तुमच्या कामाच्या ठिकाणी, मित्रांसोबत आणि कुटुंबामध्ये एकोपा राखण्यासाठी काय करावे लागेल, याचे मार्ग तुम्हाला सापडतील. मित्र आणि तुमच्या भावांमुळे तुम्हाला लाभ होईल. राजघराण्यांकडून किंवा उच्च अधिकाऱ्यांकडून तुम्हाला मदत मिळेल. तुमच्या आय़ुष्यात होणारे बदल हे सखोल आणि चिरंतन टिकणारे असतील. तुमच्या इच्छा पूर्ण होतील.
Apr 26, 2024 - Jun 26, 2024
तुमच्या समोरील आव्हानांवर मात करण्यासाठी तुम्ही नव्या कल्पना लढवाल. व्यवहार अत्यंत सुरळीत आणि सहज पार पडतील कारण तुम्ही तुमच्या स्पर्धकांच्या एक पाऊल पुढे असाल. एकाहून अधिक स्रोतांमधून तुम्हाला उत्पन्न मिळेल. तुमचे क्लाएंट्स, सहकारी आणि इतर संबंधित व्यक्ती यांच्याशी असलेले तुमचे संबंध सुधारतील. तुम्ही या काळात काही चैनीच्या वस्तू विकत घ्याल. एकूणातच हा काळ तुम्हाला उत्पन्न मिळवून देणारा असेल.
Jun 26, 2024 - Jul 14, 2024
स्वत:ला व्यक्त करण्यासाठी आणि सृजनशील क्षमतांचा वापर करण्यासाठी हा अनुकूल समय आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी आणि व्यावसायिक आयुष्यात अनपेक्षित बदल घडण्याची शक्यता आणि हे बदल तुमच्यासाठी लाभदायी ठरणार आहेत. वरिष्ठ आणि अधिकारी वर्गाची कृपादृष्टी राहील. तुमच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक आयुष्यात सकारात्मक बदल घडेल. वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता. या कालावधीत तुम्ही निश्चितपणे यशस्वी व्हाल आणि तुमची इच्छापूर्ती निश्चित होईल.
Jul 14, 2024 - Aug 14, 2024
तुमच्या योजना कार्यान्वित करण्यासाठी हा अत्यंत योग्य समय आहे. वैवाहिक सुखासाठी ही ग्रहदशा अत्यंत अनुकूल आहे. आध्यात्मिक जगाचे दरवाजे तुमच्यासाठी उघडतील, परंतु तेथील संधींचा लाभ घेण्याआधी काही तयारीची आवश्यकता आहे. तुम्ही अपत्यप्राप्तीची अपेक्षा करत असाल तर सुरक्षित प्रसूती होईल. तुमच्या लिखाणाची प्रशंसा होईल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक यश मिळेल आणि त्यात तुम्ही पुढे जाल. या काळात अपत्यप्राप्तीची, विशेषत: कन्यारत्न प्राप्त होण्यीच शक्यता आहे.
Aug 14, 2024 - Sep 04, 2024
तुमची कष्ट करायची तयारी असेल तर हा काळात तुम्हाला यश निश्चित मिळणार आहे. तुम्ही फार प्रयत्न न करताही नवीन संधी मिळतील. घरी आणि कामाच्या ठिकाणी होणारे बदल तुमच्या पथ्यावर पडतील. तुम्ही या वेळी काही निश्चित निर्णय घ्याल. ते निर्णय तुम्हाला प्रगतीपथावर नेईन. या काळात तुमचा वायफळ खर्च होण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवायला हवे. तुम्हाला आत्मविश्वास आणि उर्जेची कमी जाणवेल.
Sep 04, 2024 - Oct 29, 2024
हा संमिश्र घटनांचा काळ आहे. व्यावसायिक क्षेत्रात तुम्ही 100 टक्के योगदान द्याल. तुमचे ध्येय निश्चित राहील आणि एकदा हाती घेतलेले काम पूर्ण होईपर्य़ंत तुम्ही थांबणार नाही आणि तुमची एकाग्रताही कायम राहील. तुमच्या व्यक्तिमत्वात अहंकाराचा समावेश होण्याची शक्यता आहे. तुमच्या या वागणूकीमुळे तुमच्या लोकप्रियतेत घट होईल. लोकांशी संवाद साधताना सौम्य आणि लवचिक राहा. तुमच्या भावाबहिणींनी तुम्ही मदत कराल. तुमच्या नातेवाईकांना अडचणींचा सामना करावा लागेल.
Oct 29, 2024 - Dec 16, 2024
या वर्षात कौटुंबिक आणि व्यावसायिक पातळीवर केलेल्या भागिदाऱ्या तुम्हाला फायदेशीर ठरतील. तुम्ही ज्या बदलाची इतकी वर्ष वाट पाहत होतात, तो बदल या वर्षात घडून येईल. तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडाल आणि तुमचे पालक, भावंड आणि नातेवाईकांशी तुमचे अत्यंत जवळचे संबंध राहतील. संवाद आणि वाटाघाटी तुमच्या बाजूने राहतील आणि तुम्हाला नवीन संधी प्राप्त करून देतील. व्यवसाय आणि कामाच्या निमित्ताने वारंवार प्रवास होईल. तुम्ही कदाचित हिरे, दागिने यांची खरेदी कराल.
Dec 16, 2024 - Feb 12, 2025
या कालावधीची सुरुवात काहीशी कठीणच होईल. तुमच्या कामात आणि संधीमध्ये कपात होईल, पण अनावश्यक कामे मात्र वाढतील. नवीन गुंतवणूक किंवा धोके पत्करणे टाळावे कारण नुकसान संभवते. नवीन प्रोजेक्ट किंवा नवीन गुंतवणूक करू नका. तुमच्या वरिष्ठांशी आक्रमकपणे वागू नका. इतरांकडून मदत घेण्यापेक्षा स्वत:च्या क्षमतांचा वापर करा. चोरी किंता तत्सम कारणांमुळे आर्थिक नुकसान संभवते. तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. एखाद्या मृत्यूची बातमी मिळू शकते.
Feb 12, 2025 - Apr 05, 2025
अनेक अडचणी आणि कष्टप्रद काळानंतरचा हा काळ खूप चांगला आहे आणि अखेर तुम्ही थोडीशी विश्रांती घेऊ शकता आणि यशाची चव चाखू शकता आणि या आधी जे कष्ट केलेत त्याचे झालेले चीज उपभोगू शकता. शंकास्पद सट्टेबाजीचे व्यवहार टाळलेत तर आर्थिक बाबतीत तुमचे नशीब उत्तम असेल. प्रवासात चांगले मित्र मिळतील. राजकीय आणि महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींशी जवळीक वाढेल. तुमच्या कुटुंबात मुलाचा जन्म होईल.
Apr 05, 2025 - Apr 26, 2025
तुम्ही तुमचा स्वभाव समतोल ठेवा, जेणेकरून चांगले निष्कर्ष मिळतील. या काळात विकास होईल. तुमचे सहकारी आणि वरिष्ठ यांच्याशी सुसंवाद राहील. उत्पन्नाचा स्रोत व्यवस्थित राहील आणि कौटुंबिक आयुष्याचा आनंद घ्याल. अध्यात्मिकदृष्ट्या तुम्ही सक्रीय व्हाल. तुम्ही बढतीची अपेक्षा करत असाल तर ते नक्की होईल. तुमच्या मित्रांची संख्या वाढेल. अचानक होणार प्रवास तुम्हाला फलदायी ठरेल. तुम्ही थोडा दानधर्म कराल आणि तुमची या काळात समृद्धी होईल.