सुरेंद्र सिंह बघेल
Mar 17, 1977
12:0:0
Baroda
73 E 13
22 N 18
5.5
Unknown
खराब डेटा
तुम्ही कार्यालयीन राजकारण शक्य तेवढे टाळता आणि इच्छित पद मिळविण्यासाठी इतरांशी भांडण करणे तुम्हाला पसंत नाही. त्यामुळे तुम्ही असे कार्यक्षेत्र निवडा जिथे तुम्हाला एकट्याला काम करता येईल, तुमचे स्वतःचे काम करता येईल आणि तुमच्या वेगाने काम करता येईल. उदा. लेखन, चित्रकला, कम्प्युटर प्रोग्रॅमिंग इत्यादी.
ज्या कामात नियमित आणि बुद्धिचा वापर करून पुढे वाटचाल करावी लागत असेल, ते कार्यक्षेत्र तुम्हाला समाधान, विशेषतः मध्यम आणि उतारवयात समाधान मिळवून देईल. तुमची निर्णयक्षमता चांगली आहे आणि तुम्ही जे करता ते परिपूर्ण करता. तुम्हाला शांतपणे काम करण्यास आवडते. घाई-गडबड तुम्हाला पसंत नाही. तुम्ही पद्धतशीर काम करता आणि तुमचा स्वभाव शांत असल्यामुळे तुम्ही एखाद्या अधिकारपदावर काम करता आणि तुमच्या हाताखाली काम करणाऱ्यांची विश्वास तुम्ही संपादन कराल. तुमच्यात आर्थिक क्षेत्रात नेतृत्व गाजविण्याची क्षमता आहे त्यामुळे तुम्ही बँकिंग क्षेत्रात, वित्त कंपनीत किंवा स्टॉक ब्रोकर (शेअर दलाला) म्हणून उत्तम काम करू शकाल. फक्त ते कार्यालयीन काम तुमच्या स्वभावाला साजेसे असणे आवश्यक आहे.
आर्थित परिस्थिती ही तुमच्या विरुद्ध असेल. तुम्हाला कधी कधी नशीबाची पूर्ण साथ मिळेल तर कधी कधी परिस्थिती एकदम उलट असेल. तुम्ही कोणत्याही प्रकारच्या सट्ट्यापासून किंवा जुगारापासून दूर राहा आणि उधळपट्टीवर नियंत्रण ठेवा. आर्थिक बाबतीत तुम्हाला बरेचदा विलक्षण आणि अनिश्चित परिस्थितीला सामोरे जावे लागते. तुम्हाला त्यातून पैसा मिळेल पण तुमच्याकडे तो सदैव राहणार नाही. तुमच्या कल्पना काळाच्या पुढच्या असतात. तुम्ही सट्टेबाजाराकडे आकर्षिले जाल आणि एक नियम म्हणून तुम्ही नेहमी मागे पडलेल्या घटकावर पैसा लावाल. इलेक्ट्रिक शोध, वायरलेस, रेडिओ, टीव्ही, चित्रपट आणि आगळ्यावेगळ्या इमारती किंवा बांधकाम, साहित्य किंवा अत्यंत कल्प रचना याबाबतीत तुम्हाला उत्तम संधी आहे.