अचानक आर्थिक नुकसान संभवते. प्रयत्न अपयशी ठरल्यामुळे तुम्ही निराश व्हाल. कामाचा दबाव खूप असल्याने प्रचंड कष्ट करावे लागतील. बाहेरच्या जमिनींतून तुम्ही विस्थापित व्हाल, तिथून रवानगी होईल किंवा त्याबाबत समस्या उद्भवतील. कुसंगत जडण्याची शक्यता आहे, त्यामुळे सावध राहा. आरोग्य कमकुवत राहील आणि तुम्हाला अनेक विकार होण्याची शक्यता आहे. तुमच्या सामाजिक स्थानालाही धक्का पोहोचण्याची शक्यता आहे. समाजातील चांगल्या व्यक्तींसोबत वाद होतील.
Apr 18, 2025 - May 18, 2025
पैशाचा अपव्यय होईल. प्रेम, रोमान्स आणि आयुष्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन हा फार प्रोत्साहनपर असणार नाही. आय़ुष्यात येणाऱ्या विविध प्रसंगांना शांतपणे आणि समजूतदारपणे सामोरे जावे, हाच सल्ला आहे. कोणत्याही क्षेत्रात केवळ अंदाजावरून काम करू नका, त्यामुळे ते टाळणेच योग्य राहील. डोळे, प्लीहा या अवयवांशी निगडीत विकार उद्भवण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे तुम्ही या काळात निरुत्साही असण्याची शक्यता आहे. असत्य वागणूकीमुळे तुम्ही स्वत:ला संकटात टाकण्याची शक्यता आहे.
May 18, 2025 - Jun 08, 2025
या वर्षी केवळ एक घटक टाळा तो म्हणजे अति-आत्मविश्वास. घरावर आणि कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यविषयक तक्रांरींवर जरा अधिक खर्च होईल. कौटुंबिक नाती जपण्याकडे कल असू दे. तुमचे कच्चे दुवे शोधून त्यांचा गैरवापर करण्याचा प्रयत्न होईल, त्यामुळे तुम्हाला मनस्ताप होण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदारामुळे तुमच्या आयुष्यात तणाव निर्माण होईल किंवा तुमच्या प्रेमभावनांना ठेच पोहोचण्याची शक्यता आहे. तुमचा प्रवास व्यर्थ जाईल आणि त्याने नुकसान होण्यीचच शक्यता आहे.
Jun 08, 2025 - Aug 02, 2025
जबाबदार किंवा प्रभावशाली व्यक्तिमत्वांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. व्यावसायिक दृष्ट्या तुम्ही खूप प्रगती कराल. उद्योग अथवा व्यवसायात समृद्धी लाभेल आणि नोकरी करत असाल तर बढती मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या आणि घरी मोठी जबाबदारी घ्यावी लागेल. कामाच्या ठिकाणी किंवा प्रवास करताना समविचारी व्यक्तींची भेट होईल. तुमच्या बहीण-भावांशी तुमचे नाते चांगले राहील. पण तुमच्या भावंडांना काही समस्यांचा सामना करावा लागेल.
Aug 02, 2025 - Sep 20, 2025
तुमच्या व्यक्तिगत आय़ुष्यात, कामाच्या ठिकाणी, मित्रांसमवेत आणि कुटुंबियांसोबत सलोख्याचे संबंध कसे ठेवावेत, यासंबंधी नवीन मार्ग तुम्हाला सापडतील. तुम्ही तुमचे संवादकौशल्य सुधाराल आणि तुमच्या अंतर्मनाशी आणि तुमच्या खासगी गरजांशी प्रामाणिक राहिल्यामुळे त्याचा तुम्हाला योग्य तो मोबदला मिळेल. या काळात तुमच्या आयुष्यात होणारे बदल हे जाणवणारे आणि दीर्घकाळापर्यंत टिकणारे असतील. ज्यांनी तुमच्या कष्टांकडे दुर्लक्ष केले, असे तुम्हाला वाटत होते, तेच तुमचे खंदे सहकारी ठरतील. घरात एखादे धार्मिक कार्य घडेल. हा काळ तुमच्या मुलांसाठी समृद्धी, आनंद आणि यश घेऊन येईल.
