हा तुमच्यासाठी अनुकूल काळ आहे. तुम्हाला मिळणाऱ्या आनंदाचा उपभोग घ्या. अखेर तुम्ही केलेल्या कष्टाचे चीज होऊन तुम्हाला मिळालेल्या यशाची चव चाखू शकता. तुम्ही लोकप्रिय व्यक्तींच्या संपर्कात याला. परदेशातून मिळणाऱ्या लाभामुळे तुमची पत वाढण्यास मदत होईल. वरिष्ठ आणि अधिकारी यांच्याकडून लाभ होईल. पत्नी आणि मुलांकडून सुख मिळेल. घरी धार्मिक कार्य घडेल, याचमुळे तुम्हाला लोकप्रियता मिळेल आणि नशीबही तुमच्या बाजूने असेल.
Jul 20, 2024 - Sep 12, 2024
हा काळात तुम्ही तुमच्या कारकीर्दीत मोठी झेप घ्याल. तुमचे सहकारी/भागिदारांकडून तुम्हाला लाभ होईल. अनैतिक मार्गाने पैसा कमावण्याकडे तुमचा कलजाईल. तुमची स्वयंशिस्त, स्वयंनिरीक्षण आणि स्वयंनियंत्रण हे तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. वरिष्ठ आणि अधिकारी व्यक्तींशी तुमचे मैत्रीपूर्ण संबंध राहतील आणि त्याचप्रमाणे तुमचे औद्योगिक वर्तुळ वाढेल. आरोग्याच्या तक्रारीमुळे तुमची मन:शांती ढळेल.
Sep 12, 2024 - Oct 31, 2024
काही त्रास आणि खच्चीकरण येऊ शकते, पण या परिस्थितीत तुम्ही वस्तुस्थितीकडे सकारात्मकतेने पाहणे गरजेचे आहे आणि कोणतेही काम अपूर्ण ठेवता कामा नये. कामाच्या ठिकाणी प्रत्येक बाबीचे सखोल अवलोकन करणे गरजेचे आहे. अचानक नुकसान संभवते. परदेशी संबंधांतून तुम्हाला फायदा होईल. आरोग्याच्या तक्रारींमुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. तुम्हाला फारसा फायदा करून न देणाऱ्या कामात गुंतावे लागेल. कुटुंबात काही कुरबुरी होतील. तुमचे शत्रू तुमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करतील. हा काळ तुमच्यासाठी फार अनुकूल नाही.
Oct 31, 2024 - Dec 28, 2024
ही चांगल्या कालावधीची सुरुवात असू शकते. तुमच्या हातून सत्कार्य घडेल. या काळात तुम्ही अत्यंत आनंदी असाल. विपरित परिस्थितीसुद्धा चांगल्या प्रकारे हाताळू शकाल. कौटुंबिक सौख्य लाभेल. तुमच्या भावंडांना थोडाफार त्रास सहन करावा लागू शकतो. तुमच्या स्वत:च्या प्रयत्नांमुळे तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. तुमचे शत्रू तुम्हाला दुखवू शकणार नाहीत. आरोग्याच्या थोड्याशा कुरबुरी राहतील. तुमच्या छंदांसाठी तुमचे मित्र आणि सहकारी मदत करतील.
Dec 28, 2024 - Feb 18, 2025
प्रवासात तुम्ही तुमच्यासारख्या व्यक्तींना भेटाल आणि त्यांच्यासोबत खूप चांगला संवाद घडेल. तुमच्या व्यावसायिक आणि कौंटुबिक आयुष्याचा चांगल्या प्रकारे समतोल साधाल आणि दोन्ही ठिकाणी उत्तम प्रकारे जबाबदारी पार पाडाल. तुमच्या इच्छा खूप कष्टांनंतर पूर्ण होतील पण अखेर त्यातून तम्हाला समृद्धी, लोकप्रियता आणि चांगले उत्पन्न व लाभ मिळेल. जुन्या मित्रांशी भेट होईल. विरुद्ध लिंगी व्यक्तींचा सहवास लाभेल. वरिष्ठांकडून आणि प्रभावशाली व्यक्तींकडून सहकार्य मिळेल.
