तुमच्या आर्थिक आणि सामाजिक स्थानाच्या बाबतीत चढ-उतार संभवतात. आर्थिक आणि मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाजूंची नीट काळजी घ्या. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा कारण जवळचे सहकारी आणि नातेवाईक यांच्याशी वाद होण्याची शक्यता आहे. तुमच्या आऱोग्याकडेही लक्ष द्या कारण त्या बाबातीत आजारपण संभवते.
Mar 30, 2024 - May 30, 2024
तुमच्या समोरील आव्हानांवर मात करण्यासाठी तुम्ही नव्या कल्पना लढवाल. व्यवहार अत्यंत सुरळीत आणि सहज पार पडतील कारण तुम्ही तुमच्या स्पर्धकांच्या एक पाऊल पुढे असाल. एकाहून अधिक स्रोतांमधून तुम्हाला उत्पन्न मिळेल. तुमचे क्लाएंट्स, सहकारी आणि इतर संबंधित व्यक्ती यांच्याशी असलेले तुमचे संबंध सुधारतील. तुम्ही या काळात काही चैनीच्या वस्तू विकत घ्याल. एकूणातच हा काळ तुम्हाला उत्पन्न मिळवून देणारा असेल.
May 30, 2024 - Jun 17, 2024
तुमच्या रोमँटिक आय़ुष्यात थोडी रंगत आणण्याचा हा काळ आहे. तुम्ही मिळवेली कंत्राटे आणि करार यातून फायदा मिळविण्यासाठी हा कालावधी अनुकूल आहे. या कालावधीत तुम्ही नवीन व्यवहार करू शकता. हे व्यवहार तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील. उद्योगातून आणि इतर धंद्यांमधून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ होईल आणि तुमची पत व स्थान यातही वृद्धी होईल. तुमच्या खासगी आयुष्यात सौख्य आणण्यासाठीच्या सर्व आवश्यकता पूर्ण झालेल्या असतील. तुम्ही वाहन किंवा इतर आरामदायी वस्तुंची खरेदी कराल. तुमचे आणि कुटुंबाचे सामाजिक स्थान उंचावण्यासाठी हा योग्य कालावधी आहे. तुमच्या उत्पन्नात भरघोस वाढ होणे आहे.
Jun 17, 2024 - Jul 17, 2024
तुमच्या कारकिर्दीमध्ये एक पुढचे पाऊल टाकण्यासाठी आणि मोठी झेप घेण्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे. भागिदार किंवा सहकाऱ्यांकडून तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराकडून तुम्हाला आनंदाचे क्षण मिळतील. प्रेम आणि रोमान्स या दोन्ही प्रकारात सुख लाभेल. व्यवहार आणि परदेशी प्रवासातून लाभ होईळ. आरोग्याच्या तक्रारीमुळे मन:शांती ढळेल. रोजच्या जीवनात स्वयंशिस्त, स्वयंनियंत्रण अंगी बाणवणे तुम्हाला फायदेशीर ठरेल. ताप आणि संधीवातापासून सावध राहा आणि काळजी घ्या. या काळात तुमच्या जोडीदाराची प्रकृती अस्वस्थ होण्याची शक्यता आहे.
Jul 17, 2024 - Aug 08, 2024
परीक्षेत यश, बढती, कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठा उंचावणे या काळात घडेल. कुटुंबाकडून मिळणाऱ्या सहकार्य़ात वाढ होईल. तुमच्यापासून लांब राहणाऱ्या आणि परदेशी सहकाऱ्यांकडून मदत मिळेल. तुम्हाला नवीन काम मिळेल आणि ते अत्यंत फायदेशीर असेल. कोणतीही विपरीत परिस्थिती उद्भवली तरी त्याला तुम्ही आत्मविश्वासाने सामोरे जाल.
