ल्यूक रोन्ची
Apr 23, 1981
0:0:0
Dannevirke
176 E 8
40 S 12
12
Web
संदर्भ (आर)
तुम्हाला एकट्याने आयुष्य व्यतीत करणे आवडणार नाही आणि जसजसे तुमचे वय वाढत जाईल तसतसा तुमचा आनंद आणि दुःख वाटून घेण्यासाठी तुम्हाला जोडीदाराची आवश्यकता भासेल. तुम्ही तुमचे घर स्वतः रचाल आणि लग्न केल्यानंतर तुमच्या घराला पूर्णत्व येईल. तुमचे घर हाच तुमचा देव असेल. जर तुम्ही स्त्री असाल तर मुले झाल्यानंतर तुम्ही पूर्ण आनंदी व्हाल. तुम्ही अर्थातच प्रेमासाठी लग्न कराल आणि जसजशी वर्ष सरत जातील तुम्ही तुमच्या जोडीदाराचा जास्तीत जास्त िवचार कराल आणि एक वेळ अशी येईल की तुम्ही एक-दोन दिवसांचा विरहसुद्धा सहन करू शकणार नाही.
तुम्ही दणकट आहात असे म्हणणे ही दिशाभूल ठरेल. असे असले तरी थोडीशी काळजी घेतली तर तुम्ही दीर्घायुषी आयुष्य जगू शकाल. दोन गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे. अपचन आणि संधिवात. अपचनासंदर्भात सांगायचे झाले तर भराभर जेवू नका, शांतपणे जेवा. त्याचप्रमाणे दिवसातून नियमित वेळा आहार घ्या. जोपर्यंत तुम्ही आर्द्र हवेत किंवा थंड वाऱ्यांच्या सानिध्यात किंवा ओले पाय करून राहत नसाल तर संधिवाताची काळजी करण्याची गरज नाही.
वाचन, चित्रकला, नाटक आणि अशा प्रकारचे मनोरंजन जे कलापूर्ण किंवा साहित्यिक अनुभव देत असेल ते तुमच्या मनात भरेल. तुम्हाला अचानक अध्यात्माची किंवा अद्भूत गोष्टींचे आकर्षण वाटायला लागले तर त्यात आश्चर्य वाटायला नको. कोणत्याही प्रकारचा प्रवास तुम्हाला आवडतो. क्रिकेट आणि फुटबॉलसारख्या खेळांसाठी तुम्ही फार कमी वेळ खर्च कराल. टेबल टेनिस, कॅरम आणि बॅडमिंटनसारखे इनडोअर खेळ खेळणे तुम्हाला आवडते.