तुम्ही समृद्धीचा आनंद घ्याल. या ठिकाणी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण झालेल्या असतील आणि तुम्ही एक तृप्त आयुष्य जगाल. तुमची लोकप्रियता आणि पत वृद्धिंगत होईल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी बढती मिळेल आणि प्रतिष्ठा उंचावेल. मंत्री आणि शासनाची तुमच्यावर मर्जी असेल. तुम्ही नातेवाईकांना आणि समाजाला मदत कराल.
Apr 24, 2024 - Jun 21, 2024
नोकरीच्या संदर्भातली कामे फार आशादायक नसतील आणि समाधानकारकही नसतील. कामाच्या ठिकाणी अशांत वातावरण असेल आणि फार दबाव असेल. धोका पत्करण्याच्या वृत्तीला पूर्ण आवर घालावा. कोणतेही मोठे काम करण्याचे टाळा. एक व्यावसायिक म्हणून काम करत असाल तर या वर्षी तुम्हाला अनेक अडथळ्यांचा आणि आव्हानांचा सामना करावा लागेल. अस्थैर्य आणि गोंधळाचे वातावरण असेल. तुमच्या कटुलू रवि कुमार ्तेष्टांकडून पूर्ण सहकार्य मिळणार नाही. तुमच्याविरोधात कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे. तुमच्या जवळची माणसे तुम्हाला दु:ख देतील. अपत्यांशी संबंधित कामांमध्ये समस्या निर्माण होतील. या काळात शांतच राहा आणि बदल टाळा.
Jun 21, 2024 - Aug 12, 2024
आरोग्याच्या तक्रारी वाढतील. आरामदायी वस्तुंवर आणि शानशौकीच्या वस्तुंवर खर्च करण्याच्या तुमच्या सवयीमुळे पैसा राखणे कठीण असेल. सट्टेबाजारातील व्यवहारांसाठी हा चांगला काळ नाही. लहानसहान गोष्टींवरून भांडणे, गैरसमज, वाद यामुळे कौटुंबिक शांतता आणि प्रसन्नता ढासळेल. तुमचा द्वेष करणाऱ्या व्यक्ती समस्या तयार करतील, तुमच्यावर कोणताही आधार नसतानाही आरोप होतील आणि तुमच्या कुटुंबाला दु:खी करतील, त्यांच्यापासून सावध राहा. तुम्हाला महिलांकडून त्रास होईल, त्यामुळे सावधानता बाळगा.
Aug 12, 2024 - Sep 02, 2024
हा काळ तुमच्यासाठी फार अनुकूल नाही. तुमच्याकडून अनावश्यक खर्च होईल पण तुम्हाला त्यावर आवर घालावा लागेल. कोणत्याही प्रकारचा सट्टा खेळू नका. कामाचा दबाव खूप असल्याने प्रचंड कष्ट करावे लागतील. उद्योगात कोणताही धोका पत्करू नका कारण हा काळ तुमच्यासाठी फार अनुकूल नाही. तुमचे शत्रू तुमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करतील. कौटुंबिक वातावरणही फार एकोप्याचे नसेल. या मनस्तापाचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होईल. मंत्र आणि अध्यात्मिक कार्याकडे तुमचा कल राहील.
Sep 02, 2024 - Nov 02, 2024
जे व्यक्तीगत संबंध प्रस्थापित करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत होतात, त्यात तुमच्या घरच्या आणि कार्य़ालयीन कामामुळे फारसे यश येणार नाही. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि तुमची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करा. विषयासक्त विचार तुम्हाला खच्ची करतात. त्याचबरोबर त्यामुळे तुमची मानहानी होण्याचीही शक्यता आहे. विरुद्ध लिंगी व्यक्तींशी असलेले संबंध बिघडण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या कुरबुरींमुळे मनस्ताप होईल. अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे. एकूणातच हा फार अनुकूल काळ नाही. शारीरिकदृष्ट्या कमकुवत व उद्विग्न वाटेल.
