तुमच्या पत्नीच्या आऱोग्याच्या तक्रारीमुळे तुम्हाला त्रास भोगावा लागेल. तुमचे सहकारी आणि वरिष्ठ यांच्याशी जुळवून घेणे तुम्हाला कठीण जाईल. अपत्यामुळेही तुमच्या आयुष्यात समस्या उभ्या राहतील. इतर बाबींमध्येही अडचणी निर्माण होतील. प्रेमसंबंधांमध्ये किंवा वैवाहिक जीवनात लहान-सहान भांडणे, गैरसमज, वाद-विवाद टाळावेत. जोडीदारासमवेत किंवा नातेवाईकांशी विवाद होतील. या काळात मानसिक संतुलन राखण्याची गरज आहे, कारण अनैतिक कामे करण्याची इच्छा होईल.
Jan 15, 2025 - Mar 17, 2025
या काळात तुम्हाला चहुबाजूंनी यश मिळणार आहे. तुमच्या व्यावसायिक आयुष्यात तुम्ही अशी उंची गाठाल, ज्यामुळे तुम्हाला मोबदला आणि ओळख असे दोन्ही मिळेल. तुमच्या प्रयत्नांमुळे उत्पन्नामध्ये वाढ होईल. कौटुंबिक आयुष्य सुखी असेल. एखादी चांगली नोकरीची संधी, मोबदला, हुद्दा किंवा बढती मिळणे शक्य आहे. तुम्ही सोन्याची किंवा हिऱ्याची खरेदी कराल. एकूणातच तुम्ही तुमचे मित्र/सहकारी आणि विविध पातळ्यांवरील व्यक्तींची चांगले संबंध राखाल.
Mar 17, 2025 - Apr 04, 2025
स्वत:ला व्यक्त करण्यासाठी आणि सृजनशील क्षमतांचा वापर करण्यासाठी हा अनुकूल समय आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी आणि व्यावसायिक आयुष्यात अनपेक्षित बदल घडण्याची शक्यता आणि हे बदल तुमच्यासाठी लाभदायी ठरणार आहेत. वरिष्ठ आणि अधिकारी वर्गाची कृपादृष्टी राहील. तुमच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक आयुष्यात सकारात्मक बदल घडेल. वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता. या कालावधीत तुम्ही निश्चितपणे यशस्वी व्हाल आणि तुमची इच्छापूर्ती निश्चित होईल.
Apr 04, 2025 - May 05, 2025
हा तुमच्यासाठी समृद्धीचा काळ आहे. तुम्हाला अनेक अनपेक्षित गोष्टी मिळतील, त्या आनंद देणाऱ्याच असतील. तुमची पत्नी आणि नातेवाईकांकडूनही आनंदाचा प्रसाद मिळेल. न्यायालयीन खडले आणि याचिकांमध्ये यश मिळेल. तुम्ही नवीन घर किंवा वाहन खरेदी कराल. करारांमधून भरघोस फायदा मिळेल. तुमच्या शत्रुंवर एकूणच तुमचे वर्चस्व राहील. आर्थिक बाबींचा विचार करता हा काळ अनुकूल आहे.
May 05, 2025 - May 26, 2025
मित्र, नातेवाईक आणि सहकाऱ्यांशी काळजीपूर्वक वागा कारण वाद होण्याची शक्यता आहे. उद्योगासाठी हा चांगला कालावधी नाही आणि आर्थिक नुकसान संभवते. काही गुप्त कामांसाठी खर्च होण्याची शक्यता आहे. मानसिक तणाव आणि दु:ख सहन करावे लागेल. जखमा आणि घाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहन सांभाळून चालवा.
