तुम्ही समृद्धीचा आनंद घ्याल. या ठिकाणी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण झालेल्या असतील आणि तुम्ही एक तृप्त आयुष्य जगाल. तुमची लोकप्रियता आणि पत वृद्धिंगत होईल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी बढती मिळेल आणि प्रतिष्ठा उंचावेल. मंत्री आणि शासनाची तुमच्यावर मर्जी असेल. तुम्ही नातेवाईकांना आणि समाजाला मदत कराल.
Dec 18, 2024 - Feb 08, 2025
अत्यंत उत्पादनक्षम वर्ष असेल त्यामुळे तुम्ही जे काही ध्येय गाठले आहे, त्याचे समाधान तुम्हाला मिळेल. या काळात तुम्ही आयुष्य पूर्ण सकारात्मकतेने आणि चैतन्याने जगाल. प्रवास, ज्ञानार्जन आणि प्रगतीच्या भरपूर संधी या काळात उपलब्ध होतील. तुमच्या कार्यक्षेत्रात विरुद्ध लिंगी व्यक्तीकडून सहकार्य मिळेल. तुम्ही ज्या आदरास लायक आहात, तो आदर तुम्हाला या काळात मिळेल आणि तुमचे जीवन अधिक स्थिर होईल. सट्टेबाजारातील व्यवहार फायदेशीर ठरतील. जमीन किंवा वाहन खरेदी कराल.
Feb 08, 2025 - Mar 01, 2025
व्यक्तिगत आणि व्यावसायिक आघाडीवर अडथळे निर्माण होतील. कठीण परिस्थिती शांतपणे आणि चातुर्याने हाताळा कारण या कालावधीत घाई करून उपयोग नाही. प्रवास फार लाभदायी ठरणार नाही, त्यामुळे तो टाळावा. तुमच्या कुटुंबाकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळणार नाही. अपत्याशी निगडीत समस्या उद्भवतील. तुम्हाला नामोहरम करण्याची एकही संधी तुमचे शत्रू सोडणार नाहीत. थोडे धाडस दाखवा आणि तुमच्या योग्य निर्णयांना चिकटून राहा. पोटदुखीचा त्रास संभवतो.
Mar 01, 2025 - May 01, 2025
एखाद्या तीर्थक्षेत्राला भेट द्याल. तुमचं वागणं रोमँटिक आणि प्रभावशाली असेल आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या ओळखीच्या माणसांशी मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित करण्यास आणि ज्यांना तुम्ही ओळखत नाही, अशांशी संपर्क साधण्यास मदत होईल. तुमची थोडीफार इच्छापूर्ती होईल. म्हणजेच एखाद्या व्यवहारातून तुम्हाला आर्थिक लाभ होईल अथवा कामच्या ठिकाणी बढती मिळेल. वाहनखरेदी अथवा मालमत्तेची खरेदी कराल. एकूणच हा काळ अत्यंत अनुकूल असा आहे.
May 01, 2025 - May 19, 2025
काही अनपेक्षित समस्या उद्भवतील. नातेवाईकांशी सलोख्याचे संबंध ठेवणे इष्ट राहील. आरोग्याची तपासणी करणे आवश्यक आहे. दीर्घकालीन आजार संभवतो. जोडीदार आणि मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक अव्यवहार करू नका. वस्तुस्थिती पडताळूनच उद्योगातील व्यवहार करा. शरीरावर पुळ्या येण्याची शक्यता.
May 19, 2025 - Jun 19, 2025
हा तुमच्यासाठी अनुकूल कालावधी आहे. तुमच्या विचारांबाबत तुम्हाला विश्वास असेल आणि बढती मिळण्याची दाट शक्यता आहे. अचानक प्रवास संभवतो आणि हा प्रवास तुम्हाला फलदायी ठरेल. भावंडांकडून आणि जोडीदाराकडून आनंद मिळेल. तुमच्या भावांसाठीसुद्धा हा अनुकूल काळ आहे. जागा किंवा व्यवसाय बदलण्याचा विचार टाळा.
Jun 19, 2025 - Jul 10, 2025
या कालावधीत शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या धाडसी असाल. तुमच्या नातेवाईकांसाठी विशेषत: जोडीदारांसाठी हा अनुकूल कालावधी आहे. तुमच्या करिअरमध्ये तुम्ही प्रयत्न करू शकता कारण यश निश्चित आहे. भौतिक वस्तुंचा तुमच्या आयुष्यात समावेश होईल. तुमचे विरोधक यात अडथळे निर्माण करू शकणार नाहीत. या काळात तुमच्या इच्छा पूर्ण होतील. तुमचा विजय निश्चित आहे.
Jul 10, 2025 - Sep 03, 2025
या काळात तुम्ही धाडसी व्हाल आणि एका वेगळ्या उंचीवर पोहोचाल. वैवाहिक आयुष्यात आनंद लाभेल. प्रभावशाली व्यक्तींशी असलेले तुमचे संबंध वृद्धिंगत होतील. तुमचे शत्रु तुम्हाला सामोरे येऊ शकणार नाहीत. दूरचा प्रवास फलदायी ठरेल. शृंगारासाठी हा अत्यंत अनुकूल कालावधी आहे. कोणत्याही वादामध्ये तुमचा वरचष्मा राहील. आरोग्याच्या कुरबुरी राहतील. कौटुंबिक संबंध सलोख्याचे राहतील. तुमच्या मुलांसोबतचे संबंध मात्र काहीसे तणावपूर्ण असतील.
Sep 03, 2025 - Oct 21, 2025
अध्यात्मिक बाजूकडे लक्ष दिल्यास तुमच्या व्यक्तिगत इच्छा पूर्ण होतील आणि तात्विक बदल जो घडेल त्याचा थेट संबंध तुमच्या वाढीशी असणार आहे. तुम्ही जो अभ्यासक्रम शिकत होतात तो यशस्वीपणे पूर्ण कराल. तुमच्या आत जे काही बदल घडत आहेत, ते उघडपणे व्यक्त करण्याची हीच वेळ आहे. तुमचे तत्वे व्यक्तिगत पातळीवर आणि सामाजिक पातळीवर राबविण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुमचे बाह्यरूप सकारात्मक राहील आणि तुमचे शत्रू अडचणीत येतील. तुमच्या संकल्पना प्रत्यक्षात उतरवाल तेव्हा तुम्हाला आर्थिक लाभ होईल. तुम्ही सरकार आणि प्रशासनासोबत काम कराल आणि त्या कामात तुम्हाला यशही मिळेल. तुमच्या व्यापारात वृद्धी होईल आणि तुम्हाला कामात बढती मिळेल. कौटुंबिक सुख लाभेल.
Oct 21, 2025 - Dec 18, 2025
या कालावधीत तुमचे एकूणच वर्तन साधारण राहील. तुम्ही कामातून मिळणाऱ्या फायद्यापेक्षा कामाकडे अधिक लक्ष द्या. या काळात काही समस्या आणि काही आरोग्याचे मुद्दे उपस्थित होतील, ज्यांचा तुमच्या कामावर परिणाम होईल. आव्हाने आणि नव्या घटकांना काळजीपूर्वक हाताळणे गरजेचे आहे. नवीन प्रकल्प हाती घेणे पूर्णपणे टाळा. तुमचा जुळवून घेण्याचा स्वभाव आणि स्पर्धा यामुळे या काळात तुमच्यासमोर अडथळे निर्माण होतील. जमीन किंवा यंत्राची खरेदी काही काळ पुढे ढकला.