Rami reddy
Jan 01, 1959
16:16:11
Vayalpad
78 E 37
13 N 39
5.5
Kundli Sangraha (Bhat)
अचूक (अ)
तुम्ही अशा प्रकारची नोकरी शोधली पाहिजे, जिथे तुम्ही माणसांमध्ये मिसळले जाल आणि जिथे व्यावसायिक लक्ष्य गाठण्याचे किंवा व्यावसायिक पातळीवरील जबाबदारी घेण्याचा दबाव तुमच्यावर नसेल. जिथे तुमच्याकडून लोकांना मदत होईल, अशा प्रकारचे क्षेत्र तुम्ही निवडले पाहिजे. उदा. समूह नेतृत्व.
एखादी गोष्ट तातडीने करण्याचा स्वभाव तुम्हाला अत्यंत उपयोगी पडणारा आहे. इतर केवळ बोलतात, तुम्ही कृती करता आणि जो प्रथम सुरुवात करतो, त्यालाच फळ मिळते. ज्या कार्यक्षेत्रात सभ्यता आणि सौजन्य अपेक्षित असेल ते कार्यक्षेत्र तुम्ही निवडू नका. केवळ बाह्य गुण तुमच्यावर प्रभाव टाकत नाहीत. उलट त्यांच्यामुळे तुम्हाला त्रास होतो. तुम्ही एक कृतीशील व्यक्ती आहात आणि तुम्हाला कार्यक्षम व्यक्तीच आवडतात. तुम्ही तुमच्या वास्तव आयुष्यात आणि चित्रपटांमध्ये शोधकर्त्याची भूमिका निभावू शकता. वित्त सल्लागार होण्यापेक्षा तुम्ही एक चांगले सर्जन होऊ शकता. ज्या कार्यक्षेत्रात तुम्ही वस्तू तयार करण्याची आवश्यकता असेल, त्या ठिकाणी तुम्ही यशस्वी होऊ शकता. अभियंत्याचे कामही तशाच प्रकारचे असते. त्याचप्रमाणे समुद्राशी निगडीत अशी अनेक कार्यक्षेत्रे आहेत, जी तुमच्यासाठी अनुकूल असतील. वैमानिकाला आवश्यक असणारे धाडस आणि धैर्य तुमच्यापाशी आहे. तुमच्या उर्जेचा वापर होऊ शकेल, अशी जमिनीशी निगडीत अनेक क्षेत्रे आहेत. तुम्ही चांगले शेतकरी, तलाठी, खाण अभियंते किंवा प्रॉस्पेक्टर होऊ शकाल.
आर्थिक बाबतीत तुम्हाला फार चिंता करण्याची गरज नाही. तुमच्या मार्गात तुम्हाला अनेक संधी मिळतील. तुम्ही शून्यातून विश्व निर्माण करू शकता, केवळ तुमच्या स्रोतांचा वापर सट्टेबाजीसाठी केला तर मात्र धोका उत्पन्न होऊ शकतो. आर्थिक बाबतीत तुम्ही तुमच्या मित्रांसाठी आणि स्वतःसाठीसुद्धा एक कोडेच असाल. तुम्ही पैशाचा वापर कराल आणि त्याचा वापर वेगळ्या पद्धतीने कराल. सर्वसामान्यपणे तुम्ही पैसे कमविण्यात आणि संपत्तीच्या बाबतीत नशीबवान असाल, विशेषतः जमीन, घरे किंवा प्रॉपर्टीच्या बाबतीत तुम्हाला यश मिळेल.