Rinku Rajguru
Jun 03, 2001
14:30:48
Akluj
75 E 1
17 N 53
5.5
Unknown
खराब डेटा
तुमच्या कार्यक्षेत्राने तुम्हाला बौद्धिक समाधान आणि वैविध्य देणे अपेक्षित असते. एकाच वेळी तुम्हाला अनेक गोष्टी करायला आवडतात आणि त्यामुळे तुम्ही कदाचित दोन व्यवसायात काम कराल.
तुम्ही एखादे क्षेत्र निवडलेत की त्यात पूर्णपणे समरसून जाल. नंतर त्यात एकसूरीपणा आला की तुम्ही अस्वस्थ व्हाल आणि पूर्णपणे बदल करण्याचा प्रयत्न कराल. त्यामुळे ज्या कामात खूप वैविध्य असेल असे क्षेत्र तुम्ही निवडले पाहिजे. तुम्हाला एका ठिकाणी बसवून ठेवणारे काम आवडणार नाही. तुमच्या कामात हालचाल आवश्यक आहे. पर्यटन व्यवसायातील काम तुम्हाला आवडू शकेल. पण अशी अनेक क्षेत्रे आहेत, जिथे तुमच्या कामाचे स्वरूप फिरतीचे असेल आणि तुम्ही रोज नव्या लोकांना भेटाल. तुमच्याकडे उत्तम कार्यकारी क्षमता आहे. त्यामुळे वयाच्या पस्तीशीनंतर तुम्ही त्या क्षमतेचा योग्य वापर करू शकाल. त्याचप्रमाणे या वयात कुणाच्याही हाताखाली काम करणे तुम्हाला फार रुचणार नाही.
तुमचे व्यवसायात भागीदारांशी फार जमणार नाही. तुम्ही तुमच्या नशीबाचे शिल्पकार असाल आणि क्वचितच दुसऱ्यांकडून मदत घ्याल. असे असले तरी भविष्यात तुम्ही निश्चितच यशस्वी व्हाल आणि लक्ष्मी तुमच्या घरी पाणी भरेल. आर्थिक बाबती तुमची तल्लख बुद्धी तुम्हाला अनेक संधी उपलब्ध करून देईल. एका वेळी तुम्ही खूप श्रीमंत असाल आणि काही वेळा परिस्थिती एकदम उलट असेल. जेव्हा तुमच्याकडे पैसे असतील तेव्हा तुम्ही ऐषोआरामी जीवन जगाल आणि जेव्हा नसतील तेव्हा तुम्ही त्याही परिस्थितीशी जुळवून घ्याल. किंबहुना धोका हाच आहे की तुम्ही कोणत्याही परिस्थितीशी आणि माणसांशी जुळवून घेऊ शकता. तुम्ही यावर नियंत्रण ठेवलेत तर ज्या क्षेत्रात, व्यवसायात किंवा उद्योगात तुम्ही आहात, तिथे तुम्ही यशस्वी व्हाल.