तुमच्या कामाच्या ठिकाणी, मित्रांसोबत आणि कुटुंबामध्ये एकोपा राखण्यासाठी काय करावे लागेल, याचे मार्ग तुम्हाला सापडतील. मित्र आणि तुमच्या भावांमुळे तुम्हाला लाभ होईल. राजघराण्यांकडून किंवा उच्च अधिकाऱ्यांकडून तुम्हाला मदत मिळेल. तुमच्या आय़ुष्यात होणारे बदल हे सखोल आणि चिरंतन टिकणारे असतील. तुमच्या इच्छा पूर्ण होतील.
Apr 8, 2025 - Apr 29, 2025
हा तुमच्यासाठी अत्यंत समृद्धीचा काळ आहे. त्यामुळे याचा पूर्णपणे फायदा घेण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला ताणापासून आणि अडचणींपासून दिलासा मिळेल. कुटुंबातील व्यक्ती आणि सहकाऱ्यांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल. वाहन चालवताना काळजी घ्या. तुमच्या आक्रमकतेमुळे आणि विरोधकांना नेस्तनाभूत करण्याच्या मनस्थितीमुळे विरोधक तुम्हाला सतावणार नाहीत. तुम्ही धाडसाने सर्व कामे पूर्ण कराल आणि व्यावसायिक स्तरावरही तुमची प्रगती होईल.
Apr 29, 2025 - Jun 23, 2025
नवीन प्रकल्प किंवा मोठी गुंतवणूक टाळावी. व्यावसायिक म्हणून काम करत असाल तर हे वर्ष साधारणच राहील. नियमित अडथळे जाणवतील आणि साधारण वाढ होईल. निश्चित अशा प्रगतीसाठी वाट पाहावी लागेल. अस्थैर्य आणि संशयास्पद समय आहे. कोणताही बदल करू नका कारण तो तुम्हाला घातक ठरेल. या काळात तुमची पत काहीशी घसरेल. घरचा विचार करता काही असुरक्षितता जाणवेल.
Jun 23, 2025 - Aug 10, 2025
तुमच्या कुटुंबियांशी अधिक सखोल नाते निर्माण व्हावे, अशी तुमची इच्छा आहे. नवनवीन कल्पनांचा शोध घेणे, तुम्ही तुमच्या पालकांकडून शिकला आहात. कुटुंबात एकोपा राहील. तुमची नीतीमूल्ये आणि आदर्श राहणीमानामुळे तुम्हाला अनेक आशीर्वाद मिळतात. तुमच्या या उर्जेमुळे तुमचा जोडीदार आणि नातेवाईक यांना काकणभर अधिक सुख मिळते. या काळात तुमच्या आयुष्यात होणारे बदल हे जाणवणारे आणि दीर्घकाळापर्यंत टिकणारे असतील. तुम्ही तुमची एक गाडी विकून दुसरी घ्याल किंवा गाडी विकून तुम्हाला फायदा होईल.
Aug 10, 2025 - Oct 07, 2025
या काळ तुमच्यासाठी फार अनुकूल नाही. आर्थिक बाबतीत समस्या जाणवतील. तुमच्या रविशंकर ्तेष्टांसोबत आणि नातेवाईकांसोबत असलेल्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. तुमच्या दैनंदिन आचरणाकडे लक्ष द्या. व्यवसायामध्ये फार धोका पत्करण्याचा हा काळ नाही कारण नुकसान होण्याची शक्यता आहे. तुमच्या पालकांच्या आजारपणामुळे तुम्ही त्रासलेले असाल. तुमच्या कुटुंबाच्या अपेक्षा तुम्ही पूर्ण करू शकणार नाही.
Oct 07, 2025 - Nov 28, 2025
कामातून किंवा व्यवसायातून मिळणारे उत्पन्न आणि पत उंचावेल आणि त्यातून अधिक लाभ होईल. विरोधकांची हार, वाढलेली संपत्ती, ज्ञानार्जन आणि वरिष्ठांची कृपादृष्टी राहील. या कालावधीत होणार प्रवास लाभदायी असेल. हा प्रवास तुम्हाला मानवता, तत्वज्ञान आणि सखोल दृष्टी शिकवेल. व्यावसायिक आणि घरच्या पातळीवरील जबाबदाऱ्या सफाईदारपणे पार पाडाल.
Nov 28, 2025 - Dec 19, 2025
या काळात तुम्ही धार्मिक कार्य कराल आणि तुमची वागणूक चांगली असेल. तुम्ही धर्म आणि अध्यात्म यात रुची घ्याल. या वर्षी खासगी आणि व्यावसायिक आयुष्यात तुम्हाला भागिदारी लाभदायी ठरेल. महत्त्वाचे म्हणजे इतकी वर्षे तुम्ही ज्या आयुष्य बदलून टाकणाऱ्या बदलाची वाट पाहात होतात, तो बदल आता घडणार आहे. या काळात तुम्हाला अधिकार प्राप्त होईल. कामाच्या ठिकाणी, मित्रांसमवेत आणि कुटुंबियांशी चांगले संबंध कसे ठेवावेत याबाबत तुम्ही नवीन धडे घेत आहात. कौटुंबिक वर्तुळात आनंद असेल.
Dec 19, 2025 - Feb 18, 2026
तुम्ही एखादा नवीन प्रकल्प सुरू करण्याचा किंवा योजना राबविण्याचा विचार करत असाल तर नशीब तुमच्या बाजूने असेल. तुमच्या कारकीर्दीतही प्रगती होईल. तुमची काम करायची तयारी असेल तर हा तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल कालावधी आहे. तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी कराल आणि हुशारीने गुंतवणूक कराल. विरुद्ध लिंगी व्यक्तींचा सहवास लाभेल. तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून मिळणाऱ्या सहकार्यात वाढ होईल. चविष्ठ आणि उंची जेवणाप्रती तुमची चव विकसित होईल. घरी एखादे स्नेहभोजन होण्याची शक्यता आहे.
Feb 18, 2026 - Mar 08, 2026
घराकडे फार दुर्लक्ष न करता, अधिक लक्ष द्या आणि काळजी घ्या. कौटुंबिक समस्या आणि त्यातून निर्माण होणार तणाव यांच्याशी जुळवून घेणे कठीण जाईल. कुटुंबात मृत्यूची शक्यता आहे. आर्थिक आणि मालमत्तेच नुकसान संभवते. आर्थिक व्यवहारांबाबत सतर्क राहा. घसा, तोंड आणि डोळ्यांचे विकार संभवतात.
Mar 08, 2026 - Apr 08, 2026
शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने हा कालावधी फार अनुकूल नाही. आरोग्याच्या तक्रारी आणि मानसिक तणाव संभवतात. तुमच्या कुटुंबियांसमोर आणि मित्रांसमोर तुमचे शत्रू तुमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यापासून शक्य तेवढे लांब राहण्याचा प्रयत्न करा. आरोग्याच्या तक्रारीची दाट शक्यता आहे, त्यामुळे त्याबाबत सावधानता बाळगा. तुमच्या जोडीदाच्या प्रकृती अस्वास्थ्याचीही शक्यता आहे.