तुमच्या कामाच्या ठिकाणी, मित्रांसोबत आणि कुटुंबामध्ये एकोपा राखण्यासाठी काय करावे लागेल, याचे मार्ग तुम्हाला सापडतील. मित्र आणि तुमच्या भावांमुळे तुम्हाला लाभ होईल. राजघराण्यांकडून किंवा उच्च अधिकाऱ्यांकडून तुम्हाला मदत मिळेल. तुमच्या आय़ुष्यात होणारे बदल हे सखोल आणि चिरंतन टिकणारे असतील. तुमच्या इच्छा पूर्ण होतील.
Jun 28, 2024 - Jul 17, 2024
तुम्ही या काळात जोशपूर्ण असाल. तुम्ही काहीसे धाडसी आणि आक्रमक असाल. मानसिक तोल ढळण्याची शक्यता आणि तरतमभाव ठेवणे कठीण जाईल. तुमची लोकप्रियता कमी होईल आणि भांडणामुळे अडचणीत येण्याची शक्यता. प्रेमासाठी हा कालावधी प्रतिकूल आहे. जोडीदार आणि पाल्यांचे आरोग्य सांभाळा. या काळात अपत्यप्राप्ती होण्याची शक्यता आणि वरिष्ठांकडून लाभ संभवतो.
Jul 17, 2024 - Aug 16, 2024
आर्थिक लाभ मिळविण्यासाठी हा उत्तम कालावधी आहे. काही अनपेक्षित चांगल्या घटना घडू शकतात. या कालावधीत अनेक कौटुंबिक कार्यक्रमही संभवतात. हा तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल कालावधी आहे. महिलांकडून आणि तुमच्या वरिष्ठांकडून लाभ होण्याची शक्यता. आर्थिक बाबींचा विचार करता हा कालावधी फलदायी ठरणार आहे.
Aug 16, 2024 - Sep 06, 2024
या कालावधीत शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या धाडसी असाल. तुमच्या नातेवाईकांसाठी विशेषत: जोडीदारांसाठी हा अनुकूल कालावधी आहे. तुमच्या करिअरमध्ये तुम्ही प्रयत्न करू शकता कारण यश निश्चित आहे. भौतिक वस्तुंचा तुमच्या आयुष्यात समावेश होईल. तुमचे विरोधक यात अडथळे निर्माण करू शकणार नाहीत. या काळात तुमच्या इच्छा पूर्ण होतील. तुमचा विजय निश्चित आहे.
Sep 06, 2024 - Oct 31, 2024
नवीन प्रकल्प किंवा मोठी गुंतवणूक टाळावी. व्यावसायिक म्हणून काम करत असाल तर हे वर्ष साधारणच राहील. नियमित अडथळे जाणवतील आणि साधारण वाढ होईल. निश्चित अशा प्रगतीसाठी वाट पाहावी लागेल. अस्थैर्य आणि संशयास्पद समय आहे. कोणताही बदल करू नका कारण तो तुम्हाला घातक ठरेल. या काळात तुमची पत काहीशी घसरेल. घरचा विचार करता काही असुरक्षितता जाणवेल.
Oct 31, 2024 - Dec 19, 2024
तुमच्या कुटुंबियांशी अधिक सखोल नाते निर्माण व्हावे, अशी तुमची इच्छा आहे. नवनवीन कल्पनांचा शोध घेणे, तुम्ही तुमच्या पालकांकडून शिकला आहात. कुटुंबात एकोपा राहील. तुमची नीतीमूल्ये आणि आदर्श राहणीमानामुळे तुम्हाला अनेक आशीर्वाद मिळतात. तुमच्या या उर्जेमुळे तुमचा जोडीदार आणि नातेवाईक यांना काकणभर अधिक सुख मिळते. या काळात तुमच्या आयुष्यात होणारे बदल हे जाणवणारे आणि दीर्घकाळापर्यंत टिकणारे असतील. तुम्ही तुमची एक गाडी विकून दुसरी घ्याल किंवा गाडी विकून तुम्हाला फायदा होईल.
Dec 19, 2024 - Feb 15, 2025
नवीन नाते/मैत्री सुरू करण्यासाठी हा चांगला कालावधी नाही. तुमच्या व्यावसायिक किंवा खासगी आयुष्यात काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित होतील, ज्यामुळे तुम्ही चिंताग्रस्त व्हाल. नकारात्मक राहण्यापेक्षा सकारात्मक राहणे कधीही चांगले. प्रेमप्रकरणात काहीशी उदासीनता निर्माण होईल. घरी अपत्याच्या आगमनाची शक्यता असल्यामुळे आनंदी वातावरण राहील. नवीन नातेसंबंध फारसे वृद्धिंगत होणार नाहीत, उलट त्यामुळे काही वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. वारा आणि थंडीशी संबंधित आजार होतील. या काळाच्या शेवटी मानसिक स्थैर्य लाभेल.
Feb 15, 2025 - Apr 07, 2025
तुमच्या आजुबाजूच्या माणसांना तुमचे मूल्य कळेल आणि त्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल, तसेच तुम्ही सतत तुमच्या क्षमतेच्या 100 टक्के काम करता हा दुसऱ्यांना प्रेरीत करणारा घटक असेल. प्रवास करण्यास हा अत्यंत अनुकूल काळ आहे. तुमच्याकडे येणाऱ्या सुखाचा उपभोग घ्या. अखेर तुम्ही यशाची फळें चाखू शकता आणि तुमच्या कष्टाचे चीज होण्याचा हा काळ आहे. तुम्ही प्रसिद्ध व्यक्तींच्या सहवासात याल. तुमची अपत्याची इच्छा पूर्ण होईल. तुमच्या कल्पकतेची प्रशंसा होईल.
Apr 07, 2025 - Apr 29, 2025
या काळात तुम्ही धार्मिक कार्य कराल आणि तुमची वागणूक चांगली असेल. तुम्ही धर्म आणि अध्यात्म यात रुची घ्याल. या वर्षी खासगी आणि व्यावसायिक आयुष्यात तुम्हाला भागिदारी लाभदायी ठरेल. महत्त्वाचे म्हणजे इतकी वर्षे तुम्ही ज्या आयुष्य बदलून टाकणाऱ्या बदलाची वाट पाहात होतात, तो बदल आता घडणार आहे. या काळात तुम्हाला अधिकार प्राप्त होईल. कामाच्या ठिकाणी, मित्रांसमवेत आणि कुटुंबियांशी चांगले संबंध कसे ठेवावेत याबाबत तुम्ही नवीन धडे घेत आहात. कौटुंबिक वर्तुळात आनंद असेल.
Apr 29, 2025 - Jun 29, 2025
तुमच्यावर आणि तुमच्या कार्यावर प्रकाश पडेल. ही अशी वेळ आहे की तुम्हाला तुमच्या कामाचे श्रेय मिळालेच पाहिजे. तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडाल आणि तुमचे पालक, भावंड आणि नातेवाईक यांच्याशी जवळीक साधाल. संवादातून तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकेल. हीच लय कायम ठेवा आणि क्षमतेवर विश्वास ठेवा, या वर्षात तुम्हाला एक वेगळीच ओळख मिळेल. दूरचा प्रवास फलदायी असेल. या कालावधीत तुम्ही उच्चभ्रू जीवन जगाल.