तुमच्या कामाच्या ठिकाणी, मित्रांसोबत आणि कुटुंबामध्ये एकोपा राखण्यासाठी काय करावे लागेल, याचे मार्ग तुम्हाला सापडतील. मित्र आणि तुमच्या भावांमुळे तुम्हाला लाभ होईल. राजघराण्यांकडून किंवा उच्च अधिकाऱ्यांकडून तुम्हाला मदत मिळेल. तुमच्या आय़ुष्यात होणारे बदल हे सखोल आणि चिरंतन टिकणारे असतील. तुमच्या इच्छा पूर्ण होतील.
Dec 16, 2024 - Feb 02, 2025
तुम्ही स्वत:ची काळजी घ्या आणि स्वत:वर जास्त दबाव येऊ देऊ नका, जेणेकरून तुम्ही दीर्घकाळपर्यंत व्यवस्थित काम करू शकाल. काही अपेक्षाभंगाचे प्रसंग घडतील. तुमचे धाडस आणि अंदाज हे तुमचे बलाढ्य गुण आहेत, पण त्यामुळे तुम्हाला थोडा अहंकार चढू शकेल. मोठी गुंतवणूक करू नका, कारण तुमच्या अपेक्षेप्रमाणे त्यातून फायदा होणार नाही. तुमचे मित्र आणि सहकारी यांच्याकडून तुम्हाला योग्य सहकार्य मिळणार नाही. कुटुंबातील व्यक्तींचा दृष्टिकोन वेगळा असू शकेल. आरोग्याच्या कुरबुरी सुरू राहतील आणि तुम्हाला मळमळ, ताप, कानाची दुखणी आणि उलट्या यासारखे विकार संभवतात.
Feb 02, 2025 - Apr 01, 2025
नोकरीच्या संदर्भातली कामे फार आशादायक नसतील आणि समाधानकारकही नसतील. कामाच्या ठिकाणी अशांत वातावरण असेल आणि फार दबाव असेल. धोका पत्करण्याच्या वृत्तीला पूर्ण आवर घालावा. कोणतेही मोठे काम करण्याचे टाळा. एक व्यावसायिक म्हणून काम करत असाल तर या वर्षी तुम्हाला अनेक अडथळ्यांचा आणि आव्हानांचा सामना करावा लागेल. अस्थैर्य आणि गोंधळाचे वातावरण असेल. तुमच्या रितिका सिंह ्तेष्टांकडून पूर्ण सहकार्य मिळणार नाही. तुमच्याविरोधात कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे. तुमच्या जवळची माणसे तुम्हाला दु:ख देतील. अपत्यांशी संबंधित कामांमध्ये समस्या निर्माण होतील. या काळात शांतच राहा आणि बदल टाळा.
Apr 01, 2025 - May 23, 2025
कामातून किंवा व्यवसायातून मिळणारे उत्पन्न आणि पत उंचावेल आणि त्यातून अधिक लाभ होईल. विरोधकांची हार, वाढलेली संपत्ती, ज्ञानार्जन आणि वरिष्ठांची कृपादृष्टी राहील. या कालावधीत होणार प्रवास लाभदायी असेल. हा प्रवास तुम्हाला मानवता, तत्वज्ञान आणि सखोल दृष्टी शिकवेल. व्यावसायिक आणि घरच्या पातळीवरील जबाबदाऱ्या सफाईदारपणे पार पाडाल.
May 23, 2025 - Jun 13, 2025
हा काळ तुमच्यासाठी फार अनुकूल नाही. तुमच्याकडून अनावश्यक खर्च होईल पण तुम्हाला त्यावर आवर घालावा लागेल. कोणत्याही प्रकारचा सट्टा खेळू नका. कामाचा दबाव खूप असल्याने प्रचंड कष्ट करावे लागतील. उद्योगात कोणताही धोका पत्करू नका कारण हा काळ तुमच्यासाठी फार अनुकूल नाही. तुमचे शत्रू तुमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करतील. कौटुंबिक वातावरणही फार एकोप्याचे नसेल. या मनस्तापाचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होईल. मंत्र आणि अध्यात्मिक कार्याकडे तुमचा कल राहील.
