अचानक आर्थिक नुकसान संभवते. प्रयत्न अपयशी ठरल्यामुळे तुम्ही निराश व्हाल. कामाचा दबाव खूप असल्याने प्रचंड कष्ट करावे लागतील. बाहेरच्या जमिनींतून तुम्ही विस्थापित व्हाल, तिथून रवानगी होईल किंवा त्याबाबत समस्या उद्भवतील. कुसंगत जडण्याची शक्यता आहे, त्यामुळे सावध राहा. आरोग्य कमकुवत राहील आणि तुम्हाला अनेक विकार होण्याची शक्यता आहे. तुमच्या सामाजिक स्थानालाही धक्का पोहोचण्याची शक्यता आहे. समाजातील चांगल्या व्यक्तींसोबत वाद होतील.
Sep 23, 2024 - Oct 14, 2024
हा तुमच्यासाठी संमिश्र घटनांचा काळ आहे. आऱोग्याच्या किरकोळ तक्रांरींकडे दुर्लक्ष करू नका. कारण या समस्यांचे भविष्यात गंभीर स्वरूपात रूपांतर होऊ शकते. अल्सर, संधीवात, मळमळ, डोक्याशी आणि डोळ्यांशी संबंधित तक्रारी, सांधेदुखी किंवा एखाद्या धातुमुळे होणारी जखम याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. तुमच्या मार्गात कठीण परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. परंतु, खच्चीकरण होऊ देऊ नका कारण तुमचा आत्मविश्वास तुमचे काम निभावून नेईल. सरकार किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वाद होण्यीच शक्यता आहे म्हणूनच या संदर्भात सतर्क राहण्याचा सल्ला आहे. सट्टेबाजारातील व्यवहार किंवा धोका पत्करण्यासाठी हा काळ अनुकूल नाही.
Oct 14, 2024 - Dec 08, 2024
हा काळात तुम्ही तुमच्या कारकीर्दीत मोठी झेप घ्याल. तुमचे सहकारी/भागिदारांकडून तुम्हाला लाभ होईल. अनैतिक मार्गाने पैसा कमावण्याकडे तुमचा कलजाईल. तुमची स्वयंशिस्त, स्वयंनिरीक्षण आणि स्वयंनियंत्रण हे तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. वरिष्ठ आणि अधिकारी व्यक्तींशी तुमचे मैत्रीपूर्ण संबंध राहतील आणि त्याचप्रमाणे तुमचे औद्योगिक वर्तुळ वाढेल. आरोग्याच्या तक्रारीमुळे तुमची मन:शांती ढळेल.
Dec 08, 2024 - Jan 25, 2025
काही त्रास आणि खच्चीकरण येऊ शकते, पण या परिस्थितीत तुम्ही वस्तुस्थितीकडे सकारात्मकतेने पाहणे गरजेचे आहे आणि कोणतेही काम अपूर्ण ठेवता कामा नये. कामाच्या ठिकाणी प्रत्येक बाबीचे सखोल अवलोकन करणे गरजेचे आहे. अचानक नुकसान संभवते. परदेशी संबंधांतून तुम्हाला फायदा होईल. आरोग्याच्या तक्रारींमुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. तुम्हाला फारसा फायदा करून न देणाऱ्या कामात गुंतावे लागेल. कुटुंबात काही कुरबुरी होतील. तुमचे शत्रू तुमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करतील. हा काळ तुमच्यासाठी फार अनुकूल नाही.
Jan 25, 2025 - Mar 24, 2025
ही चांगल्या कालावधीची सुरुवात असू शकते. तुमच्या हातून सत्कार्य घडेल. या काळात तुम्ही अत्यंत आनंदी असाल. विपरित परिस्थितीसुद्धा चांगल्या प्रकारे हाताळू शकाल. कौटुंबिक सौख्य लाभेल. तुमच्या भावंडांना थोडाफार त्रास सहन करावा लागू शकतो. तुमच्या स्वत:च्या प्रयत्नांमुळे तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. तुमचे शत्रू तुम्हाला दुखवू शकणार नाहीत. आरोग्याच्या थोड्याशा कुरबुरी राहतील. तुमच्या छंदांसाठी तुमचे मित्र आणि सहकारी मदत करतील.
