तुमच्या आर्थिक आणि सामाजिक स्थानाच्या बाबतीत चढ-उतार संभवतात. आर्थिक आणि मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाजूंची नीट काळजी घ्या. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा कारण जवळचे सहकारी आणि नातेवाईक यांच्याशी वाद होण्याची शक्यता आहे. तुमच्या आऱोग्याकडेही लक्ष द्या कारण त्या बाबातीत आजारपण संभवते.
Sep 27, 2025 - Nov 18, 2025
अनेक अडचणी आणि कष्टप्रद काळानंतरचा हा काळ खूप चांगला आहे आणि अखेर तुम्ही थोडीशी विश्रांती घेऊ शकता आणि यशाची चव चाखू शकता आणि या आधी जे कष्ट केलेत त्याचे झालेले चीज उपभोगू शकता. शंकास्पद सट्टेबाजीचे व्यवहार टाळलेत तर आर्थिक बाबतीत तुमचे नशीब उत्तम असेल. प्रवासात चांगले मित्र मिळतील. राजकीय आणि महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींशी जवळीक वाढेल. तुमच्या कुटुंबात मुलाचा जन्म होईल.
Nov 18, 2025 - Dec 09, 2025
या काळात तुम्ही धार्मिक कार्य कराल आणि तुमची वागणूक चांगली असेल. तुम्ही धर्म आणि अध्यात्म यात रुची घ्याल. या वर्षी खासगी आणि व्यावसायिक आयुष्यात तुम्हाला भागिदारी लाभदायी ठरेल. महत्त्वाचे म्हणजे इतकी वर्षे तुम्ही ज्या आयुष्य बदलून टाकणाऱ्या बदलाची वाट पाहात होतात, तो बदल आता घडणार आहे. या काळात तुम्हाला अधिकार प्राप्त होईल. कामाच्या ठिकाणी, मित्रांसमवेत आणि कुटुंबियांशी चांगले संबंध कसे ठेवावेत याबाबत तुम्ही नवीन धडे घेत आहात. कौटुंबिक वर्तुळात आनंद असेल.
Dec 09, 2025 - Feb 08, 2026
नाण्याची दुसरी बाजू ही की, थोडेसे वाद आणि जवळच्या व्यक्तीशी विरहाची शक्यता आहे. महत्त्वाची गोष्ट ही की दुसऱ्याच्या भांडणात स्वत:ला गोवून घेऊ नका. तुमच्या आरोग्याची आणि आर्थिक परिस्थिती धोक्यात असेल. तुम्ही एखाद्या घोटाळ्यात अडकले जाल आणि तुमच्या प्रतिमेला कदाचित थोडासा धक्का पोहोचेल. अचानक धनलाभाची शक्यता आहे पण खर्चही तेवढेच जास्त असतील, हेही नमूद करावे लागेल. या काळात जरा जास्तच धोका आहे, त्यामुळे सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. प्रवासामुळे फार लाभ होणार नाही, त्यामुळे तो टाळावा.
Feb 08, 2026 - Feb 26, 2026
हा कालावधी मिश्र घटनांचा राहील. तुम्ही काही प्रभावशाली व्यक्तिमत्वांना आकर्षित करू शकाल, आणि त्या व्यक्ती तुमच्या योजना आणि प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी सहाय्य करण्यास तयार असतील. तुमच्या कष्टांचे चीज होण्यासाठी तुम्हाला फार काळ वाट पाहावी लागणार नाही. तुमच्या भावंडांमुळे काही समस्या किंवा तणावाचे प्रसंग उद्भवतील. तुमच्या पालकांच्या आरोग्याच्या तक्रारी सुरू होण्याची शक्यता असल्यामुळे त्यांच्याकडे अधिक लक्ष पुरविण्याची आवश्यकता आहे. काही धार्मिक कार्य होण्याची शक्यता. आर्थिक बाबींचा विचार करता हे वर्ष लाभदायी असले.
Feb 26, 2026 - Mar 29, 2026
हा तुमच्यासाठी आर्थिक स्थैर्याचा कालावधी आहे. या काळात तुम्ही तुमची इच्छापूर्ती आणि महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू शकता. प्रेम आणि रोमान्ससाठी हा अनुकूल काळ आहे. या काळात तुमच्या नवीन ओळखी होतील आणि त्या तुमच्यासाठी लाभदायी आणि उपयुक्त असतील. समजाकडून तुमचा आदर आणि सन्मान केला जाईल आणि विरुद्ध लिंगाच्या व्यक्तींमध्ये तुम्ही लोकप्रिय व्हाल. दूरचा प्रवास संभवतो.
Mar 29, 2026 - Apr 19, 2026
परीक्षेत यश, बढती, कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठा उंचावणे या काळात घडेल. कुटुंबाकडून मिळणाऱ्या सहकार्य़ात वाढ होईल. तुमच्यापासून लांब राहणाऱ्या आणि परदेशी सहकाऱ्यांकडून मदत मिळेल. तुम्हाला नवीन काम मिळेल आणि ते अत्यंत फायदेशीर असेल. कोणतीही विपरीत परिस्थिती उद्भवली तरी त्याला तुम्ही आत्मविश्वासाने सामोरे जाल.
Apr 19, 2026 - Jun 13, 2026
नवीन प्रकल्प किंवा मोठी गुंतवणूक टाळावी. व्यावसायिक म्हणून काम करत असाल तर हे वर्ष साधारणच राहील. नियमित अडथळे जाणवतील आणि साधारण वाढ होईल. निश्चित अशा प्रगतीसाठी वाट पाहावी लागेल. अस्थैर्य आणि संशयास्पद समय आहे. कोणताही बदल करू नका कारण तो तुम्हाला घातक ठरेल. या काळात तुमची पत काहीशी घसरेल. घरचा विचार करता काही असुरक्षितता जाणवेल.
Jun 13, 2026 - Jul 31, 2026
हा तुमच्यासाठी फार अनुकूल काळ नाही. तुमचे शत्रू तुमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही कदाचित असे काम कराल, ज्यातून तुम्हाला फारसा फायदा होणार नाही. अचानक नुकसान संभवते. धोका पत्करण्याच्या वृत्तीला खिळ घालावी लागेल, कारण हा फार अनुकूल काळ नाही. लहान-सहान मुद्यांवरून नातेवाईक आणि मित्रांशी वाद होतील. मोठे निर्णय घेऊ नका कारण गोत्यात येण्याची शक्यता आहे. तुम्हाला कदाचित अशी कामे करावी लागतील, ज्याचे कोणत्याही प्रकारचे श्रेय तुम्हाला मिळणार नाही. या काळात महिलांना मासिक पाळीच्या समस्या उद्भवतील, तसेच हगवण आणि डोळ्यांचे विकारही संभवतात.
Jul 31, 2026 - Sep 27, 2026
नशीबाची साथ आणि मानसिक स्थैर्य यामुळे तुमचे गृहस्थ जीवन सकारात्मक राहील. पत्नीच्या माध्यमातून लाभ होईल. प्रवास, उच्चशिक्षण, संवाद, नवीन उद्योगाची सुरुवात, व्यवसाय या दृष्टीने हे वर्ष अत्यंत अनुकूल आहे. या कालावधीत सगेसोयरे आणि नातेवाईक यांच्याशी वाद होतील आणि कदाचित शत्रुत्वही निर्माण होईल. व्यावसायिकदृष्ट्या तुम्हाला चांगले निष्कर्ष मिळतील. एकूणातच हा काळ अत्यंत अनुकूल असेल.