जवळच्या नातेवाईकाच्या किंवा कुटंबातील सदस्याच्या मृत्युची बातमी समजेल. एखादा विकार होण्याची शक्यता असल्यामुळे आरोग्याची नीट काळजी घ्या. संपत्तीचे नुकसान, आत्मविश्वासात कमतरता, व्यर्थ आणि मानसिक चिंता संभवतात. लोकांना तुमच्या प्रति असलेल्या आसूयेमुळे समस्या उद्भवू शकतात. चोरीमुळे आर्थिक नुकसान होऊ शकते. कुसंगत आणि वाईट सवयी लागण्याची शक्यता आहे.
May 15, 2024 - Jul 15, 2024
तुमच्या समोरील आव्हानांवर मात करण्यासाठी तुम्ही नव्या कल्पना लढवाल. व्यवहार अत्यंत सुरळीत आणि सहज पार पडतील कारण तुम्ही तुमच्या स्पर्धकांच्या एक पाऊल पुढे असाल. एकाहून अधिक स्रोतांमधून तुम्हाला उत्पन्न मिळेल. तुमचे क्लाएंट्स, सहकारी आणि इतर संबंधित व्यक्ती यांच्याशी असलेले तुमचे संबंध सुधारतील. तुम्ही या काळात काही चैनीच्या वस्तू विकत घ्याल. एकूणातच हा काळ तुम्हाला उत्पन्न मिळवून देणारा असेल.
Jul 15, 2024 - Aug 02, 2024
तुमच्या रोमँटिक आय़ुष्यात थोडी रंगत आणण्याचा हा काळ आहे. तुम्ही मिळवेली कंत्राटे आणि करार यातून फायदा मिळविण्यासाठी हा कालावधी अनुकूल आहे. या कालावधीत तुम्ही नवीन व्यवहार करू शकता. हे व्यवहार तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील. उद्योगातून आणि इतर धंद्यांमधून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ होईल आणि तुमची पत व स्थान यातही वृद्धी होईल. तुमच्या खासगी आयुष्यात सौख्य आणण्यासाठीच्या सर्व आवश्यकता पूर्ण झालेल्या असतील. तुम्ही वाहन किंवा इतर आरामदायी वस्तुंची खरेदी कराल. तुमचे आणि कुटुंबाचे सामाजिक स्थान उंचावण्यासाठी हा योग्य कालावधी आहे. तुमच्या उत्पन्नात भरघोस वाढ होणे आहे.
Aug 02, 2024 - Sep 02, 2024
आर्थिक लाभ मिळविण्यासाठी हा उत्तम कालावधी आहे. काही अनपेक्षित चांगल्या घटना घडू शकतात. या कालावधीत अनेक कौटुंबिक कार्यक्रमही संभवतात. हा तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल कालावधी आहे. महिलांकडून आणि तुमच्या वरिष्ठांकडून लाभ होण्याची शक्यता. आर्थिक बाबींचा विचार करता हा कालावधी फलदायी ठरणार आहे.
Sep 02, 2024 - Sep 23, 2024
तुमची कष्ट करायची तयारी असेल तर हा काळात तुम्हाला यश निश्चित मिळणार आहे. तुम्ही फार प्रयत्न न करताही नवीन संधी मिळतील. घरी आणि कामाच्या ठिकाणी होणारे बदल तुमच्या पथ्यावर पडतील. तुम्ही या वेळी काही निश्चित निर्णय घ्याल. ते निर्णय तुम्हाला प्रगतीपथावर नेईन. या काळात तुमचा वायफळ खर्च होण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवायला हवे. तुम्हाला आत्मविश्वास आणि उर्जेची कमी जाणवेल.
