मॅथ्यू मॅककोनागेहे
Nov 4, 1969
19:34:00
Uvalde
99 W 46
29 N 12
-5
Web
संदर्भ (आर)
काम आणि खेळांबाबत तुम्ही जितके उत्साही असता तेवढेच उत्साही प्रेमाबाबतही असता. तुम्ही जेव्हा प्रेमात पडता तेव्हा तुम्हाला सतत त्या व्यक्तीचा सहवास हवा असतो. तुम्ही कामाकडे दुर्लक्ष करत नाही. पण जेव्हा काम संपते तेव्हा तुम्ही ठरवलेल्या ठिकाणी वेळत पोहचण्यासाठी घाई करता. लग्न झाल्यावर मात्र घरात तुमची सत्ता असावी, असे तुम्हाला वाटत असते. केवळ आक्रमकपणे सत्ता गाजवणे गरजेचे नाही, चांगल्या प्रकारेही सत्ता गाजवता येते. तुम्ही स्त्री असाल तर तुम्ही तुमच्या पतीला व्यवसायात मदत कराल आणि तुम्ही हे काम अत्यंत कौशल्याने पार पाडाल.
तुमची प्रकृती उत्तम आहे. तुमच्यात सळसळते चैतन्य आहे आणि तुम्ही व्यायाम करत राहिलात तर अगदी उतारवयापर्यंत ते तसेच राहील. पण यात काहीसा अतिरेक होऊ शकतो. तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त व्यायाम केलात तर तुमच्या श्वसनेंद्रियांवर परिणाम होईल आणि तुम्हाला फुफ्फुसाचा त्रास होऊ शकतो. वयाच्या पंचेचाळीशीनंतर तुम्हाला सायटिका किंवा संधिवाताचा त्रास होण्याची शक्यता आहे. याची कारणे शोधणे कठीण असेल, पण याची कारणेच शोधायची झाली तर रात्रीच्या हवेत खूप फिरल्यामुळे असे घडण्याची शक्यता आहे.
तुमच्या स्वभावाल अनुकूल अशा प्रकारे मोकळा वेळ व्यतीत करणे तुम्हाला आवडते. तुम्हाला आरामाची आवड आहे त्यामुळे फार परिश्रण करण्यास भाग पाडणारे खेळ तुम्हाला आवडत नाहीत. तुम्हाला मित्रांची संगत आवडते आणि तुम्हाला प्रसन्न क्षण जगायला आवडतात. पत्ते खेळणे तुम्हाला आवडते. पण त्यात पैशांचा व्यवहार होणार असेल तर ते खेळण्यास तुम्ही तयार असता. या ठिकाणी तुम्हाला जुगारापासून सावधान करणे आवश्यक आहे. कारण तुम्हाला त्याचे व्यसन लागू शकते.