मिळेल. तुमचे शत्रूंचे तुमच्यासमोर काही चालणार नाही. दूरच्या प्रदेशातील लोकांच्या ओळखी होतील. प्रेमप्रकरणाचा विचार करता हा कालावधी अनुकूल आहे. कुटुंबियांकडून पूर्ण सहकार्य मिळेल.
Apr 09, 2025 - May 30, 2025
प्रवासात तुम्ही तुमच्यासारख्या व्यक्तींना भेटाल आणि त्यांच्यासोबत खूप चांगला संवाद घडेल. तुमच्या व्यावसायिक आणि कौंटुबिक आयुष्याचा चांगल्या प्रकारे समतोल साधाल आणि दोन्ही ठिकाणी उत्तम प्रकारे जबाबदारी पार पाडाल. तुमच्या इच्छा खूप कष्टांनंतर पूर्ण होतील पण अखेर त्यातून तम्हाला समृद्धी, लोकप्रियता आणि चांगले उत्पन्न व लाभ मिळेल. जुन्या मित्रांशी भेट होईल. विरुद्ध लिंगी व्यक्तींचा सहवास लाभेल. वरिष्ठांकडून आणि प्रभावशाली व्यक्तींकडून सहकार्य मिळेल.
May 30, 2025 - Jun 21, 2025
खासगी आणि व्यावसायिक आयुष्यातील भागिदाऱ्या फलदायी ठरतील. महत्त्वाचे म्हणजे इतकी वर्षे तुम्ही ज्या आयुष्य बदलून टाकणाऱ्या बदलाची वाट पाहात होतात, तो बदल आता घडणार आहे. संवाद आणि वाटाघाटी यामुळे तुम्हाला नव्या संधी प्राप्त होतील. तुम्ही लोकांना मदत कराल. कामधंद्याच्या निमित्ताने तुम्ही प्रवास कराल आणि हे प्रवास तुमच्यासाठी फलदायी ठरतील. नोकरी करत असाल तर कामच्या ठिकाणी असलेल्या परिस्थितीत सुधारणा होईल.