Feb 18, 2025 - Mar 11, 2025
तुमच्या फिरण्याच्या आंतरिक इच्छेमुळे तुम्ही या काळात चंचल असाल. तुम्हाला एका कोपऱ्यात बसणे आवडत नाही. त्यामुळे तुम्हाला थोडा त्रास होईल. धार्मिक कार्यांकडे तुमचा ओढा असेल आणि तुम्ही तीर्थ पर्यटन कराल. हा काळ तुमच्यासाठी स्फोटक असेल आणि कारकीर्दीत दबाव निर्माण होईल. तुमचे हरिन पाठक ्तेष्ट आणि नातेवाईक यांच्याशी असलेल्या नात्यात दुरावा निर्माण होईल. रोजच्या कामाकडे नीट लक्ष द्या. तुमच्या कुटुंबियांच्या अपेक्षा पूर्ण करणे कठीण होईल. कोणत्याही प्रकारच्या उद्योगात शिरण्याची ही वेळ नव्हे. तुमच्या आईसाठी हा कसोटीचा काळ असणार आहे.
Mar 11, 2025 - May 11, 2025
तुम्ही एखादा नवीन प्रकल्प सुरू करण्याचा किंवा योजना राबविण्याचा विचार करत असाल तर नशीब तुमच्या बाजूने असेल. तुमच्या कारकीर्दीतही प्रगती होईल. तुमची काम करायची तयारी असेल तर हा तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल कालावधी आहे. तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी कराल आणि हुशारीने गुंतवणूक कराल. विरुद्ध लिंगी व्यक्तींचा सहवास लाभेल. तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून मिळणाऱ्या सहकार्यात वाढ होईल. चविष्ठ आणि उंची जेवणाप्रती तुमची चव विकसित होईल. घरी एखादे स्नेहभोजन होण्याची शक्यता आहे.
May 11, 2025 - May 29, 2025
घराकडे फार दुर्लक्ष न करता, अधिक लक्ष द्या आणि काळजी घ्या. कौटुंबिक समस्या आणि त्यातून निर्माण होणार तणाव यांच्याशी जुळवून घेणे कठीण जाईल. कुटुंबात मृत्यूची शक्यता आहे. आर्थिक आणि मालमत्तेच नुकसान संभवते. आर्थिक व्यवहारांबाबत सतर्क राहा. घसा, तोंड आणि डोळ्यांचे विकार संभवतात.
May 29, 2025 - Jun 28, 2025
तुमच्या कारकिर्दीमध्ये एक पुढचे पाऊल टाकण्यासाठी आणि मोठी झेप घेण्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे. भागिदार किंवा सहकाऱ्यांकडून तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराकडून तुम्हाला आनंदाचे क्षण मिळतील. प्रेम आणि रोमान्स या दोन्ही प्रकारात सुख लाभेल. व्यवहार आणि परदेशी प्रवासातून लाभ होईळ. आरोग्याच्या तक्रारीमुळे मन:शांती ढळेल. रोजच्या जीवनात स्वयंशिस्त, स्वयंनियंत्रण अंगी बाणवणे तुम्हाला फायदेशीर ठरेल. ताप आणि संधीवातापासून सावध राहा आणि काळजी घ्या. या काळात तुमच्या जोडीदाराची प्रकृती अस्वस्थ होण्याची शक्यता आहे.
Jun 28, 2025 - Jul 20, 2025
आत्मसंतुष्टता आणि उथळ वागणे टाळणे गरजेचे आहे. तुमच्या स्वभावातील दिखाऊपणा कमी करून कष्ट करा, तरच तुम्हाला यश मिळेल. आर्थिक दृष्ट्या हा थोडा कठीण समय आहे. या कालावधीत चोरी, घोटाळे आणि वाद होतील. कामाच्या ठिकाणी वाढीव दबाव आणि जबाबदारीची पातळी वाढेल. तुमच्या आरोग्यासाठी हा थोडा वाईट कालावाधी आहे. डोळ्यांचे आणि कानाचे विकार संभवतात. तुमच्या जोडीदाराला आरोग्याच्या समस्या भेडसावतील. तुमची मन:शांती ढळलेली राहील.