रोहिणी हट्टंगडी
Apr 11, 1951
3:13:0
Pune
73 E 58
18 N 34
5.5
Kundli Sangraha (Bhat)
अचूक (अ)
काम आणि खेळांबाबत तुम्ही जितके उत्साही असता तेवढेच उत्साही प्रेमाबाबतही असता. तुम्ही जेव्हा प्रेमात पडता तेव्हा तुम्हाला सतत त्या व्यक्तीचा सहवास हवा असतो. तुम्ही कामाकडे दुर्लक्ष करत नाही. पण जेव्हा काम संपते तेव्हा तुम्ही ठरवलेल्या ठिकाणी वेळत पोहचण्यासाठी घाई करता. लग्न झाल्यावर मात्र घरात तुमची सत्ता असावी, असे तुम्हाला वाटत असते. केवळ आक्रमकपणे सत्ता गाजवणे गरजेचे नाही, चांगल्या प्रकारेही सत्ता गाजवता येते. तुम्ही स्त्री असाल तर तुम्ही तुमच्या पतीला व्यवसायात मदत कराल आणि तुम्ही हे काम अत्यंत कौशल्याने पार पाडाल.
तुम्ही दणकट आहात असे म्हणणे ही दिशाभूल ठरेल. असे असले तरी थोडीशी काळजी घेतली तर तुम्ही दीर्घायुषी आयुष्य जगू शकाल. दोन गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे. अपचन आणि संधिवात. अपचनासंदर्भात सांगायचे झाले तर भराभर जेवू नका, शांतपणे जेवा. त्याचप्रमाणे दिवसातून नियमित वेळा आहार घ्या. जोपर्यंत तुम्ही आर्द्र हवेत किंवा थंड वाऱ्यांच्या सानिध्यात किंवा ओले पाय करून राहत नसाल तर संधिवाताची काळजी करण्याची गरज नाही.
फावल्या वेळात तुम्ही बाहेरगावी जाल आणि तुमच्यासाठी हा वेळ अत्यंत लाभदायी असेल. पण तुम्ही त्याचा अतिरेक कराल आणि प्रकृतीवर परिणाम कराल, अशीही शक्यता आहे. तुम्हाला मोकळ्या हवेत फिरणे आवडते. त्यामुळे जर तुम्हाला घोेडेस्वारी आकर्षित करत नसेल तर तुम्हाला वेगात कार चालवणे नक्कीच आवडत असेल किंवा ट्रेनचा लांबचा प्रवास आणि आनंददायी सफर नक्कीच आवडत असेल. तुम्हाला पुस्तकांच्या माध्यमातून माहिती घेणे आवडते आणि एखाद्या पर्यटनातून तुम्हाला काही ज्ञान मिळाले तर ते हवे असते. तुम्हाला मिळालेल्या ज्ञानातून तुम्हाला खूप समाधान मिळते.