शत्रू किंवा विरोधक तुम्हाला सामोरे जाण्याचा विचारही करणार नाहीत. कायदेशीर प्रकरणे तुमच्या बाजूने असतील. आर्थिक बाबतीत तुम्हाला नाव, लोकप्रितयता, फायदा आणि यश मिळेल. भाऊ आणि नातेवाईकांकडून सहकार्य मिळेल. तुम्ही तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भेट द्याल आणि लोकांकडून मदत घ्याल. तुम्ही केलेल्या कष्टांना आणि प्रयत्नांना यश मिळेल.
Mar 13, 2024 - May 13, 2024
एखाद्या तीर्थक्षेत्राला भेट द्याल. तुमचं वागणं रोमँटिक आणि प्रभावशाली असेल आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या ओळखीच्या माणसांशी मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित करण्यास आणि ज्यांना तुम्ही ओळखत नाही, अशांशी संपर्क साधण्यास मदत होईल. तुमची थोडीफार इच्छापूर्ती होईल. म्हणजेच एखाद्या व्यवहारातून तुम्हाला आर्थिक लाभ होईल अथवा कामच्या ठिकाणी बढती मिळेल. वाहनखरेदी अथवा मालमत्तेची खरेदी कराल. एकूणच हा काळ अत्यंत अनुकूल असा आहे.
May 13, 2024 - May 31, 2024
हा कालावधी मिश्र घटनांचा राहील. तुम्ही काही प्रभावशाली व्यक्तिमत्वांना आकर्षित करू शकाल, आणि त्या व्यक्ती तुमच्या योजना आणि प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी सहाय्य करण्यास तयार असतील. तुमच्या कष्टांचे चीज होण्यासाठी तुम्हाला फार काळ वाट पाहावी लागणार नाही. तुमच्या भावंडांमुळे काही समस्या किंवा तणावाचे प्रसंग उद्भवतील. तुमच्या पालकांच्या आरोग्याच्या तक्रारी सुरू होण्याची शक्यता असल्यामुळे त्यांच्याकडे अधिक लक्ष पुरविण्याची आवश्यकता आहे. काही धार्मिक कार्य होण्याची शक्यता. आर्थिक बाबींचा विचार करता हे वर्ष लाभदायी असले.
May 31, 2024 - Jul 01, 2024
हा तुमच्यासाठी आर्थिक स्थैर्याचा कालावधी आहे. या काळात तुम्ही तुमची इच्छापूर्ती आणि महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू शकता. प्रेम आणि रोमान्ससाठी हा अनुकूल काळ आहे. या काळात तुमच्या नवीन ओळखी होतील आणि त्या तुमच्यासाठी लाभदायी आणि उपयुक्त असतील. समजाकडून तुमचा आदर आणि सन्मान केला जाईल आणि विरुद्ध लिंगाच्या व्यक्तींमध्ये तुम्ही लोकप्रिय व्हाल. दूरचा प्रवास संभवतो.
Jul 01, 2024 - Jul 22, 2024
व्यावसायिक आघाडीवर फार उत्साहवर्धक काही घडत नसले तरी त्याचा फार मनस्ताप करून घेणं टाळून थोडा आराम करायला शिका. अचानक भावनेच्या आहारी जाऊन किंवा अपेक्षाभंगामुळे नोकरी सोडण्याची इच्छा दूर करण्याचा प्रयत्न करा. निष्काळजीपणा किंवा दुर्लक्ष केल्यामुळे काही अडचणींचा सामना किंवा अडचणीची परिस्थिती उद्भवू शकते. अपघातासारखे काही प्रसंग ओढवू शकतात आणि आरोग्याची काळजी घेणेही गरजेचे आहे. कौटुंबिक आयुष्यात ताण-तणावर निर्माण होतील आणि लैंगिक विकार होणार नाहीत, याची काळजी घ्या.
