शत्रू किंवा विरोधक तुम्हाला सामोरे जाण्याचा विचारही करणार नाहीत. कायदेशीर प्रकरणे तुमच्या बाजूने असतील. आर्थिक बाबतीत तुम्हाला नाव, लोकप्रितयता, फायदा आणि यश मिळेल. भाऊ आणि नातेवाईकांकडून सहकार्य मिळेल. तुम्ही तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भेट द्याल आणि लोकांकडून मदत घ्याल. तुम्ही केलेल्या कष्टांना आणि प्रयत्नांना यश मिळेल.
Nov 28, 2025 - Jan 15, 2026
या वर्षात कौटुंबिक आणि व्यावसायिक पातळीवर केलेल्या भागिदाऱ्या तुम्हाला फायदेशीर ठरतील. तुम्ही ज्या बदलाची इतकी वर्ष वाट पाहत होतात, तो बदल या वर्षात घडून येईल. तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडाल आणि तुमचे पालक, भावंड आणि नातेवाईकांशी तुमचे अत्यंत जवळचे संबंध राहतील. संवाद आणि वाटाघाटी तुमच्या बाजूने राहतील आणि तुम्हाला नवीन संधी प्राप्त करून देतील. व्यवसाय आणि कामाच्या निमित्ताने वारंवार प्रवास होईल. तुम्ही कदाचित हिरे, दागिने यांची खरेदी कराल.
Jan 15, 2026 - Mar 14, 2026
तुमच्यातून वाहणाऱ्या उर्जेमुळे तुम्ही अनेकांना स्वत:कडे आकृष्ट कराल. तुमचे शत्रू तुम्हाला सामोरे येण्याचे धाडस करणार नाहीत. आर्थिक दृष्ट्या हा उत्तम काळ आहे. कामाच्या ठिकाणी असलेले सहकारी, मित्र आणि कुटुंबीय यांच्याशी चांगले संबंध ठेवण्याचे नवे मार्ग तुम्ही शिकाल. तुमचे संवाद कौशल्या विकसित केल्यामुळे, स्वत:शी व स्वत:च्या गरजांशी प्रामाणिक राहिल्यामुळे तुम्ही या काळात चांगला मोबदला मिळवाल. तुमच्या नोकरीच्या ठिकाणची परिस्थिती नक्की सुधारेल. तुमच्या सहकाऱ्यांकडून तुम्हाला हर प्रकारे मदत मिळेल. तुम्ही जमीन किंवा काही यंत्रांची खरेदी कराल. आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
Mar 14, 2026 - May 05, 2026
या वर्षी तुमच्या नशीबात भरपूर कष्ट आहेत, परंतु, त्याचा चांगला मोबदला मिळेल. तुमची काम करण्याची तयारी असलेले तर त्याचा निश्चित तुम्हाला फायदा होणार आहे. कुटुंबियांचे सहकार्य़ मिळेल. या काळात तुम्हाला प्रसिद्धीसुद्धा मिळेल. तुम्ही व्यावसायिक पातळीवर खूप प्रगती कराल. तुम्ही तुमच्या विरोधकांवर विजय मिळवाल. तुम्ही नवा व्यवसाय स्वीकाराल, नवीन मित्र कराल. तुमचे सगळ्यांशीच सलोख्याचे संबंध राहतील.
May 05, 2026 - May 26, 2026
वरिष्ठ आणि प्रभावशाली व्यक्तींकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. व्यावसायिक पातळीवर तुम्ही प्रगती कराल. कुटुंबियांकडून सहकार्य मिळेल. तुमच्यापासून दूर असणाऱ्या किंवा परदेशात असणाऱ्या व्यक्तींकडून सहकार्य मिळेल. तुमची कष्ट करण्याची तयारी असेल तर त्या कष्टाचे चीज होण्यासाठी हा अत्यंत अनुकूल काळ आहे. तुम्ही फार प्रयत्न न करताही तुम्हाला अनेक संधी मिळतील. सामाजिक वर्तुळात तुम्हाला आदर आणि सन्मान मिळेल. तुम्ही नवीन घराचे बांधकाम कराल आणि सगळ्या प्रकारचा आनंद लुटाल.
May 26, 2026 - Jul 26, 2026
तुम्ही एखादा नवीन प्रकल्प सुरू करण्याचा किंवा योजना राबविण्याचा विचार करत असाल तर नशीब तुमच्या बाजूने असेल. तुमच्या कारकीर्दीतही प्रगती होईल. तुमची काम करायची तयारी असेल तर हा तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल कालावधी आहे. तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी कराल आणि हुशारीने गुंतवणूक कराल. विरुद्ध लिंगी व्यक्तींचा सहवास लाभेल. तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून मिळणाऱ्या सहकार्यात वाढ होईल. चविष्ठ आणि उंची जेवणाप्रती तुमची चव विकसित होईल. घरी एखादे स्नेहभोजन होण्याची शक्यता आहे.
Jul 26, 2026 - Aug 13, 2026
घराकडे फार दुर्लक्ष न करता, अधिक लक्ष द्या आणि काळजी घ्या. कौटुंबिक समस्या आणि त्यातून निर्माण होणार तणाव यांच्याशी जुळवून घेणे कठीण जाईल. कुटुंबात मृत्यूची शक्यता आहे. आर्थिक आणि मालमत्तेच नुकसान संभवते. आर्थिक व्यवहारांबाबत सतर्क राहा. घसा, तोंड आणि डोळ्यांचे विकार संभवतात.
Aug 13, 2026 - Sep 13, 2026
तुमच्या योजना कार्यान्वित करण्यासाठी हा अत्यंत योग्य समय आहे. वैवाहिक सुखासाठी ही ग्रहदशा अत्यंत अनुकूल आहे. आध्यात्मिक जगाचे दरवाजे तुमच्यासाठी उघडतील, परंतु तेथील संधींचा लाभ घेण्याआधी काही तयारीची आवश्यकता आहे. तुम्ही अपत्यप्राप्तीची अपेक्षा करत असाल तर सुरक्षित प्रसूती होईल. तुमच्या लिखाणाची प्रशंसा होईल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक यश मिळेल आणि त्यात तुम्ही पुढे जाल. या काळात अपत्यप्राप्तीची, विशेषत: कन्यारत्न प्राप्त होण्यीच शक्यता आहे.
Sep 13, 2026 - Oct 04, 2026
आर्थिक लाभ होण्यासाठी हा कालावधी अनुकूल नाही. तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू संभवतो. कौटुंबिक वादामुळे तुमची मन:शांती ढळण्याची शक्यता आहे. तुम्ही वापरलेल्या कठोर शब्दांमुळे तुम्ही गोत्यात याल. उद्योगाशी संबंधित एखादी वाईट बातमी मिळू शकते. मोठे नुकसान संभवते. आरोग्याच्या तक्रारी तुम्हाला अस्वस्थ करण्याची शक्यता आहे.
Oct 04, 2026 - Nov 28, 2026
हा तुमच्यासाठी फार अनुकूल कालावधी नाही. तुमचे शत्रू तुमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करतील. फायदा मिळवून न देणारे काम करावे लागेल. अचानक नुकसान संभवते. तुमची काळजी घ्या आणि अन्नातून होणाऱ्या विषबाधेमुळे पोटाचे विकार संभवतात. हा अनुकूल काळ नसल्यामुळे कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू नका. मित्र आणि नातेवाईकांशी लहान-सहान मुद्यांवरून वाद होतील. मोठ् निर्णय घेऊ नका. तुम्हाला एखाद्या अशा कामात गुंतावे लागेल, ज्याचा तुम्हाला काहीच फायदा होणार नाही.