तुमच्या आर्थिक आणि सामाजिक स्थानाच्या बाबतीत चढ-उतार संभवतात. आर्थिक आणि मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाजूंची नीट काळजी घ्या. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा कारण जवळचे सहकारी आणि नातेवाईक यांच्याशी वाद होण्याची शक्यता आहे. तुमच्या आऱोग्याकडेही लक्ष द्या कारण त्या बाबातीत आजारपण संभवते.
Jun 2, 2024 - Jun 21, 2024
तुम्ही या काळात जोशपूर्ण असाल. तुम्ही काहीसे धाडसी आणि आक्रमक असाल. मानसिक तोल ढळण्याची शक्यता आणि तरतमभाव ठेवणे कठीण जाईल. तुमची लोकप्रियता कमी होईल आणि भांडणामुळे अडचणीत येण्याची शक्यता. प्रेमासाठी हा कालावधी प्रतिकूल आहे. जोडीदार आणि पाल्यांचे आरोग्य सांभाळा. या काळात अपत्यप्राप्ती होण्याची शक्यता आणि वरिष्ठांकडून लाभ संभवतो.
Jun 21, 2024 - Jul 21, 2024
हा तुमच्यासाठी अनुकूल कालावधी आहे. तुमच्या विचारांबाबत तुम्हाला विश्वास असेल आणि बढती मिळण्याची दाट शक्यता आहे. अचानक प्रवास संभवतो आणि हा प्रवास तुम्हाला फलदायी ठरेल. भावंडांकडून आणि जोडीदाराकडून आनंद मिळेल. तुमच्या भावांसाठीसुद्धा हा अनुकूल काळ आहे. जागा किंवा व्यवसाय बदलण्याचा विचार टाळा.
Jul 21, 2024 - Aug 11, 2024
मित्र, नातेवाईक आणि सहकाऱ्यांशी काळजीपूर्वक वागा कारण वाद होण्याची शक्यता आहे. उद्योगासाठी हा चांगला कालावधी नाही आणि आर्थिक नुकसान संभवते. काही गुप्त कामांसाठी खर्च होण्याची शक्यता आहे. मानसिक तणाव आणि दु:ख सहन करावे लागेल. जखमा आणि घाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहन सांभाळून चालवा.
Aug 11, 2024 - Oct 05, 2024
जबाबदार किंवा प्रभावशाली व्यक्तिमत्वांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. व्यावसायिक दृष्ट्या तुम्ही खूप प्रगती कराल. उद्योग अथवा व्यवसायात समृद्धी लाभेल आणि नोकरी करत असाल तर बढती मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या आणि घरी मोठी जबाबदारी घ्यावी लागेल. कामाच्या ठिकाणी किंवा प्रवास करताना समविचारी व्यक्तींची भेट होईल. तुमच्या बहीण-भावांशी तुमचे नाते चांगले राहील. पण तुमच्या भावंडांना काही समस्यांचा सामना करावा लागेल.
Oct 05, 2024 - Nov 23, 2024
तुमच्या व्यक्तिगत आय़ुष्यात, कामाच्या ठिकाणी, मित्रांसमवेत आणि कुटुंबियांसोबत सलोख्याचे संबंध कसे ठेवावेत, यासंबंधी नवीन मार्ग तुम्हाला सापडतील. तुम्ही तुमचे संवादकौशल्य सुधाराल आणि तुमच्या अंतर्मनाशी आणि तुमच्या खासगी गरजांशी प्रामाणिक राहिल्यामुळे त्याचा तुम्हाला योग्य तो मोबदला मिळेल. या काळात तुमच्या आयुष्यात होणारे बदल हे जाणवणारे आणि दीर्घकाळापर्यंत टिकणारे असतील. ज्यांनी तुमच्या कष्टांकडे दुर्लक्ष केले, असे तुम्हाला वाटत होते, तेच तुमचे खंदे सहकारी ठरतील. घरात एखादे धार्मिक कार्य घडेल. हा काळ तुमच्या मुलांसाठी समृद्धी, आनंद आणि यश घेऊन येईल.
Nov 23, 2024 - Jan 20, 2025
या काळ तुमच्यासाठी फार अनुकूल नाही. आर्थिक बाबतीत समस्या जाणवतील. तुमच्या मणिरत्नम ्तेष्टांसोबत आणि नातेवाईकांसोबत असलेल्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. तुमच्या दैनंदिन आचरणाकडे लक्ष द्या. व्यवसायामध्ये फार धोका पत्करण्याचा हा काळ नाही कारण नुकसान होण्याची शक्यता आहे. तुमच्या पालकांच्या आजारपणामुळे तुम्ही त्रासलेले असाल. तुमच्या कुटुंबाच्या अपेक्षा तुम्ही पूर्ण करू शकणार नाही.
Jan 20, 2025 - Mar 12, 2025
तुमच्या आजुबाजूच्या माणसांना तुमचे मूल्य कळेल आणि त्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल, तसेच तुम्ही सतत तुमच्या क्षमतेच्या 100 टक्के काम करता हा दुसऱ्यांना प्रेरीत करणारा घटक असेल. प्रवास करण्यास हा अत्यंत अनुकूल काळ आहे. तुमच्याकडे येणाऱ्या सुखाचा उपभोग घ्या. अखेर तुम्ही यशाची फळें चाखू शकता आणि तुमच्या कष्टाचे चीज होण्याचा हा काळ आहे. तुम्ही प्रसिद्ध व्यक्तींच्या सहवासात याल. तुमची अपत्याची इच्छा पूर्ण होईल. तुमच्या कल्पकतेची प्रशंसा होईल.
Mar 12, 2025 - Apr 03, 2025
स्वत:ला व्यक्त होण्यासाठी आणि सृजनशील क्षमतांचा उपयोग करण्यासाठी हा अत्यंत योग्य काळ आहे. तुमच्या कुटुंबात एखादे धार्मिक कार्य घडेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी आणि व्यावसायिक आयुष्यात असे काही अनपेक्षित बदल घडतील, जे तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक असतील. तुमच्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्यात सकारात्मक बदल घडतील आणि तुम्ही व्यवसायाच्या निमित्ताने प्रवास कराल आणि हा प्रवास फायद्याचा ठरेल. या अनुकूल काळाचा पुरेपूर लाभ घ्या. तुम्ही धार्मिक कार्यक्रमांना हजेरी लावाल आणि आदरणीय धार्मिक व्यक्तींच्या संपर्कात याल.
Apr 03, 2025 - Jun 02, 2025
तुमच्यावर आणि तुमच्या कार्यावर प्रकाश पडेल. ही अशी वेळ आहे की तुम्हाला तुमच्या कामाचे श्रेय मिळालेच पाहिजे. तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडाल आणि तुमचे पालक, भावंड आणि नातेवाईक यांच्याशी जवळीक साधाल. संवादातून तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकेल. हीच लय कायम ठेवा आणि क्षमतेवर विश्वास ठेवा, या वर्षात तुम्हाला एक वेगळीच ओळख मिळेल. दूरचा प्रवास फलदायी असेल. या कालावधीत तुम्ही उच्चभ्रू जीवन जगाल.