जेरी ली लेविस
Sep 29, 1935
15:0:0
91 W 32, 31 N 37
91 W 32
31 N 37
-6
Unknown
खराब डेटा
एखाद्या वादाच्या दोन्ही बाजू जाणून घेण्यास तुम्हाला आवडते, त्यामुळे कायदा आणि न्यायक्षेत्र ही तुमच्यासाठी उत्तम कार्यक्षेत्रे असतील. कामगार मध्यस्थीचे एखादे पद तुम्ही चांगल्या प्रकारे भूषवाल आणि ज्या ठिकाणी शांतता आणि एकजूट राखायची असल्यास तुम्हाला पाचारण केले जाईल, असे क्षेत्र तुमच्यासाठी चांगले राहील. ज्या ठिकाणी ताबडतोब आणि सतत निर्णय घ्यावे लागतात, असे कार्यक्षेत्र निवडू नका, कारण तुम्हाल चटकन निर्णय घेणे कठीण जाते.
ज्या कामात नियमित आणि बुद्धिचा वापर करून पुढे वाटचाल करावी लागत असेल, ते कार्यक्षेत्र तुम्हाला समाधान, विशेषतः मध्यम आणि उतारवयात समाधान मिळवून देईल. तुमची निर्णयक्षमता चांगली आहे आणि तुम्ही जे करता ते परिपूर्ण करता. तुम्हाला शांतपणे काम करण्यास आवडते. घाई-गडबड तुम्हाला पसंत नाही. तुम्ही पद्धतशीर काम करता आणि तुमचा स्वभाव शांत असल्यामुळे तुम्ही एखाद्या अधिकारपदावर काम करता आणि तुमच्या हाताखाली काम करणाऱ्यांची विश्वास तुम्ही संपादन कराल. तुमच्यात आर्थिक क्षेत्रात नेतृत्व गाजविण्याची क्षमता आहे त्यामुळे तुम्ही बँकिंग क्षेत्रात, वित्त कंपनीत किंवा स्टॉक ब्रोकर (शेअर दलाला) म्हणून उत्तम काम करू शकाल. फक्त ते कार्यालयीन काम तुमच्या स्वभावाला साजेसे असणे आवश्यक आहे.
कोणत्याही क्षेत्रात, व्यवसायात किंवा दुसऱ्यांना नोकरी मिळवून देण्याच्या व्यवसायातून पैसा कमविण्याची तुमची क्षमता आहे. तुम्ही कोणत्याही समस्येतून बाहेर पडाल, स्वावलंबी असाल आणि जे काही करण्याचे तुम्ही ठरविले आहे त्याबाबत तुम्ही निश्चयी असाल. तुम्ही जे काही कराल त्याचा अंदाज वर्तवू शकाल. तुम्ही आयुष्याकडे गंभीरपणे न पाहाता ते खेळीमेळीने जगाल. तुमच्या आयुष्याच्या बराचशा कालावधीत नशीब तुमच्या बाजूने असेल. आर्थिक बाबतीत तुम्हाला काळजी करण्यासारखे काहीही नाही. तुमच्या आयुष्याचा सुरुवातीचा भाग सरला की तुम्ही पुढे जाण्यास सुरुवात कराल आणि पाया निर्माण कराल आणि त्या बिंदूपासून तुम्ही संपत्ती आणि स्थान निर्माण करण्यात यशस्वी व्हाल.