तुमच्या आर्थिक आणि सामाजिक स्थानाच्या बाबतीत चढ-उतार संभवतात. आर्थिक आणि मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाजूंची नीट काळजी घ्या. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा कारण जवळचे सहकारी आणि नातेवाईक यांच्याशी वाद होण्याची शक्यता आहे. तुमच्या आऱोग्याकडेही लक्ष द्या कारण त्या बाबातीत आजारपण संभवते.
Apr 22, 2024 - Jun 16, 2024
या काळाच्या सुरुवातीपासून तुमची कारकीर्दी काही स्फोटक किंवा दिशाहीन होईल. करिअरमध्ये नवे प्रकल्प किंवा मोठे बदल करणे टाळा. तुमचे मित्र आणि नातेवाईक यांच्याशी जुळवून घेणे कठीण होईल. अनिष्ट परिस्थिती उद्भवेल, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात वाद निर्माण होतील. जलद आर्थिक लाभासाठी अनैतिक काम करू नका. नोकरीच्या ठिकाणी समाधान लाभणार नाही. अपघाताची शक्यता आहे. अवघड परिस्थितीला आत्मविश्वासाने सामोरे जाण्याचा प्रयत्न करा. खोकला, श्वासोच्छवासाचे विकार किंवा संधिवाताचा त्रास होऊ शकतो.
Jun 16, 2024 - Aug 04, 2024
तुमच्या व्यक्तिगत आय़ुष्यात, कामाच्या ठिकाणी, मित्रांसमवेत आणि कुटुंबियांसोबत सलोख्याचे संबंध कसे ठेवावेत, यासंबंधी नवीन मार्ग तुम्हाला सापडतील. तुम्ही तुमचे संवादकौशल्य सुधाराल आणि तुमच्या अंतर्मनाशी आणि तुमच्या खासगी गरजांशी प्रामाणिक राहिल्यामुळे त्याचा तुम्हाला योग्य तो मोबदला मिळेल. या काळात तुमच्या आयुष्यात होणारे बदल हे जाणवणारे आणि दीर्घकाळापर्यंत टिकणारे असतील. ज्यांनी तुमच्या कष्टांकडे दुर्लक्ष केले, असे तुम्हाला वाटत होते, तेच तुमचे खंदे सहकारी ठरतील. घरात एखादे धार्मिक कार्य घडेल. हा काळ तुमच्या मुलांसाठी समृद्धी, आनंद आणि यश घेऊन येईल.
Aug 04, 2024 - Oct 01, 2024
नशीबाची साथ आणि मानसिक स्थैर्य यामुळे तुमचे गृहस्थ जीवन सकारात्मक राहील. पत्नीच्या माध्यमातून लाभ होईल. प्रवास, उच्चशिक्षण, संवाद, नवीन उद्योगाची सुरुवात, व्यवसाय या दृष्टीने हे वर्ष अत्यंत अनुकूल आहे. या कालावधीत सगेसोयरे आणि नातेवाईक यांच्याशी वाद होतील आणि कदाचित शत्रुत्वही निर्माण होईल. व्यावसायिकदृष्ट्या तुम्हाला चांगले निष्कर्ष मिळतील. एकूणातच हा काळ अत्यंत अनुकूल असेल.
Oct 01, 2024 - Nov 21, 2024
मालमत्तेच्या व्यवहारातून या कालावधीत चांगलाच फायदा होईळ. आर्थिक वादांचा निकाल तुमच्या बाजूने लागेल. दीर्घ काळापासून अपेक्षित असलेली पगारवाढ आता होईल. व्यवसायाच्या निमित्ताने केलेले प्रवास लाभदायक ठरतील. या काळाचा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे तुमच्याविषयी असलेला आदर वाढीस लागेल मग तुमची आय़ुष्याची गाडी कोणत्याही स्थानकावर का असे ना. आरामदायी वस्तुंवर तुम्ही खर्च कराल आणि नवीन वाहन खरेदीची शक्यता आहे.
Nov 21, 2024 - Dec 13, 2024
तुमचे वरिष्ठांसोबत तुमचा सुसंवाद राहील आणि पुढील वाटचालीमध्ये तुम्हाला त्याचा फायदा होईल. या काळात तुमचा हुद्दा जाण्याची शक्यता आहे. तुमच्या मनात सध्या अनेक कल्पक आणि नवनवीन कल्पना येत असतील, पण त्यांच्या चांगल्या वाईट बाजू पाहिल्याशिवाय त्यांची अंमलबजावणी करू नका. तुम्ही तुमच्या घराकडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. प्रवासाचा योग आहे आणि प्रवास लाभकारक ठरेल. तुमच्या कुटुंबियांच्या प्रकृतीच्या तक्रारी असतील, त्यामुळे त्यांच्या आणि तुमच्या स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्या.
Dec 13, 2024 - Feb 12, 2025
तुम्हाला सत्ता मिळेल, या सत्तेची फळं कदाचित तुम्ही या पूर्वी अनुभवलेली नसतील. व्यक्तिगत आय़ुष्यात तुमच्या जवळची माणसे तुमच्यावर अवलंबून असतील. तुम्हाला या काळात खूप प्रसिद्धी मिळेल. तुम्ही मानसिक दृष्ट्या कणखर राहाल. तुमच्या पत्नीसोबतचा तुमचा संवाद आणि तुमचे संबंध प्रेमाचे राहतील. अपत्यप्राप्ती संभवते. तुमचे सहकारी तुम्हाला पूर्ण सहकार्य देतील. एकूणच हा अत्यंत आनंददायी समय असेल.
Feb 12, 2025 - Mar 02, 2025
तुम्ही या काळात जोशपूर्ण असाल. तुम्ही काहीसे धाडसी आणि आक्रमक असाल. मानसिक तोल ढळण्याची शक्यता आणि तरतमभाव ठेवणे कठीण जाईल. तुमची लोकप्रियता कमी होईल आणि भांडणामुळे अडचणीत येण्याची शक्यता. प्रेमासाठी हा कालावधी प्रतिकूल आहे. जोडीदार आणि पाल्यांचे आरोग्य सांभाळा. या काळात अपत्यप्राप्ती होण्याची शक्यता आणि वरिष्ठांकडून लाभ संभवतो.
Mar 02, 2025 - Apr 01, 2025
यशाचा आणि समृद्धीचा काळ तुमची वाट पाहत आहे. कल्पक दृष्टिकोन आणि संधी यामुळे तुम्हाला थोडे अधिक उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या वरिष्ठांशी आणि अधिकाऱ्यांशी तुमचा सुसंवाद राहील. तुमच्या उत्पन्नात घसघशीत वाढ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात वाढ होईल आणि तुमची प्रतिमा उंचावेल. एकुणातच हा काळ तुमच्यासाठी सर्वांगीण यशाचा असेल.
Apr 01, 2025 - Apr 23, 2025
या कालावधीत शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या धाडसी असाल. तुमच्या नातेवाईकांसाठी विशेषत: जोडीदारांसाठी हा अनुकूल कालावधी आहे. तुमच्या करिअरमध्ये तुम्ही प्रयत्न करू शकता कारण यश निश्चित आहे. भौतिक वस्तुंचा तुमच्या आयुष्यात समावेश होईल. तुमचे विरोधक यात अडथळे निर्माण करू शकणार नाहीत. या काळात तुमच्या इच्छा पूर्ण होतील. तुमचा विजय निश्चित आहे.