Aug 08, 2024 - Oct 01, 2024
या काळात तुम्ही धाडसी व्हाल आणि एका वेगळ्या उंचीवर पोहोचाल. वैवाहिक आयुष्यात आनंद लाभेल. प्रभावशाली व्यक्तींशी असलेले तुमचे संबंध वृद्धिंगत होतील. तुमचे शत्रु तुम्हाला सामोरे येऊ शकणार नाहीत. दूरचा प्रवास फलदायी ठरेल. शृंगारासाठी हा अत्यंत अनुकूल कालावधी आहे. कोणत्याही वादामध्ये तुमचा वरचष्मा राहील. आरोग्याच्या कुरबुरी राहतील. कौटुंबिक संबंध सलोख्याचे राहतील. तुमच्या मुलांसोबतचे संबंध मात्र काहीसे तणावपूर्ण असतील.
Oct 01, 2024 - Nov 19, 2024
काही त्रास आणि खच्चीकरण येऊ शकते, पण या परिस्थितीत तुम्ही वस्तुस्थितीकडे सकारात्मकतेने पाहणे गरजेचे आहे आणि कोणतेही काम अपूर्ण ठेवता कामा नये. कामाच्या ठिकाणी प्रत्येक बाबीचे सखोल अवलोकन करणे गरजेचे आहे. अचानक नुकसान संभवते. परदेशी संबंधांतून तुम्हाला फायदा होईल. आरोग्याच्या तक्रारींमुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. तुम्हाला फारसा फायदा करून न देणाऱ्या कामात गुंतावे लागेल. कुटुंबात काही कुरबुरी होतील. तुमचे शत्रू तुमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करतील. हा काळ तुमच्यासाठी फार अनुकूल नाही.
Nov 19, 2024 - Jan 16, 2025
या कालावधीत तुमचे एकूणच वर्तन साधारण राहील. तुम्ही कामातून मिळणाऱ्या फायद्यापेक्षा कामाकडे अधिक लक्ष द्या. या काळात काही समस्या आणि काही आरोग्याचे मुद्दे उपस्थित होतील, ज्यांचा तुमच्या कामावर परिणाम होईल. आव्हाने आणि नव्या घटकांना काळजीपूर्वक हाताळणे गरजेचे आहे. नवीन प्रकल्प हाती घेणे पूर्णपणे टाळा. तुमचा जुळवून घेण्याचा स्वभाव आणि स्पर्धा यामुळे या काळात तुमच्यासमोर अडथळे निर्माण होतील. जमीन किंवा यंत्राची खरेदी काही काळ पुढे ढकला.
Jan 16, 2025 - Mar 09, 2025
हा तुमच्यासाठी फार समाधानकारक काळ नाही. तुम्हाला कदाचित अचानक आर्थिक नुकसान सोसावे लागेल. प्रयत्नांमध्ये अपयश आल्यामुळे तुम्ही त्रासिक व्हाल. काम प्रचंड असल्यामुळे तुम्हाला खूप कष्ट करावे लागतील. कौटुंबिक आयुष्यातही तणाव निर्माण होईल. उद्योगामध्येही फार धोका पत्करू नका, कारण हा कालावधी तुम्हाला फार अनुकूल नाही. तुमचे विरोधक तुमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही अनावश्यक खर्च कराल. आरोग्याच्या कुरबुरी राहतील. वृद्धांना सर्दी आणि सुस्तपणा जाणवण्याचा संभव आहे.
Mar 09, 2025 - Mar 30, 2025
व्यक्तिगत आणि व्यावसायिक आघाडीवर अडथळे निर्माण होतील. कठीण परिस्थिती शांतपणे आणि चातुर्याने हाताळा कारण या कालावधीत घाई करून उपयोग नाही. प्रवास फार लाभदायी ठरणार नाही, त्यामुळे तो टाळावा. तुमच्या कुटुंबाकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळणार नाही. अपत्याशी निगडीत समस्या उद्भवतील. तुम्हाला नामोहरम करण्याची एकही संधी तुमचे शत्रू सोडणार नाहीत. थोडे धाडस दाखवा आणि तुमच्या योग्य निर्णयांना चिकटून राहा. पोटदुखीचा त्रास संभवतो.