Samreen Kaur
Sep 07, 1999
16:23:2
Jammu
74 E 52
32 N 43
5.5
Kundli Sangraha (Bhat)
अचूक (अ)
एखाद्या वादाच्या दोन्ही बाजू जाणून घेण्यास तुम्हाला आवडते, त्यामुळे कायदा आणि न्यायक्षेत्र ही तुमच्यासाठी उत्तम कार्यक्षेत्रे असतील. कामगार मध्यस्थीचे एखादे पद तुम्ही चांगल्या प्रकारे भूषवाल आणि ज्या ठिकाणी शांतता आणि एकजूट राखायची असल्यास तुम्हाला पाचारण केले जाईल, असे क्षेत्र तुमच्यासाठी चांगले राहील. ज्या ठिकाणी ताबडतोब आणि सतत निर्णय घ्यावे लागतात, असे कार्यक्षेत्र निवडू नका, कारण तुम्हाल चटकन निर्णय घेणे कठीण जाते.
जिथे खूप परिश्रम घेण्याची आवश्यकता असेल किंवा खूप जबाबदारीचे काम असेल, त्या क्षेत्रासाठी तुमचे व्यक्तिमत्व योग्य नाही. तुम्हाला काम करण्यास हरकत नसते, उलट तुम्हाला ते आवडते पण त्यात खूप जबाबदारी नसावी. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे काम करायला आवडते पण जे काम सुसंस्कृत आणि स्वच्छ असेल त्या कामाकडे तुमचा जास्त कल आहे. ज्या कामात तुम्हाला एकांत आणि शांतता मिळणार असेल त्यापेक्षा ज्या कामात तुम्हाला प्रसन्नता मिळणार असेल त्या ठिकाणी काम करणे तुम्हाला अधिक पसंत आहे. वस्तुस्थिती ही आहे की, तुमचा स्वभाव शांत असला तरी वातावरणातील शांतता तुम्हाला सहन होत नाही आणि खुशाली आणि आनंदी वातावरणाची तुम्हाला अपेक्षा असते.
आर्थिक बाबतीत तुम्ही दूरदर्शी असाल आणि पैसे खर्च करताना तुमची मूठ झाकलेली असेल. भविष्याबाबत तुम्ही चिंता करणारे आहेत आणि यामुळेच तुम्ही तुमच्या भविष्यासाठी योग्य ती गुंतवणूक करून ठेवाल. तुम्ही जर उद्योगपती असाल तर तुम्ही लवकर निवृत्ती घ्याल. शेअर बाजाराबद्दल तुमचे अंदाज योग्य असतील. शेअर बाजारात तुम्ही भरपूर गुंतवणूक कराल. तुम्ही तुमच्या स्वतःच्या विचाराने चाललात तर तुम्ही निश्चितच यशस्वी व्हाल. तुम्ही दुसऱ्याच्या विचाराने गुंतवणूक केलीत किंवा अफवांवर विश्वास ठेवलात तर मात्र तुमचे नुकसान होईल.