लारा दत्ता
Apr 6, 1978
19:30:00
Ghaziabad
77 E 26
28 N 40
5.5
Lagna Phal (Garg)
संदर्भ (आर)
तुम्हाल आयुष्याचा आनंद उपभोगायचा असेल तर तुम्ही लग्न केले पाहिजे याबाबत कोणतेही दुमत नाही. एकांतवास आणि एकाकीपणा हे तुमच्यासाठी मृत्यूसारखेच आहेत आणि सहचर्याचा विचार करता तुम्ही एक मोहक व्यक्ती आहात. तुम्हाला तरूण व्यक्तीशी लग्न करायचे आहे. यासाठी तुम्ही अशा व्यक्तीसोबत लग्न केले पाहिजे जी एक जोडीदार म्हणून उत्साही आणि हसतखेळत वागणारी असेल. तुम्हाला अत्यंत नीटनेटके आणि ज्यातून कोणत्याही प्रकारचा अजागळपणा दिसणार नाही असे घर आवडते.
तुम्ही कसे वागता यावर तुम्ही किती वर्ष जगाल हे अवलंबून आहे. तुमच्यात दीर्घायुष्य जगण्याची क्षमता आहे. हे प्रत्यक्षात उतरवायचे असेल तर तुम्हाला तुमच्या फुफ्फुसांची काळजी घेणे आवश्यक आहे. जेवढी ताजी हवा घेऊ शकता, तेवढी घ्या आणि मोकळ्या हवेत जेवढे राहता येईल तेवढे राहण्याचा प्रयत्न करा. नियमित चालण्याचा सराव करा आणि चालताना डोके वर आणि छाती पुढे असू दे. सर्दी आणि खोकल्याकडे दुर्लक्ष करू नका. आर्द्रता तुमच्यासाठी खूपच अपायकारक आहे. त्याचप्रमाणे तुमच्या पचनाकडेही लक्ष द्या. पचण्यास जड अन्न खाऊन पचनसंस्थेवर जास्त ताण देऊ नका. सपक आहार सर्वात उत्तम.
तुम्हाला आयष्याची मजा घेणे आवडते आणि कामामुळे तुम्हाला त्या आनंदावर विरजण घालावे लागले तर तुम्हाला चीड येते. जास्तीत जास्त वेळ मोकळ्या हवेत घालवता यावा यासकडे तुमचे लक्ष असते आणि अर्थात हा तुमचा एक चांगला गुण आहे. ज्या खेळांमध्ये फार श्रम करावे लागतात, असे खेळ तुम्हाला आवडत नाहीत. पण चालणे, वल्हवणे, मासेमारी आणि निसर्गभ्रमण करणे या अॅक्टिव्हिटीज तुम्हाला आवडतात.