अचानक आर्थिक नुकसान संभवते. प्रयत्न अपयशी ठरल्यामुळे तुम्ही निराश व्हाल. कामाचा दबाव खूप असल्याने प्रचंड कष्ट करावे लागतील. बाहेरच्या जमिनींतून तुम्ही विस्थापित व्हाल, तिथून रवानगी होईल किंवा त्याबाबत समस्या उद्भवतील. कुसंगत जडण्याची शक्यता आहे, त्यामुळे सावध राहा. आरोग्य कमकुवत राहील आणि तुम्हाला अनेक विकार होण्याची शक्यता आहे. तुमच्या सामाजिक स्थानालाही धक्का पोहोचण्याची शक्यता आहे. समाजातील चांगल्या व्यक्तींसोबत वाद होतील.
Sep 15, 2025 - Nov 03, 2025
हा तुमच्यासाठी फार अनुकूल काळ नाही. तुमचे शत्रू तुमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही कदाचित असे काम कराल, ज्यातून तुम्हाला फारसा फायदा होणार नाही. अचानक नुकसान संभवते. धोका पत्करण्याच्या वृत्तीला खिळ घालावी लागेल, कारण हा फार अनुकूल काळ नाही. लहान-सहान मुद्यांवरून नातेवाईक आणि मित्रांशी वाद होतील. मोठे निर्णय घेऊ नका कारण गोत्यात येण्याची शक्यता आहे. तुम्हाला कदाचित अशी कामे करावी लागतील, ज्याचे कोणत्याही प्रकारचे श्रेय तुम्हाला मिळणार नाही. या काळात महिलांना मासिक पाळीच्या समस्या उद्भवतील, तसेच हगवण आणि डोळ्यांचे विकारही संभवतात.
Nov 03, 2025 - Dec 31, 2025
नशीबाची साथ आणि मानसिक स्थैर्य यामुळे तुमचे गृहस्थ जीवन सकारात्मक राहील. पत्नीच्या माध्यमातून लाभ होईल. प्रवास, उच्चशिक्षण, संवाद, नवीन उद्योगाची सुरुवात, व्यवसाय या दृष्टीने हे वर्ष अत्यंत अनुकूल आहे. या कालावधीत सगेसोयरे आणि नातेवाईक यांच्याशी वाद होतील आणि कदाचित शत्रुत्वही निर्माण होईल. व्यावसायिकदृष्ट्या तुम्हाला चांगले निष्कर्ष मिळतील. एकूणातच हा काळ अत्यंत अनुकूल असेल.
Dec 31, 2025 - Feb 20, 2026
अनेक अडचणी आणि कष्टप्रद काळानंतरचा हा काळ खूप चांगला आहे आणि अखेर तुम्ही थोडीशी विश्रांती घेऊ शकता आणि यशाची चव चाखू शकता आणि या आधी जे कष्ट केलेत त्याचे झालेले चीज उपभोगू शकता. शंकास्पद सट्टेबाजीचे व्यवहार टाळलेत तर आर्थिक बाबतीत तुमचे नशीब उत्तम असेल. प्रवासात चांगले मित्र मिळतील. राजकीय आणि महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींशी जवळीक वाढेल. तुमच्या कुटुंबात मुलाचा जन्म होईल.
Feb 20, 2026 - Mar 14, 2026
या काळात तुम्ही धार्मिक कार्य कराल आणि तुमची वागणूक चांगली असेल. तुम्ही धर्म आणि अध्यात्म यात रुची घ्याल. या वर्षी खासगी आणि व्यावसायिक आयुष्यात तुम्हाला भागिदारी लाभदायी ठरेल. महत्त्वाचे म्हणजे इतकी वर्षे तुम्ही ज्या आयुष्य बदलून टाकणाऱ्या बदलाची वाट पाहात होतात, तो बदल आता घडणार आहे. या काळात तुम्हाला अधिकार प्राप्त होईल. कामाच्या ठिकाणी, मित्रांसमवेत आणि कुटुंबियांशी चांगले संबंध कसे ठेवावेत याबाबत तुम्ही नवीन धडे घेत आहात. कौटुंबिक वर्तुळात आनंद असेल.
Mar 14, 2026 - May 14, 2026
नाण्याची दुसरी बाजू ही की, थोडेसे वाद आणि जवळच्या व्यक्तीशी विरहाची शक्यता आहे. महत्त्वाची गोष्ट ही की दुसऱ्याच्या भांडणात स्वत:ला गोवून घेऊ नका. तुमच्या आरोग्याची आणि आर्थिक परिस्थिती धोक्यात असेल. तुम्ही एखाद्या घोटाळ्यात अडकले जाल आणि तुमच्या प्रतिमेला कदाचित थोडासा धक्का पोहोचेल. अचानक धनलाभाची शक्यता आहे पण खर्चही तेवढेच जास्त असतील, हेही नमूद करावे लागेल. या काळात जरा जास्तच धोका आहे, त्यामुळे सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. प्रवासामुळे फार लाभ होणार नाही, त्यामुळे तो टाळावा.
May 14, 2026 - Jun 01, 2026
काही अनपेक्षित समस्या उद्भवतील. नातेवाईकांशी सलोख्याचे संबंध ठेवणे इष्ट राहील. आरोग्याची तपासणी करणे आवश्यक आहे. दीर्घकालीन आजार संभवतो. जोडीदार आणि मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक अव्यवहार करू नका. वस्तुस्थिती पडताळूनच उद्योगातील व्यवहार करा. शरीरावर पुळ्या येण्याची शक्यता.
Jun 01, 2026 - Jul 01, 2026
शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने हा कालावधी फार अनुकूल नाही. आरोग्याच्या तक्रारी आणि मानसिक तणाव संभवतात. तुमच्या कुटुंबियांसमोर आणि मित्रांसमोर तुमचे शत्रू तुमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यापासून शक्य तेवढे लांब राहण्याचा प्रयत्न करा. आरोग्याच्या तक्रारीची दाट शक्यता आहे, त्यामुळे त्याबाबत सावधानता बाळगा. तुमच्या जोडीदाच्या प्रकृती अस्वास्थ्याचीही शक्यता आहे.
Jul 01, 2026 - Jul 22, 2026
परीक्षेत यश, बढती, कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठा उंचावणे या काळात घडेल. कुटुंबाकडून मिळणाऱ्या सहकार्य़ात वाढ होईल. तुमच्यापासून लांब राहणाऱ्या आणि परदेशी सहकाऱ्यांकडून मदत मिळेल. तुम्हाला नवीन काम मिळेल आणि ते अत्यंत फायदेशीर असेल. कोणतीही विपरीत परिस्थिती उद्भवली तरी त्याला तुम्ही आत्मविश्वासाने सामोरे जाल.
Jul 22, 2026 - Sep 15, 2026
नवीन प्रकल्प किंवा मोठी गुंतवणूक टाळावी. व्यावसायिक म्हणून काम करत असाल तर हे वर्ष साधारणच राहील. नियमित अडथळे जाणवतील आणि साधारण वाढ होईल. निश्चित अशा प्रगतीसाठी वाट पाहावी लागेल. अस्थैर्य आणि संशयास्पद समय आहे. कोणताही बदल करू नका कारण तो तुम्हाला घातक ठरेल. या काळात तुमची पत काहीशी घसरेल. घरचा विचार करता काही असुरक्षितता जाणवेल.