तुमच्या आर्थिक आणि सामाजिक स्थानाच्या बाबतीत चढ-उतार संभवतात. आर्थिक आणि मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाजूंची नीट काळजी घ्या. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा कारण जवळचे सहकारी आणि नातेवाईक यांच्याशी वाद होण्याची शक्यता आहे. तुमच्या आऱोग्याकडेही लक्ष द्या कारण त्या बाबातीत आजारपण संभवते.
Oct 18, 2025 - Nov 18, 2025
हा तुमच्यासाठी अनुकूल कालावधी आहे. तुमच्या विचारांबाबत तुम्हाला विश्वास असेल आणि बढती मिळण्याची दाट शक्यता आहे. अचानक प्रवास संभवतो आणि हा प्रवास तुम्हाला फलदायी ठरेल. भावंडांकडून आणि जोडीदाराकडून आनंद मिळेल. तुमच्या भावांसाठीसुद्धा हा अनुकूल काळ आहे. जागा किंवा व्यवसाय बदलण्याचा विचार टाळा.
Nov 18, 2025 - Dec 09, 2025
मित्र, नातेवाईक आणि सहकाऱ्यांशी काळजीपूर्वक वागा कारण वाद होण्याची शक्यता आहे. उद्योगासाठी हा चांगला कालावधी नाही आणि आर्थिक नुकसान संभवते. काही गुप्त कामांसाठी खर्च होण्याची शक्यता आहे. मानसिक तणाव आणि दु:ख सहन करावे लागेल. जखमा आणि घाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहन सांभाळून चालवा.
Dec 09, 2025 - Feb 02, 2026
नवीन गुंतवणूक करू नका आणि धोका पत्करू नका. या काळात अडथळे आणि अडचणी समोर येतील. तुम्ही व्यावसायिक म्हणून काम करत असाल तर तुम्ही नियमित कष्ट केल्यास आणि बिनधास्तपणे काम केल्यास प्रगती निश्तिच आहे. यशाचा मार्ग सोपा नसतो. चांगल्या परिणामांसाठी तुमचा स्वभाव स्थिर असणे आवश्यक आहे. वर्षाच्या सुरुवातीला कामाच्या ठिकाणी कुरबुरी असतील. या काळात तुम्ही फार झेप घेण्याचा किंवा नवीन उपक्रम सुरू करण्याचा प्रयत्न करू नका. आरोग्याच्या तक्रारीमुळे तुम्ही दिलेली आश्वासने पाळणे शक्य होणार नाही. आरोग्याची तपासणी करा आणि तापाचा त्रास होण्याची शक्यता आहे.
Feb 02, 2026 - Mar 23, 2026
काही त्रास आणि खच्चीकरण येऊ शकते, पण या परिस्थितीत तुम्ही वस्तुस्थितीकडे सकारात्मकतेने पाहणे गरजेचे आहे आणि कोणतेही काम अपूर्ण ठेवता कामा नये. कामाच्या ठिकाणी प्रत्येक बाबीचे सखोल अवलोकन करणे गरजेचे आहे. अचानक नुकसान संभवते. परदेशी संबंधांतून तुम्हाला फायदा होईल. आरोग्याच्या तक्रारींमुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. तुम्हाला फारसा फायदा करून न देणाऱ्या कामात गुंतावे लागेल. कुटुंबात काही कुरबुरी होतील. तुमचे शत्रू तुमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करतील. हा काळ तुमच्यासाठी फार अनुकूल नाही.
Mar 23, 2026 - May 19, 2026
ही चांगल्या कालावधीची सुरुवात असू शकते. तुमच्या हातून सत्कार्य घडेल. या काळात तुम्ही अत्यंत आनंदी असाल. विपरित परिस्थितीसुद्धा चांगल्या प्रकारे हाताळू शकाल. कौटुंबिक सौख्य लाभेल. तुमच्या भावंडांना थोडाफार त्रास सहन करावा लागू शकतो. तुमच्या स्वत:च्या प्रयत्नांमुळे तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. तुमचे शत्रू तुम्हाला दुखवू शकणार नाहीत. आरोग्याच्या थोड्याशा कुरबुरी राहतील. तुमच्या छंदांसाठी तुमचे मित्र आणि सहकारी मदत करतील.
May 19, 2026 - Jul 10, 2026
मालमत्तेच्या व्यवहारातून या कालावधीत चांगलाच फायदा होईळ. आर्थिक वादांचा निकाल तुमच्या बाजूने लागेल. दीर्घ काळापासून अपेक्षित असलेली पगारवाढ आता होईल. व्यवसायाच्या निमित्ताने केलेले प्रवास लाभदायक ठरतील. या काळाचा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे तुमच्याविषयी असलेला आदर वाढीस लागेल मग तुमची आय़ुष्याची गाडी कोणत्याही स्थानकावर का असे ना. आरामदायी वस्तुंवर तुम्ही खर्च कराल आणि नवीन वाहन खरेदीची शक्यता आहे.
Jul 10, 2026 - Jul 31, 2026
नोकरी करत असाल तर वर्षाची सुरुवात उत्साही असेल. विकास आणि वाढीची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणचे वातावरण मात्र तणावपूर्ण असेल आणि वरिष्ठांसोबत वाद होण्याची शक्यता आहे. एकूणातच हा काळ फार चांगला नाही कारण मित्र, सहकारी, कुटुंबातील सदस्य हे दूर वाटू लागतील. फार बदल अपेक्षित नाही. तुमचा स्वभाव आणि चुकीची भाषा वापरल्यामुळे तुमच्या जवळच्या व्यक्तींचे आणि तुमच्या संबंधात दुरावा निर्माण होईल, त्यामुळे जीभेवर ताबा ठेवा.
Jul 31, 2026 - Sep 30, 2026
माणसं तुमचा आदर्श ठेवतील आणि सल्ला घेण्यासाठी तुमच्याकडे येतील. सगळ्या समस्या सुटू लागतील. या सर्व काळ तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल आणि उर्जेचा राहील. हा काळ दैव, क्षमता आणि धाडसाचा असणार आहे. वरिष्ठाकंडून तुम्हाला ऐहिक लाभ मिळेल. त्यामुळे नवीन प्रयत्न करण्यासाठी आणि नवीन ठिकाणी प्रवास करण्यासाठी हा अत्यंत अनुकूल काळ आहे. तुम्ही अनेकांशी संबंध जोडाल आणि यातून चांगल्या प्रकारची देवाण-घेवाण होईल. हा कालावधी तुमच्या भावंडांसाठी आनंद आणि यश घेऊन येईल.
Sep 30, 2026 - Oct 19, 2026
प्रकृती नाजूक असल्यामुळे शारीरिक थकवा येणारे काम करू शकणार नाही. तुमच्या हातून काही अविवेकी काम होण्याची शक्यता. तुम्ही शेती करत असाल तर आर्थिक नुकसान संभवते. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्रास होण्याची शक्यता. आईच्या आजारपणामुळे चिंताग्रस्त राहाल. राहत्या घरी तुम्हाला नको असलेला बदल संभवतो. निष्काळजीपणे वाहन चालवू नका.