Jun 13, 2025 - Aug 13, 2025
तुम्हाला सत्ता मिळेल, या सत्तेची फळं कदाचित तुम्ही या पूर्वी अनुभवलेली नसतील. व्यक्तिगत आय़ुष्यात तुमच्या जवळची माणसे तुमच्यावर अवलंबून असतील. तुम्हाला या काळात खूप प्रसिद्धी मिळेल. तुम्ही मानसिक दृष्ट्या कणखर राहाल. तुमच्या पत्नीसोबतचा तुमचा संवाद आणि तुमचे संबंध प्रेमाचे राहतील. अपत्यप्राप्ती संभवते. तुमचे सहकारी तुम्हाला पूर्ण सहकार्य देतील. एकूणच हा अत्यंत आनंददायी समय असेल.
Aug 13, 2025 - Aug 31, 2025
हा तुमच्यासाठी आरामदायी कालावधी आहे. तुम्ही आत्मविश्वासपूर्ण असाल आणि दृष्टिकोनही सकारात्मक राहील. तुमचे कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील आणि तुमच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. पण तुमच्या भावाच्या प्रकृतीच्या कुरबुरींची शक्यता आहे. या काळात प्रवास संभवतो. कमी अंतराचा प्रवास फलदायी ठरेल आणि नशीब फळफळेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता. सामाजिक आणि कौटुंबिक जीवनाचा आनंद लुटाल. आरोग्य निरोगी राहील आणि शत्रुवर विजय मिळवाल.
Aug 31, 2025 - Oct 01, 2025
कुटुंबात एकोपा आणि समजुतदारपणा वाढेल. तुमचे ज्ञान वाढविण्यासाठी, तुमच्या सहकाऱ्यांकडून शिकण्यासाठी हा अनुकूल कालावधी आहे. मित्र आणि अनोळखी व्यक्तींशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध लाभकारक ठरतील. जमिनीच्या व्यवहारातून फायदा होईल. या काळात तुम्ही चांगल्या कार्यासाठी दानधर्म कराल. तुमच्या मुलांनाही यश मिळेल आणि तुमच्या आयुष्यात आनंद निर्माण होईल. एक सुखासीन आयुष्य तुमची वाट पाहत आहे.
Oct 01, 2025 - Oct 22, 2025
परीक्षेत यश, बढती, कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठा उंचावणे या काळात घडेल. कुटुंबाकडून मिळणाऱ्या सहकार्य़ात वाढ होईल. तुमच्यापासून लांब राहणाऱ्या आणि परदेशी सहकाऱ्यांकडून मदत मिळेल. तुम्हाला नवीन काम मिळेल आणि ते अत्यंत फायदेशीर असेल. कोणतीही विपरीत परिस्थिती उद्भवली तरी त्याला तुम्ही आत्मविश्वासाने सामोरे जाल.
Oct 22, 2025 - Dec 16, 2025
फायदेशीर व्यवहार कराल. कर्जासाठी अर्ज केला असेल तर कर्ज मंजूर होईल. आरोग्याच्या थोड्याशा कुरबुरी राहतील. व्यावसायिक आणि खासगी आयुष्यात समतोल साधाल आणि आयुष्याच्या या दोन्ही महत्त्वाच्या अंगांकडे तुम्ही उत्तम प्रकारे लक्ष पुरवाल. खूप कष्टांनंतर तुमच्या इच्छा पूर्ण होतील, आणि अखेर तुम्हाला समृद्धी, उत्पन्न आणि लाभ मिळेल. स्पर्धेत विजेते ठराल आणि मुलाखतींमध्ये यशस्वी व्हाल.