अचानक आर्थिक नुकसान संभवते. प्रयत्न अपयशी ठरल्यामुळे तुम्ही निराश व्हाल. कामाचा दबाव खूप असल्याने प्रचंड कष्ट करावे लागतील. बाहेरच्या जमिनींतून तुम्ही विस्थापित व्हाल, तिथून रवानगी होईल किंवा त्याबाबत समस्या उद्भवतील. कुसंगत जडण्याची शक्यता आहे, त्यामुळे सावध राहा. आरोग्य कमकुवत राहील आणि तुम्हाला अनेक विकार होण्याची शक्यता आहे. तुमच्या सामाजिक स्थानालाही धक्का पोहोचण्याची शक्यता आहे. समाजातील चांगल्या व्यक्तींसोबत वाद होतील.
Sep 22, 2024 - Oct 13, 2024
तुमची कष्ट करायची तयारी असेल तर हा काळात तुम्हाला यश निश्चित मिळणार आहे. तुम्ही फार प्रयत्न न करताही नवीन संधी मिळतील. घरी आणि कामाच्या ठिकाणी होणारे बदल तुमच्या पथ्यावर पडतील. तुम्ही या वेळी काही निश्चित निर्णय घ्याल. ते निर्णय तुम्हाला प्रगतीपथावर नेईन. या काळात तुमचा वायफळ खर्च होण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवायला हवे. तुम्हाला आत्मविश्वास आणि उर्जेची कमी जाणवेल.
Oct 13, 2024 - Dec 07, 2024
फायदेशीर व्यवहार कराल. कर्जासाठी अर्ज केला असेल तर कर्ज मंजूर होईल. आरोग्याच्या थोड्याशा कुरबुरी राहतील. व्यावसायिक आणि खासगी आयुष्यात समतोल साधाल आणि आयुष्याच्या या दोन्ही महत्त्वाच्या अंगांकडे तुम्ही उत्तम प्रकारे लक्ष पुरवाल. खूप कष्टांनंतर तुमच्या इच्छा पूर्ण होतील, आणि अखेर तुम्हाला समृद्धी, उत्पन्न आणि लाभ मिळेल. स्पर्धेत विजेते ठराल आणि मुलाखतींमध्ये यशस्वी व्हाल.
Dec 07, 2024 - Jan 25, 2025
तुम्ही स्वत:ची काळजी घ्या आणि स्वत:वर जास्त दबाव येऊ देऊ नका, जेणेकरून तुम्ही दीर्घकाळपर्यंत व्यवस्थित काम करू शकाल. काही अपेक्षाभंगाचे प्रसंग घडतील. तुमचे धाडस आणि अंदाज हे तुमचे बलाढ्य गुण आहेत, पण त्यामुळे तुम्हाला थोडा अहंकार चढू शकेल. मोठी गुंतवणूक करू नका, कारण तुमच्या अपेक्षेप्रमाणे त्यातून फायदा होणार नाही. तुमचे मित्र आणि सहकारी यांच्याकडून तुम्हाला योग्य सहकार्य मिळणार नाही. कुटुंबातील व्यक्तींचा दृष्टिकोन वेगळा असू शकेल. आरोग्याच्या कुरबुरी सुरू राहतील आणि तुम्हाला मळमळ, ताप, कानाची दुखणी आणि उलट्या यासारखे विकार संभवतात.
Jan 25, 2025 - Mar 23, 2025
नोकरीच्या संदर्भातली कामे फार आशादायक नसतील आणि समाधानकारकही नसतील. कामाच्या ठिकाणी अशांत वातावरण असेल आणि फार दबाव असेल. धोका पत्करण्याच्या वृत्तीला पूर्ण आवर घालावा. कोणतेही मोठे काम करण्याचे टाळा. एक व्यावसायिक म्हणून काम करत असाल तर या वर्षी तुम्हाला अनेक अडथळ्यांचा आणि आव्हानांचा सामना करावा लागेल. अस्थैर्य आणि गोंधळाचे वातावरण असेल. तुमच्या सबाइन लिस्की ्तेष्टांकडून पूर्ण सहकार्य मिळणार नाही. तुमच्याविरोधात कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे. तुमच्या जवळची माणसे तुम्हाला दु:ख देतील. अपत्यांशी संबंधित कामांमध्ये समस्या निर्माण होतील. या काळात शांतच राहा आणि बदल टाळा.