Nov 02, 2024 - Nov 20, 2024
हा तुमच्यासाठी कठीण समय आहे. नशीबाचे दान तुमच्या विरुद्ध पडत आहे. उद्योगातील भागिदारांकडून अडथळे निर्माण होण्याची शक्यता. व्यवसायाच्या निमित्ताने केलेले प्रवास फारसे लाभदायी टरणार नाहीत. स्थानिक पातळीवर रागावर संयम ठेवा आणि कोणत्याही अडचणीचा प्रसंग उद्भवणार नाही, याची काळजी घ्या. जोडीदाराच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे चिंता वाढेल. तुम्हालाही शारीरिक व मानसिक तणाव संभवतो. डोकेदुखी, डोळे, पाय आणि खांदेदुखी होण्याची शक्यता.
Nov 20, 2024 - Dec 21, 2024
तुमच्याकडे भरपूर संधी चालून येणार असल्या तरी त्यांचा लाभ उठवता येणार नाही. तुमच्या किंवा तुमच्या पालकांच्या आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे तुमची स्वत:ची आणि तुमच्या पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या. दूरचे प्रवास संभवतात, पण ते टाळलेलेच बरे कारण त्यातून कोणताही फायदा संभवत नाही. हा तुमच्यासाठी मिश्र घटनांचा कालवधी आहे. लोकांशी आणि तुमच्या सहकाऱ्यांशी भांडणाची शक्यता. सर्दी किंवा तापासारखे विकार संभवतात. कोणत्याही निश्चित कारणाशिवाय मानसिक तणाव राहील.
Dec 21, 2024 - Jan 11, 2025
हा तुमच्यासाठी अत्यंत समृद्धीचा काळ आहे. त्यामुळे याचा पूर्णपणे फायदा घेण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला ताणापासून आणि अडचणींपासून दिलासा मिळेल. कुटुंबातील व्यक्ती आणि सहकाऱ्यांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल. वाहन चालवताना काळजी घ्या. तुमच्या आक्रमकतेमुळे आणि विरोधकांना नेस्तनाभूत करण्याच्या मनस्थितीमुळे विरोधक तुम्हाला सतावणार नाहीत. तुम्ही धाडसाने सर्व कामे पूर्ण कराल आणि व्यावसायिक स्तरावरही तुमची प्रगती होईल.
Jan 11, 2025 - Mar 07, 2025
फायदेशीर व्यवहार कराल. कर्जासाठी अर्ज केला असेल तर कर्ज मंजूर होईल. आरोग्याच्या थोड्याशा कुरबुरी राहतील. व्यावसायिक आणि खासगी आयुष्यात समतोल साधाल आणि आयुष्याच्या या दोन्ही महत्त्वाच्या अंगांकडे तुम्ही उत्तम प्रकारे लक्ष पुरवाल. खूप कष्टांनंतर तुमच्या इच्छा पूर्ण होतील, आणि अखेर तुम्हाला समृद्धी, उत्पन्न आणि लाभ मिळेल. स्पर्धेत विजेते ठराल आणि मुलाखतींमध्ये यशस्वी व्हाल.
Mar 07, 2025 - Apr 24, 2025
तुमच्या आरोग्याबाबत तुमचे सजग असणे, आरोग्याची काळजी घेणे आणि गरजा पुरवणे यामुळे तुमची उर्जा अधिक चांगल्या प्रकारे तुम्ही वापरू शकता, कदाचित एखाद्या मैदानी खेळात भाग घेणे उचित ठरेल. तुमच्या उर्जेमुळे तुम्हाला अनेकांचे सहकार्य मिळेल. तुमच्या आनंदात आणि यशात तुमच्या जोडीदाराचा सहभाग असेल. कामाच्या ठिकाणी तुम्ही नेतृत्व स्वीकारावे, यासाठी तुम्हाला पाचारण करण्यात येईल. तुम्हाला आदर-सन्मान मिळेल आणि तुम्ही प्रसिद्ध व्हाल.