Sep 20, 2025 - Nov 17, 2025
नशीबाची साथ आणि मानसिक स्थैर्य यामुळे तुमचे गृहस्थ जीवन सकारात्मक राहील. पत्नीच्या माध्यमातून लाभ होईल. प्रवास, उच्चशिक्षण, संवाद, नवीन उद्योगाची सुरुवात, व्यवसाय या दृष्टीने हे वर्ष अत्यंत अनुकूल आहे. या कालावधीत सगेसोयरे आणि नातेवाईक यांच्याशी वाद होतील आणि कदाचित शत्रुत्वही निर्माण होईल. व्यावसायिकदृष्ट्या तुम्हाला चांगले निष्कर्ष मिळतील. एकूणातच हा काळ अत्यंत अनुकूल असेल.
Nov 17, 2025 - Jan 07, 2026
प्रवासात तुम्ही तुमच्यासारख्या व्यक्तींना भेटाल आणि त्यांच्यासोबत खूप चांगला संवाद घडेल. तुमच्या व्यावसायिक आणि कौंटुबिक आयुष्याचा चांगल्या प्रकारे समतोल साधाल आणि दोन्ही ठिकाणी उत्तम प्रकारे जबाबदारी पार पाडाल. तुमच्या इच्छा खूप कष्टांनंतर पूर्ण होतील पण अखेर त्यातून तम्हाला समृद्धी, लोकप्रियता आणि चांगले उत्पन्न व लाभ मिळेल. जुन्या मित्रांशी भेट होईल. विरुद्ध लिंगी व्यक्तींचा सहवास लाभेल. वरिष्ठांकडून आणि प्रभावशाली व्यक्तींकडून सहकार्य मिळेल.
Jan 07, 2026 - Jan 29, 2026
स्वत:ला व्यक्त होण्यासाठी आणि सृजनशील क्षमतांचा उपयोग करण्यासाठी हा अत्यंत योग्य काळ आहे. तुमच्या कुटुंबात एखादे धार्मिक कार्य घडेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी आणि व्यावसायिक आयुष्यात असे काही अनपेक्षित बदल घडतील, जे तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक असतील. तुमच्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्यात सकारात्मक बदल घडतील आणि तुम्ही व्यवसायाच्या निमित्ताने प्रवास कराल आणि हा प्रवास फायद्याचा ठरेल. या अनुकूल काळाचा पुरेपूर लाभ घ्या. तुम्ही धार्मिक कार्यक्रमांना हजेरी लावाल आणि आदरणीय धार्मिक व्यक्तींच्या संपर्कात याल.
Jan 29, 2026 - Mar 30, 2026
माणसं तुमचा आदर्श ठेवतील आणि सल्ला घेण्यासाठी तुमच्याकडे येतील. सगळ्या समस्या सुटू लागतील. या सर्व काळ तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल आणि उर्जेचा राहील. हा काळ दैव, क्षमता आणि धाडसाचा असणार आहे. वरिष्ठाकंडून तुम्हाला ऐहिक लाभ मिळेल. त्यामुळे नवीन प्रयत्न करण्यासाठी आणि नवीन ठिकाणी प्रवास करण्यासाठी हा अत्यंत अनुकूल काळ आहे. तुम्ही अनेकांशी संबंध जोडाल आणि यातून चांगल्या प्रकारची देवाण-घेवाण होईल. हा कालावधी तुमच्या भावंडांसाठी आनंद आणि यश घेऊन येईल.
Mar 30, 2026 - Apr 18, 2026
प्रकृती नाजूक असल्यामुळे शारीरिक थकवा येणारे काम करू शकणार नाही. तुमच्या हातून काही अविवेकी काम होण्याची शक्यता. तुम्ही शेती करत असाल तर आर्थिक नुकसान संभवते. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्रास होण्याची शक्यता. आईच्या आजारपणामुळे चिंताग्रस्त राहाल. राहत्या घरी तुम्हाला नको असलेला बदल संभवतो. निष्काळजीपणे वाहन चालवू नका.