Mar 23, 2025 - May 14, 2025
उत्पन्न आणि बँक बॅलेन्समध्ये वाढ होईल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा चांगला काळ आहे. या परिवर्तनाच्या काळात नवीन मित्र आणि नाती जोडली जातील आणि त्यांच्यापासून तुम्हाला लाभ होईल. पूर्वीच सुरू केलेले काम आणि नव्याने सुरू केलेल काम याचा तुम्हाला हवा तसा निकाल मिळेल. तुमच्या इच्छापूर्तीचा हा काळ आहे. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू कराल किंवा नवीन करार होतील. वरिष्ठ पदावरील आणि प्रभावशाली व्यक्तींकडून सहकार्य मिळण्याची अपेक्षा आहे. सर्वांगीण समृद्धी या काळात लाभेल. तुमच्या जोडीदाराशी असलेल्या नात्याची अधिक काळजी घ्यावी लागेल.
May 14, 2025 - Jun 04, 2025
हा काळ तुमच्यासाठी फार अनुकूल नाही. तुमच्याकडून अनावश्यक खर्च होईल पण तुम्हाला त्यावर आवर घालावा लागेल. कोणत्याही प्रकारचा सट्टा खेळू नका. कामाचा दबाव खूप असल्याने प्रचंड कष्ट करावे लागतील. उद्योगात कोणताही धोका पत्करू नका कारण हा काळ तुमच्यासाठी फार अनुकूल नाही. तुमचे शत्रू तुमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करतील. कौटुंबिक वातावरणही फार एकोप्याचे नसेल. या मनस्तापाचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होईल. मंत्र आणि अध्यात्मिक कार्याकडे तुमचा कल राहील.
Jun 04, 2025 - Aug 04, 2025
हा काळ तुमच्यासाठी विविध अंगांनी अनुकूल आहे. तुमच्या आजुबाजूचे वातावरण इतके चांगले आहे की, प्रत्येक समस्या सबाइन लिस्की ोसबाइन लिस्की सोडविली जात आहे. तुमच्या घरचे व्यवहार एकदम सुरळीत सुरू राहतील. तुमची जबरदस्त इच्छा आणि उर्जा ही उच्च असेल. उच्चभ्रू वर्गाकडून तुम्हाला मदत मिळेल, तुमची पत वाढेल आणि शत्रूंचा बिमोड होईल. तुमच्या कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक यांच्याकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. तुमच्या आजुबाजूला आल्हाददायक वातावरण असेल.
Aug 04, 2025 - Aug 23, 2025
आक्रमक होऊ नका कारण आक्रमकपणामुळे तुम्ही अडचणीत सापडू शकता. मित्रांसोबत वाद, भांडणे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेवण्याचा प्रयत्न करा, तसे नाही झाले तर तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. आर्थिक चढ-उतार संभवतात. परिवारातील एकोपा आणि सामंजजस्यात अभाव होण्याची शक्यता. आई व पत्नी यांच्यात वाद संभवतात. आरोग्याची काळजी घ्या. डोकेदुखी, डोळ्याचे विकार, पोटाचे विकार, पायात सूज येणे या आजारांबाबर ताबडतोब उपचार करा.
Aug 23, 2025 - Sep 22, 2025
उद्योग किंवा नवीन व्यवसायाबाबत एखादी वाईट बातमी कानी पडण्याची शक्यता आहे. या काळात खूप धोका पत्करू नका, कारण हा कालावधी तुमच्यासाठी अनुकूल नाही. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यामुळे तुमची काळजी वाढेल. सट्टेबाजारात सौदा करू नका कारण त्यातून नुकसान होण्याची शक्यता आहे. तुमचे विरोधक तुमच्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्यात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. पाण्यापासून दूर राहा कारण बुडण्याचा धोका आहे. ताप आणि सर्दी यामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढतील.