सिकंदर खेर
Oct 31, 1981
12:0:0
Mumbai
72 E 50
18 N 58
5.5
Unknown
खराब डेटा
तुमच्या आयुष्यात प्रेम लवकर येईल आणि जेव्हा ते येईल तेव्हा ते उत्कट असेल. पण एखादी मोठी ज्योत पटकन विझते तसे तुम्ही अंतिम निर्णय घेण्याआधीच प्रेमातून बाहेर पडाल. लग्न लवकर होणार नाही, पण जेव्हा ते होईल तेव्हा ते आनंदी असेल.
तुमची प्रकृती उत्तम आहे. तुमच्यात सळसळते चैतन्य आहे आणि तुम्ही व्यायाम करत राहिलात तर अगदी उतारवयापर्यंत ते तसेच राहील. पण यात काहीसा अतिरेक होऊ शकतो. तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त व्यायाम केलात तर तुमच्या श्वसनेंद्रियांवर परिणाम होईल आणि तुम्हाला फुफ्फुसाचा त्रास होऊ शकतो. वयाच्या पंचेचाळीशीनंतर तुम्हाला सायटिका किंवा संधिवाताचा त्रास होण्याची शक्यता आहे. याची कारणे शोधणे कठीण असेल, पण याची कारणेच शोधायची झाली तर रात्रीच्या हवेत खूप फिरल्यामुळे असे घडण्याची शक्यता आहे.
वाचन, चित्रकला, नाटक आणि अशा प्रकारचे मनोरंजन जे कलापूर्ण किंवा साहित्यिक अनुभव देत असेल ते तुमच्या मनात भरेल. तुम्हाला अचानक अध्यात्माची किंवा अद्भूत गोष्टींचे आकर्षण वाटायला लागले तर त्यात आश्चर्य वाटायला नको. कोणत्याही प्रकारचा प्रवास तुम्हाला आवडतो. क्रिकेट आणि फुटबॉलसारख्या खेळांसाठी तुम्ही फार कमी वेळ खर्च कराल. टेबल टेनिस, कॅरम आणि बॅडमिंटनसारखे इनडोअर खेळ खेळणे तुम्हाला आवडते.