जवळच्या नातेवाईकाच्या किंवा कुटंबातील सदस्याच्या मृत्युची बातमी समजेल. एखादा विकार होण्याची शक्यता असल्यामुळे आरोग्याची नीट काळजी घ्या. संपत्तीचे नुकसान, आत्मविश्वासात कमतरता, व्यर्थ आणि मानसिक चिंता संभवतात. लोकांना तुमच्या प्रति असलेल्या आसूयेमुळे समस्या उद्भवू शकतात. चोरीमुळे आर्थिक नुकसान होऊ शकते. कुसंगत आणि वाईट सवयी लागण्याची शक्यता आहे.
Apr 25, 2024 - Jun 22, 2024
या कालावधीची सुरुवात काहीशी कठीणच होईल. तुमच्या कामात आणि संधीमध्ये कपात होईल, पण अनावश्यक कामे मात्र वाढतील. नवीन गुंतवणूक किंवा धोके पत्करणे टाळावे कारण नुकसान संभवते. नवीन प्रोजेक्ट किंवा नवीन गुंतवणूक करू नका. तुमच्या वरिष्ठांशी आक्रमकपणे वागू नका. इतरांकडून मदत घेण्यापेक्षा स्वत:च्या क्षमतांचा वापर करा. चोरी किंता तत्सम कारणांमुळे आर्थिक नुकसान संभवते. तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. एखाद्या मृत्यूची बातमी मिळू शकते.
Jun 22, 2024 - Aug 12, 2024
अनेक अडचणी आणि कष्टप्रद काळानंतरचा हा काळ खूप चांगला आहे आणि अखेर तुम्ही थोडीशी विश्रांती घेऊ शकता आणि यशाची चव चाखू शकता आणि या आधी जे कष्ट केलेत त्याचे झालेले चीज उपभोगू शकता. शंकास्पद सट्टेबाजीचे व्यवहार टाळलेत तर आर्थिक बाबतीत तुमचे नशीब उत्तम असेल. प्रवासात चांगले मित्र मिळतील. राजकीय आणि महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींशी जवळीक वाढेल. तुमच्या कुटुंबात मुलाचा जन्म होईल.
Aug 12, 2024 - Sep 03, 2024
तुम्ही तुमचा स्वभाव समतोल ठेवा, जेणेकरून चांगले निष्कर्ष मिळतील. या काळात विकास होईल. तुमचे सहकारी आणि वरिष्ठ यांच्याशी सुसंवाद राहील. उत्पन्नाचा स्रोत व्यवस्थित राहील आणि कौटुंबिक आयुष्याचा आनंद घ्याल. अध्यात्मिकदृष्ट्या तुम्ही सक्रीय व्हाल. तुम्ही बढतीची अपेक्षा करत असाल तर ते नक्की होईल. तुमच्या मित्रांची संख्या वाढेल. अचानक होणार प्रवास तुम्हाला फलदायी ठरेल. तुम्ही थोडा दानधर्म कराल आणि तुमची या काळात समृद्धी होईल.
Sep 03, 2024 - Nov 03, 2024
तुमच्या समोरील आव्हानांवर मात करण्यासाठी तुम्ही नव्या कल्पना लढवाल. व्यवहार अत्यंत सुरळीत आणि सहज पार पडतील कारण तुम्ही तुमच्या स्पर्धकांच्या एक पाऊल पुढे असाल. एकाहून अधिक स्रोतांमधून तुम्हाला उत्पन्न मिळेल. तुमचे क्लाएंट्स, सहकारी आणि इतर संबंधित व्यक्ती यांच्याशी असलेले तुमचे संबंध सुधारतील. तुम्ही या काळात काही चैनीच्या वस्तू विकत घ्याल. एकूणातच हा काळ तुम्हाला उत्पन्न मिळवून देणारा असेल.
Nov 03, 2024 - Nov 21, 2024
स्वत:ला व्यक्त करण्यासाठी आणि सृजनशील क्षमतांचा वापर करण्यासाठी हा अनुकूल समय आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी आणि व्यावसायिक आयुष्यात अनपेक्षित बदल घडण्याची शक्यता आणि हे बदल तुमच्यासाठी लाभदायी ठरणार आहेत. वरिष्ठ आणि अधिकारी वर्गाची कृपादृष्टी राहील. तुमच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक आयुष्यात सकारात्मक बदल घडेल. वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता. या कालावधीत तुम्ही निश्चितपणे यशस्वी व्हाल आणि तुमची इच्छापूर्ती निश्चित होईल.
Nov 21, 2024 - Dec 21, 2024
हा तुमच्यासाठी समृद्धीचा काळ आहे. तुम्हाला अनेक अनपेक्षित गोष्टी मिळतील, त्या आनंद देणाऱ्याच असतील. तुमची पत्नी आणि नातेवाईकांकडूनही आनंदाचा प्रसाद मिळेल. न्यायालयीन खडले आणि याचिकांमध्ये यश मिळेल. तुम्ही नवीन घर किंवा वाहन खरेदी कराल. करारांमधून भरघोस फायदा मिळेल. तुमच्या शत्रुंवर एकूणच तुमचे वर्चस्व राहील. आर्थिक बाबींचा विचार करता हा काळ अनुकूल आहे.
Dec 21, 2024 - Jan 12, 2025
तुमची कष्ट करायची तयारी असेल तर हा काळात तुम्हाला यश निश्चित मिळणार आहे. तुम्ही फार प्रयत्न न करताही नवीन संधी मिळतील. घरी आणि कामाच्या ठिकाणी होणारे बदल तुमच्या पथ्यावर पडतील. तुम्ही या वेळी काही निश्चित निर्णय घ्याल. ते निर्णय तुम्हाला प्रगतीपथावर नेईन. या काळात तुमचा वायफळ खर्च होण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवायला हवे. तुम्हाला आत्मविश्वास आणि उर्जेची कमी जाणवेल.
Jan 12, 2025 - Mar 07, 2025
हा संमिश्र घटनांचा काळ आहे. व्यावसायिक क्षेत्रात तुम्ही 100 टक्के योगदान द्याल. तुमचे ध्येय निश्चित राहील आणि एकदा हाती घेतलेले काम पूर्ण होईपर्य़ंत तुम्ही थांबणार नाही आणि तुमची एकाग्रताही कायम राहील. तुमच्या व्यक्तिमत्वात अहंकाराचा समावेश होण्याची शक्यता आहे. तुमच्या या वागणूकीमुळे तुमच्या लोकप्रियतेत घट होईल. लोकांशी संवाद साधताना सौम्य आणि लवचिक राहा. तुमच्या भावाबहिणींनी तुम्ही मदत कराल. तुमच्या नातेवाईकांना अडचणींचा सामना करावा लागेल.
Mar 07, 2025 - Apr 25, 2025
या वर्षात कौटुंबिक आणि व्यावसायिक पातळीवर केलेल्या भागिदाऱ्या तुम्हाला फायदेशीर ठरतील. तुम्ही ज्या बदलाची इतकी वर्ष वाट पाहत होतात, तो बदल या वर्षात घडून येईल. तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडाल आणि तुमचे पालक, भावंड आणि नातेवाईकांशी तुमचे अत्यंत जवळचे संबंध राहतील. संवाद आणि वाटाघाटी तुमच्या बाजूने राहतील आणि तुम्हाला नवीन संधी प्राप्त करून देतील. व्यवसाय आणि कामाच्या निमित्ताने वारंवार प्रवास होईल. तुम्ही कदाचित हिरे, दागिने यांची खरेदी कराल.