मोहम्मद हफीज
Oct 17, 1980
00:00:00
Sargodha
72 E 40
32 N 10
5
Unknown
खराब डेटा
तुमच्यात सामाजिक बांधिलकी आहे आणि मित्रांच्या सहवासात तुम्हाला आनंद मिळेल. तुमच्या अनेक मित्रांपैकी किंवा मैत्रिणींपैकी तुमच्यासाठी एक व्यक्ती खूप खास असेल त्या व्यक्तीशी तुम्ही लग्न कराल. तुमचे आयुष्य सहानुभूतीपर असेल. तुमचे वैवाहिक आयुष्य सुखी व समाधानी असेल. तुम्ही तुमच्या घराबाबत खूप विचार करता आणि ते आरामदायी व टापटीपीत असावे, अशी तुमची अपेक्षा असते. तुमच्या संवेदनशीलतेमुळे तुमच्या घरात कदाचित गोंधळ माजू शकतो. तुमची मुले तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असतात. तुम्ही त्यांच्यासाठीच काम कराल आणि त्यांना भरपूर शिक्षण व आनंद द्याल. तुम्ही त्यांच्यावर जो खर्च कराल तो वाया जाणार नाही.
तुमच्यात भरपूर चैतन्य आहे. तुम्ही मजबूत आहाता आणि अति कष्ट घेतले नाहीत तर तुम्हाला कोणताही विकार शिवणार नाही. केवळ तुमच्यात भरपूर कष्ट करण्याची क्षमता आहे म्हणून ते केलेच पाहिजेत, असे समजण्याचे कारण नाही. स्वतःशी सौजन्याने वागा, आरोग्याच्या बाबतीत फार निष्काळजी राहू नका. व्यवस्थित काळजी घेतलीत तर उतारवयात तुम्ही तुमची पाठ थोपटाल. आजार उपटलाच तर बहुतेक वेळा तो अचानक उद्भवतो. तो आलाच तर तो प्रकट होण्यासाठी बराच काळ घेतो. थोडा खोलात जाऊन विचार केलात तर लक्षात येईल, तुम्हीच त्याला आमंत्रण दिले आहे. तो टाळता आला असता, यात संशय नाही. तुमचे डोळे हा तुमचा कमकुवतपणा आहे, त्यांची काळजी घ्या. वयाच्या पस्तीशीनंतर तुम्हाला डोळ्यासंबंधी विकार होण्याची शक्यता आहे.
तुम्हाला परिश्रम करायला लावणारे छंद आहेत. क्रिकेट, फूटबॉल, टेनिस यासारखे खेळ तुम्हाला आवडतात. तुम्ही दिवसभर तुमच्या व्यवसायात काम कराल आणि संध्याकाळी गोल्फ, टेनिस, बॅडमिंटन इत्यादी खेळ खेळाल. तुम्हाला अॅथलेटिक खेळांमध्ये सहभागी होण्याची भरपूर इच्छा आहे. तुम्ही खेळांमध्ये अनेक बक्षीसे मिळविली असतील. खेळांबाबत तुमच्यातील चैतन्य आणि उर्जा वाखाणण्याजोगी आहे.