May 26, 2025 - Jul 20, 2025
या काळात जागा आणि नोकरी दोन्ही बदलण्याची शक्यता आहे. मानसिक ताणामुळे तुम्हाला त्रास सहन करावा लागेल. तुमची मन:शांती ढळेल. कुटुंबातील सदस्यांची वागणूकही थोडीशी वेगळी असेल. मोठी गुंतवणूक करू नका, कारण ती फार लाभदायी असणार नाही. तुमचे मित्र आणि सहकारी त्यांची आश्वासने पूर्ण करणार नाहीत. धूर्त मित्रांपासून सावध राहा कारण कदाचित त्यांच्यापासून तुमच्या प्रतिमेला धक्का पाहोचू शकतो. कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या. त्यामुळे प्रवास करून का, शारीरिक आजार होण्याची शक्यता आहे.
Jul 20, 2025 - Sep 06, 2025
तुम्ही तुमच्यात असलेल्या संगीताच्या गुणांचा आनंद घेऊ शकाल. त्याचप्रमाणे एखादी नवी सांगीतिक रचना सुचण्याचीही शक्यता आहे. कामाशी आणि समाजाशी संबंधित तुमची तत्वे व्यक्त करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुमच्या कल्पना प्रत्यक्षात उतरवाल तेव्हा त्यातून आर्थिक लाभ होईल. तुमच्याकडे आर्थिक आवक निश्चितच वाढेल आणि त्यामुळे व्यक्तिगत विश्वास, स्वप्न आणि तत्वे यावर निश्चितच प्रभाव पडेल. तुमचे शत्रू तुमच्या वरचढ होऊ शकणार नाहीत. एकूणातच वातावरण आनंदी राहील. तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये वाढ होईल.
Sep 06, 2025 - Nov 03, 2025
या काळात शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या तुम्ही धाडसी निर्णय घ्याल. तुमच्या नातेवाईकांसाठी हा चांगला काळ आहे. तुमच्या करिअरमध्ये नवीन प्रयत्न करा. यश निश्चित आहे. काही भौतिक सुखाच्या वस्तू विकत घ्याल. तुम्ही जमीन आणि यंत्रांची खरेदी कराल. उद्योग आणि व्यवसायातून फायदा मिळेल. तुमचे शत्रूंचे तुमच्यासमोर काही चालणार नाही. दूरच्या प्रदेशातील लोकांच्या ओळखी होतील. प्रेमप्रकरणाचा विचार करता हा कालावधी अनुकूल आहे. कुटुंबियांकडून पूर्ण सहकार्य मिळेल.
Nov 03, 2025 - Dec 25, 2025
अनेक अडचणी आणि कष्टप्रद काळानंतरचा हा काळ खूप चांगला आहे आणि अखेर तुम्ही थोडीशी विश्रांती घेऊ शकता आणि यशाची चव चाखू शकता आणि या आधी जे कष्ट केलेत त्याचे झालेले चीज उपभोगू शकता. शंकास्पद सट्टेबाजीचे व्यवहार टाळलेत तर आर्थिक बाबतीत तुमचे नशीब उत्तम असेल. प्रवासात चांगले मित्र मिळतील. राजकीय आणि महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींशी जवळीक वाढेल. तुमच्या कुटुंबात मुलाचा जन्म होईल.
Dec 25, 2025 - Jan 15, 2026
खासगी आणि व्यावसायिक आयुष्यातील भागिदाऱ्या फलदायी ठरतील. महत्त्वाचे म्हणजे इतकी वर्षे तुम्ही ज्या आयुष्य बदलून टाकणाऱ्या बदलाची वाट पाहात होतात, तो बदल आता घडणार आहे. संवाद आणि वाटाघाटी यामुळे तुम्हाला नव्या संधी प्राप्त होतील. तुम्ही लोकांना मदत कराल. कामधंद्याच्या निमित्ताने तुम्ही प्रवास कराल आणि हे प्रवास तुमच्यासाठी फलदायी ठरतील. नोकरी करत असाल तर कामच्या ठिकाणी असलेल्या परिस्थितीत सुधारणा होईल.