Jul 22, 2024 - Sep 15, 2024
हा काळात तुम्ही तुमच्या कारकीर्दीत मोठी झेप घ्याल. तुमचे सहकारी/भागिदारांकडून तुम्हाला लाभ होईल. अनैतिक मार्गाने पैसा कमावण्याकडे तुमचा कलजाईल. तुमची स्वयंशिस्त, स्वयंनिरीक्षण आणि स्वयंनियंत्रण हे तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. वरिष्ठ आणि अधिकारी व्यक्तींशी तुमचे मैत्रीपूर्ण संबंध राहतील आणि त्याचप्रमाणे तुमचे औद्योगिक वर्तुळ वाढेल. आरोग्याच्या तक्रारीमुळे तुमची मन:शांती ढळेल.
Sep 15, 2024 - Nov 02, 2024
वेळ आणि दैव तुमच्या बाजूने असेल तुमच्या कार्याला प्रसिद्धी मिळवून देईल. ही अशी वेळ आहे की तुम्हाला तुमच्या कामाचे श्रेय मिळालेच पाहिजे आणि इतरही तुमच्याकडून प्रेरणा घेतील. तुमच्या व्यक्तिगत संबंधांमध्ये वृद्धी होईल, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. मुलांकडून तुम्हाला आनंद मिळेल. प्रवास घडेल आणि अनेकांना तुमचा सहवास हवा असेल. या काळात तुम्ही ध्यान कराल आणि मानवी अस्तित्वाविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न कराल. एखादे मौल्यवान संपत्ती तुम्ही विकत घ्याल. एकूणच हा काळ तुमच्यासाठी अनुकूल आणि चांगला मोबदला देणारा असेल.
Nov 02, 2024 - Dec 30, 2024
ही चांगल्या कालावधीची सुरुवात असू शकते. तुमच्या हातून सत्कार्य घडेल. या काळात तुम्ही अत्यंत आनंदी असाल. विपरित परिस्थितीसुद्धा चांगल्या प्रकारे हाताळू शकाल. कौटुंबिक सौख्य लाभेल. तुमच्या भावंडांना थोडाफार त्रास सहन करावा लागू शकतो. तुमच्या स्वत:च्या प्रयत्नांमुळे तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. तुमचे शत्रू तुम्हाला दुखवू शकणार नाहीत. आरोग्याच्या थोड्याशा कुरबुरी राहतील. तुमच्या छंदांसाठी तुमचे मित्र आणि सहकारी मदत करतील.
Dec 30, 2024 - Feb 20, 2025
तुम्ही नेहमीच सकारात्मक दृष्टीकोन बाळगून असता आणि या वर्षातील घटना तुमच्या सकारात्मक दृष्टिकोनात भरच घालतील. तुमच्या राशीला उत्तम कालखंडात तुम्ही गुंतवणूक केलीत तर तुम्हाला चांगला फायदा होऊ शकेल. तुमच्या जवळच्या व्यक्ती आणि सहकाऱ्यांकडून सहकार्य आणि आनंद मिळेल. विरोधकांवर मात करू शकाल आणि लग्न किंवा रोमँटिक प्रसंगांमुळे देण्यात येणारी पार्टी असे काही प्रसंग घडतील. कौटुंबिक आयुष्य समाधानी राहील.
Feb 20, 2025 - Mar 13, 2025
तुमच्या फिरण्याच्या आंतरिक इच्छेमुळे तुम्ही या काळात चंचल असाल. तुम्हाला एका कोपऱ्यात बसणे आवडत नाही. त्यामुळे तुम्हाला थोडा त्रास होईल. धार्मिक कार्यांकडे तुमचा ओढा असेल आणि तुम्ही तीर्थ पर्यटन कराल. हा काळ तुमच्यासाठी स्फोटक असेल आणि कारकीर्दीत दबाव निर्माण होईल. तुमचे जेक बॉल ्तेष्ट आणि नातेवाईक यांच्याशी असलेल्या नात्यात दुरावा निर्माण होईल. रोजच्या कामाकडे नीट लक्ष द्या. तुमच्या कुटुंबियांच्या अपेक्षा पूर्ण करणे कठीण होईल. कोणत्याही प्रकारच्या उद्योगात शिरण्याची ही वेळ नव्हे. तुमच्या आईसाठी हा कसोटीचा काळ असणार आहे.