हेलन
Nov 21, 1939
19:07:0
Rangoon
96 E 9
16 N 48
6.5
Kundli Sangraha (Tendulkar)
अचूक (अ)
तुम्ही प्रेम मनापासून करता. काही वेळा तुमचा दृष्टिकोन इतका अतिरेकी असतो की, त्या आकर्षणाचे भीतीमध्ये रूपांतर होऊ शकते. तुमचे प्रेमाचा पहिला टप्पा सुरळीत पार पडला की तुम्ही तुमचे प्रेम किती सखोल आणि खरे आहे ते दाकवून देता. तुम्ही उत्तम जोडीदार असाल आणि ज्या व्यक्तीशी तुम्ही विवाह कराल त्या व्यक्तीला तुमचे पूर्ण प्रेम लाभेल. तुमचे दुःख समोरच्या व्यक्तीने नीट ऐकून घ्यावे, अशी तुमची अपेक्षा असेल. पण दुसऱ्यांचे दुःख ऐकताना तुमचा मात्र असा दृष्टिकोन असत नाही.
तुमची प्रकृती उत्तम आहे. तुमच्यात सळसळते चैतन्य आहे आणि तुम्ही व्यायाम करत राहिलात तर अगदी उतारवयापर्यंत ते तसेच राहील. पण यात काहीसा अतिरेक होऊ शकतो. तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त व्यायाम केलात तर तुमच्या श्वसनेंद्रियांवर परिणाम होईल आणि तुम्हाला फुफ्फुसाचा त्रास होऊ शकतो. वयाच्या पंचेचाळीशीनंतर तुम्हाला सायटिका किंवा संधिवाताचा त्रास होण्याची शक्यता आहे. याची कारणे शोधणे कठीण असेल, पण याची कारणेच शोधायची झाली तर रात्रीच्या हवेत खूप फिरल्यामुळे असे घडण्याची शक्यता आहे.
तुम्हाला वस्तू गोळा करण्याचा छंद आहे. पोस्टाचे स्टँप, जुनी नाणी इत्यादी गोळ करणे तुम्हाला आवडते. त्याचप्रमाणे तुम्हाला एखादी वस्तू टाकून देणे जीवावर येते. तुम्हाला नेहमी वाटत राहते की, कदाचित ती वस्तू भविष्यकाळात उपयोगी पडेल, त्यामुळे तुम्ही जन्मतःच संकलक आहेत. तुमचे छंद हे मैदानी नसू घरगुती आहेत. तुम्हाला एखादी वस्तू तयार करण्यासाठी आवश्यक असणारा संयम आहे आणि त्यासाठीचे कौशल्य नसेल तर तुम्ही ते चटकन अवगत करू शकता.