Sep 23, 2024 - Nov 17, 2024
हा संमिश्र घटनांचा काळ आहे. व्यावसायिक क्षेत्रात तुम्ही 100 टक्के योगदान द्याल. तुमचे ध्येय निश्चित राहील आणि एकदा हाती घेतलेले काम पूर्ण होईपर्य़ंत तुम्ही थांबणार नाही आणि तुमची एकाग्रताही कायम राहील. तुमच्या व्यक्तिमत्वात अहंकाराचा समावेश होण्याची शक्यता आहे. तुमच्या या वागणूकीमुळे तुमच्या लोकप्रियतेत घट होईल. लोकांशी संवाद साधताना सौम्य आणि लवचिक राहा. तुमच्या भावाबहिणींनी तुम्ही मदत कराल. तुमच्या नातेवाईकांना अडचणींचा सामना करावा लागेल.
Nov 17, 2024 - Jan 04, 2025
वेळ आणि दैव तुमच्या बाजूने असेल तुमच्या कार्याला प्रसिद्धी मिळवून देईल. ही अशी वेळ आहे की तुम्हाला तुमच्या कामाचे श्रेय मिळालेच पाहिजे आणि इतरही तुमच्याकडून प्रेरणा घेतील. तुमच्या व्यक्तिगत संबंधांमध्ये वृद्धी होईल, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. मुलांकडून तुम्हाला आनंद मिळेल. प्रवास घडेल आणि अनेकांना तुमचा सहवास हवा असेल. या काळात तुम्ही ध्यान कराल आणि मानवी अस्तित्वाविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न कराल. एखादे मौल्यवान संपत्ती तुम्ही विकत घ्याल. एकूणच हा काळ तुमच्यासाठी अनुकूल आणि चांगला मोबदला देणारा असेल.
Jan 04, 2025 - Mar 03, 2025
या कालावधीची सुरुवात काहीशी कठीणच होईल. तुमच्या कामात आणि संधीमध्ये कपात होईल, पण अनावश्यक कामे मात्र वाढतील. नवीन गुंतवणूक किंवा धोके पत्करणे टाळावे कारण नुकसान संभवते. नवीन प्रोजेक्ट किंवा नवीन गुंतवणूक करू नका. तुमच्या वरिष्ठांशी आक्रमकपणे वागू नका. इतरांकडून मदत घेण्यापेक्षा स्वत:च्या क्षमतांचा वापर करा. चोरी किंता तत्सम कारणांमुळे आर्थिक नुकसान संभवते. तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. एखाद्या मृत्यूची बातमी मिळू शकते.
Mar 03, 2025 - Apr 24, 2025
तुम्ही नेहमीच सकारात्मक दृष्टीकोन बाळगून असता आणि या वर्षातील घटना तुमच्या सकारात्मक दृष्टिकोनात भरच घालतील. तुमच्या राशीला उत्तम कालखंडात तुम्ही गुंतवणूक केलीत तर तुम्हाला चांगला फायदा होऊ शकेल. तुमच्या जवळच्या व्यक्ती आणि सहकाऱ्यांकडून सहकार्य आणि आनंद मिळेल. विरोधकांवर मात करू शकाल आणि लग्न किंवा रोमँटिक प्रसंगांमुळे देण्यात येणारी पार्टी असे काही प्रसंग घडतील. कौटुंबिक आयुष्य समाधानी राहील.
Apr 24, 2025 - May 15, 2025
तुम्ही तुमचा स्वभाव समतोल ठेवा, जेणेकरून चांगले निष्कर्ष मिळतील. या काळात विकास होईल. तुमचे सहकारी आणि वरिष्ठ यांच्याशी सुसंवाद राहील. उत्पन्नाचा स्रोत व्यवस्थित राहील आणि कौटुंबिक आयुष्याचा आनंद घ्याल. अध्यात्मिकदृष्ट्या तुम्ही सक्रीय व्हाल. तुम्ही बढतीची अपेक्षा करत असाल तर ते नक्की होईल. तुमच्या मित्रांची संख्या वाढेल. अचानक होणार प्रवास तुम्हाला फलदायी ठरेल. तुम्ही थोडा दानधर्म कराल आणि तुमची या काळात समृद्धी होईल.