सुरुवातीपासूनच तुम्हाला मोठ्या प्रमाणावर लाभ आणि संपत्ती मिळे. सट्टा, लॉटरी किंवा शेअर्समधून हा फायदा होईल. तुमच्या सगळ्या व्यवहारांसाठी मित्र आणि शुभचिंतकांची मदत आणि सहकार्य मिळे. उद्योगात केलेल्या व्यवहारातून तुम्ही चांगला आर्थिक नफा कमवाल. तुम्हाला हुद्दा आणि प्रतिष्ठा प्राप्त होईल. तुम्हाला लोकांकडून आदर मिळेल आणि या काळात तुम्ही रुचकल जेवणाचा आस्वाद घ्याल.
Nov 15, 2024 - Dec 06, 2024
कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याच्या तक्रारींमुळे तुम्ही चिंताग्रस्त राहाला. प्रवासाचा काही लाभ होणार नसल्याने तो शक्यतो टाळा. नाहक खर्चाची शक्यता असल्याने या संदर्भात काळजी घ्या. मित्र आणि सहकाऱ्यांशी सांभाळून वागा. तुमची निर्णय घेण्याची आणि तरतमभाव जाणण्याची क्षमता काही प्रसंगी क्षीण होईल. आग किंवा महिलेमुळे जखम होण्याची शक्यता. या काळात हृदयविकार संभवतो, त्यामुळे त्या दृष्टीने काळजी घ्या.
Dec 06, 2024 - Jan 30, 2025
एखाद्या नवीन क्षेत्रात तुम्ही प्रयत्न करायचे ठरवले तरी त्यातून नुकसान होण्याची शक्यता आहे कारण खर्च वाढेल आणि त्या खर्चाचे रूपांतर नंतर उत्पन्नात होण्याची शक्यता नाही. शत्रू समस्या निर्माण करतील आणि कायदेशीर संकटात सापडू शकाल. तुम्ही तुमच्या कामातच व्यस्त राहाल, तुमच्या बाह्यरूपातही स्थैर्य असाल. लघु मुदतीसाठी आर्थिक लाभ होऊ शकेल. मध्यम आणि दीर्घकालीन प्रकल्प सुरू करावेत. डोळ्यांशी संबंधित समस्या उद्भवतील. विरुद्ध लिंगी व्यक्तीसोबतची मैत्री फार सलोख्याची नसेल. झटपट पैसा कमविण्याच्या मार्गांची शहानिशा करणे गरजेचे आहे. तुमच्या प्रियकर अथवी प्रेयसीच्या आयुष्यात समस्या निर्माण होऊ शकतात.
Jan 30, 2025 - Mar 20, 2025
तुमच्या व्यक्तिगत इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला इतरांची मदत मिळेल. तुमच्याकडे आर्थिक आवक निश्चितच वाढेल आणि त्यामुळे व्यक्तिगत विश्वास, स्वप्न आणि तत्वे यावर निश्चितच प्रभाव पडेल. तुमच्या लायकीनुसार तुम्हाला सरकार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ओळख मिळेल. तुमचा मैत्रीपूर्ण स्वभाव आहे आणि विविध प्रकारचे सामाजिक भान असलेल्या माणसांचा सहवास तुम्हाला आवडतो. आरोग्याच्या तक्रारीमुळे तुम्हाला थोडासा मनस्ताप होईल. बाह्यरूपातील बदलापेक्षा व्यक्तिमत्वातील परिवर्तन अधिक महत्त्वाचे असते.
Mar 20, 2025 - May 17, 2025
हा तुमच्यासाठी फार समाधानकारक काळ नाही. अचानक आर्थिक नुकसान संभवते. याचिका किंवा वादामुळे आर्थिक तोटा सहन करावा लागेल. प्रयत्न अयशस्वी ठरल्यामुळे तुम्ही त्रासिक व्हाल. कामाचा दबाव खूप असल्यामुळे प्रचंड कष्ट करावे लागतील. कुटुंबातही तणावपूर्ण वातावरण असेल. हा कालावधी फार अनुकूल नसल्याने व्यवसायात फार धोका पत्करू नका. तुमचे शत्रू तुमची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करतील. आर्थिक नुकसान संभवते.
May 17, 2025 - Jul 07, 2025
अनेक अडचणी आणि कष्टप्रद काळानंतरचा हा काळ खूप चांगला आहे आणि अखेर तुम्ही थोडीशी विश्रांती घेऊ शकता आणि यशाची चव चाखू शकता आणि या आधी जे कष्ट केलेत त्याचे झालेले चीज उपभोगू शकता. शंकास्पद सट्टेबाजीचे व्यवहार टाळलेत तर आर्थिक बाबतीत तुमचे नशीब उत्तम असेल. प्रवासात चांगले मित्र मिळतील. राजकीय आणि महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींशी जवळीक वाढेल. तुमच्या कुटुंबात मुलाचा जन्म होईल.
Jul 07, 2025 - Jul 29, 2025
हा तुमच्यासाठी संमिश्र घटनांचा काळ असेल. या काळात तुम्हाला मानसिक त्रास आणि तणाव जाणवेल. व्यावसायिक भागिदारांमुळे तुमच्यासमोर समस्या उभ्या राहतील. आर्थिक दृष्ट्या हा काळ तुमच्यासाठी फार बरा नाही. प्रवास फार फलदायी ठरणार नाही. धोका पत्करू नका. तुमच्या जवळच्या माणसांशी वाद होतील, त्यामुळे अशा प्रकारची परिस्थिती उद्भवणार नाही, याची काळजी घ्या. प्रेमाच्या संदर्भातही हा काळ फारसा अनुकूल नाही. नात्यांसंबंधात अत्यंत काळजी घ्या. तसे न केल्यास तुम्ही आदर गमावून बसाल.
Jul 29, 2025 - Sep 28, 2025
तुमच्या समोरील आव्हानांवर मात करण्यासाठी तुम्ही नव्या कल्पना लढवाल. व्यवहार अत्यंत सुरळीत आणि सहज पार पडतील कारण तुम्ही तुमच्या स्पर्धकांच्या एक पाऊल पुढे असाल. एकाहून अधिक स्रोतांमधून तुम्हाला उत्पन्न मिळेल. तुमचे क्लाएंट्स, सहकारी आणि इतर संबंधित व्यक्ती यांच्याशी असलेले तुमचे संबंध सुधारतील. तुम्ही या काळात काही चैनीच्या वस्तू विकत घ्याल. एकूणातच हा काळ तुम्हाला उत्पन्न मिळवून देणारा असेल.
Sep 28, 2025 - Oct 16, 2025
काही अनपेक्षित समस्या उद्भवतील. नातेवाईकांशी सलोख्याचे संबंध ठेवणे इष्ट राहील. आरोग्याची तपासणी करणे आवश्यक आहे. दीर्घकालीन आजार संभवतो. जोडीदार आणि मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक अव्यवहार करू नका. वस्तुस्थिती पडताळूनच उद्योगातील व्यवहार करा. शरीरावर पुळ्या येण्याची शक्यता.
Oct 16, 2025 - Nov 15, 2025
आर्थिक लाभ मिळविण्यासाठी हा उत्तम कालावधी आहे. काही अनपेक्षित चांगल्या घटना घडू शकतात. या कालावधीत अनेक कौटुंबिक कार्यक्रमही संभवतात. हा तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल कालावधी आहे. महिलांकडून आणि तुमच्या वरिष्ठांकडून लाभ होण्याची शक्यता. आर्थिक बाबींचा विचार करता हा कालावधी फलदायी ठरणार आहे.