Mar 24, 2025 - May 15, 2025
प्रवासात तुम्ही तुमच्यासारख्या व्यक्तींना भेटाल आणि त्यांच्यासोबत खूप चांगला संवाद घडेल. तुमच्या व्यावसायिक आणि कौंटुबिक आयुष्याचा चांगल्या प्रकारे समतोल साधाल आणि दोन्ही ठिकाणी उत्तम प्रकारे जबाबदारी पार पाडाल. तुमच्या इच्छा खूप कष्टांनंतर पूर्ण होतील पण अखेर त्यातून तम्हाला समृद्धी, लोकप्रियता आणि चांगले उत्पन्न व लाभ मिळेल. जुन्या मित्रांशी भेट होईल. विरुद्ध लिंगी व्यक्तींचा सहवास लाभेल. वरिष्ठांकडून आणि प्रभावशाली व्यक्तींकडून सहकार्य मिळेल.
May 15, 2025 - Jun 05, 2025
तुमच्या फिरण्याच्या आंतरिक इच्छेमुळे तुम्ही या काळात चंचल असाल. तुम्हाला एका कोपऱ्यात बसणे आवडत नाही. त्यामुळे तुम्हाला थोडा त्रास होईल. धार्मिक कार्यांकडे तुमचा ओढा असेल आणि तुम्ही तीर्थ पर्यटन कराल. हा काळ तुमच्यासाठी स्फोटक असेल आणि कारकीर्दीत दबाव निर्माण होईल. तुमचे मार्सेलो मेलो ्तेष्ट आणि नातेवाईक यांच्याशी असलेल्या नात्यात दुरावा निर्माण होईल. रोजच्या कामाकडे नीट लक्ष द्या. तुमच्या कुटुंबियांच्या अपेक्षा पूर्ण करणे कठीण होईल. कोणत्याही प्रकारच्या उद्योगात शिरण्याची ही वेळ नव्हे. तुमच्या आईसाठी हा कसोटीचा काळ असणार आहे.
Jun 05, 2025 - Aug 05, 2025
तुमच्यावर आणि तुमच्या कार्यावर प्रकाश पडेल. ही अशी वेळ आहे की तुम्हाला तुमच्या कामाचे श्रेय मिळालेच पाहिजे. तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडाल आणि तुमचे पालक, भावंड आणि नातेवाईक यांच्याशी जवळीक साधाल. संवादातून तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकेल. हीच लय कायम ठेवा आणि क्षमतेवर विश्वास ठेवा, या वर्षात तुम्हाला एक वेगळीच ओळख मिळेल. दूरचा प्रवास फलदायी असेल. या कालावधीत तुम्ही उच्चभ्रू जीवन जगाल.
Aug 05, 2025 - Aug 23, 2025
प्रकृती नाजूक असल्यामुळे शारीरिक थकवा येणारे काम करू शकणार नाही. तुमच्या हातून काही अविवेकी काम होण्याची शक्यता. तुम्ही शेती करत असाल तर आर्थिक नुकसान संभवते. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्रास होण्याची शक्यता. आईच्या आजारपणामुळे चिंताग्रस्त राहाल. राहत्या घरी तुम्हाला नको असलेला बदल संभवतो. निष्काळजीपणे वाहन चालवू नका.
Aug 23, 2025 - Sep 23, 2025
पैशाचा अपव्यय होईल. प्रेम, रोमान्स आणि आयुष्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन हा फार प्रोत्साहनपर असणार नाही. आय़ुष्यात येणाऱ्या विविध प्रसंगांना शांतपणे आणि समजूतदारपणे सामोरे जावे, हाच सल्ला आहे. कोणत्याही क्षेत्रात केवळ अंदाजावरून काम करू नका, त्यामुळे ते टाळणेच योग्य राहील. डोळे, प्लीहा या अवयवांशी निगडीत विकार उद्भवण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे तुम्ही या काळात निरुत्साही असण्याची शक्यता आहे. असत्य वागणूकीमुळे तुम्ही स्वत:ला संकटात टाकण्याची शक्यता आहे.