शत्रू किंवा विरोधक तुम्हाला सामोरे जाण्याचा विचारही करणार नाहीत. कायदेशीर प्रकरणे तुमच्या बाजूने असतील. आर्थिक बाबतीत तुम्हाला नाव, लोकप्रितयता, फायदा आणि यश मिळेल. भाऊ आणि नातेवाईकांकडून सहकार्य मिळेल. तुम्ही तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भेट द्याल आणि लोकांकडून मदत घ्याल. तुम्ही केलेल्या कष्टांना आणि प्रयत्नांना यश मिळेल.
Nov 1, 2025 - Dec 23, 2025
उत्पन्न आणि बँक बॅलेन्समध्ये वाढ होईल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा चांगला काळ आहे. या परिवर्तनाच्या काळात नवीन मित्र आणि नाती जोडली जातील आणि त्यांच्यापासून तुम्हाला लाभ होईल. पूर्वीच सुरू केलेले काम आणि नव्याने सुरू केलेल काम याचा तुम्हाला हवा तसा निकाल मिळेल. तुमच्या इच्छापूर्तीचा हा काळ आहे. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू कराल किंवा नवीन करार होतील. वरिष्ठ पदावरील आणि प्रभावशाली व्यक्तींकडून सहकार्य मिळण्याची अपेक्षा आहे. सर्वांगीण समृद्धी या काळात लाभेल. तुमच्या जोडीदाराशी असलेल्या नात्याची अधिक काळजी घ्यावी लागेल.
Dec 23, 2025 - Jan 13, 2026
या काळात तुम्ही धार्मिक कार्य कराल आणि तुमची वागणूक चांगली असेल. तुम्ही धर्म आणि अध्यात्म यात रुची घ्याल. या वर्षी खासगी आणि व्यावसायिक आयुष्यात तुम्हाला भागिदारी लाभदायी ठरेल. महत्त्वाचे म्हणजे इतकी वर्षे तुम्ही ज्या आयुष्य बदलून टाकणाऱ्या बदलाची वाट पाहात होतात, तो बदल आता घडणार आहे. या काळात तुम्हाला अधिकार प्राप्त होईल. कामाच्या ठिकाणी, मित्रांसमवेत आणि कुटुंबियांशी चांगले संबंध कसे ठेवावेत याबाबत तुम्ही नवीन धडे घेत आहात. कौटुंबिक वर्तुळात आनंद असेल.
Jan 13, 2026 - Mar 15, 2026
एखाद्या तीर्थक्षेत्राला भेट द्याल. तुमचं वागणं रोमँटिक आणि प्रभावशाली असेल आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या ओळखीच्या माणसांशी मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित करण्यास आणि ज्यांना तुम्ही ओळखत नाही, अशांशी संपर्क साधण्यास मदत होईल. तुमची थोडीफार इच्छापूर्ती होईल. म्हणजेच एखाद्या व्यवहारातून तुम्हाला आर्थिक लाभ होईल अथवा कामच्या ठिकाणी बढती मिळेल. वाहनखरेदी अथवा मालमत्तेची खरेदी कराल. एकूणच हा काळ अत्यंत अनुकूल असा आहे.
Mar 15, 2026 - Apr 02, 2026
स्वत:ला व्यक्त करण्यासाठी आणि सृजनशील क्षमतांचा वापर करण्यासाठी हा अनुकूल समय आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी आणि व्यावसायिक आयुष्यात अनपेक्षित बदल घडण्याची शक्यता आणि हे बदल तुमच्यासाठी लाभदायी ठरणार आहेत. वरिष्ठ आणि अधिकारी वर्गाची कृपादृष्टी राहील. तुमच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक आयुष्यात सकारात्मक बदल घडेल. वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता. या कालावधीत तुम्ही निश्चितपणे यशस्वी व्हाल आणि तुमची इच्छापूर्ती निश्चित होईल.
Apr 02, 2026 - May 03, 2026
आर्थिक लाभ मिळविण्यासाठी हा उत्तम कालावधी आहे. काही अनपेक्षित चांगल्या घटना घडू शकतात. या कालावधीत अनेक कौटुंबिक कार्यक्रमही संभवतात. हा तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल कालावधी आहे. महिलांकडून आणि तुमच्या वरिष्ठांकडून लाभ होण्याची शक्यता. आर्थिक बाबींचा विचार करता हा कालावधी फलदायी ठरणार आहे.
May 03, 2026 - May 24, 2026
वरिष्ठांकडून किंवा प्रभावशाली व्यक्तिमत्वांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. व्यावसायिक पातळीवर तुम्ही चांगली प्रगती कराल. कारकीर्दीमध्ये आणि कौटुंबिक पातळीवर तुम्हाला अधिक जबाबदारी घ्यावी लागेल. तुमच्या कार्यालयीन कर्तव्याच्या/ प्रवासाच्या दरम्यान तुमची ज्या व्यक्तींशी भेट होईल, त्यांच्यातर्फे तुम्हाला चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही अगदी मौल्यवान हिऱ्यांसारखे असाल. तुमच्या मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे, कारण या काळात ती फार नाजूक असतील.
May 24, 2026 - Jul 18, 2026
नवीन प्रकल्प किंवा मोठी गुंतवणूक टाळावी. व्यावसायिक म्हणून काम करत असाल तर हे वर्ष साधारणच राहील. नियमित अडथळे जाणवतील आणि साधारण वाढ होईल. निश्चित अशा प्रगतीसाठी वाट पाहावी लागेल. अस्थैर्य आणि संशयास्पद समय आहे. कोणताही बदल करू नका कारण तो तुम्हाला घातक ठरेल. या काळात तुमची पत काहीशी घसरेल. घरचा विचार करता काही असुरक्षितता जाणवेल.
Jul 18, 2026 - Sep 04, 2026
तुमच्या आरोग्याबाबत तुमचे सजग असणे, आरोग्याची काळजी घेणे आणि गरजा पुरवणे यामुळे तुमची उर्जा अधिक चांगल्या प्रकारे तुम्ही वापरू शकता, कदाचित एखाद्या मैदानी खेळात भाग घेणे उचित ठरेल. तुमच्या उर्जेमुळे तुम्हाला अनेकांचे सहकार्य मिळेल. तुमच्या आनंदात आणि यशात तुमच्या जोडीदाराचा सहभाग असेल. कामाच्या ठिकाणी तुम्ही नेतृत्व स्वीकारावे, यासाठी तुम्हाला पाचारण करण्यात येईल. तुम्हाला आदर-सन्मान मिळेल आणि तुम्ही प्रसिद्ध व्हाल.
Sep 04, 2026 - Nov 01, 2026
नशीबाची साथ आणि मानसिक स्थैर्य यामुळे तुमचे गृहस्थ जीवन सकारात्मक राहील. पत्नीच्या माध्यमातून लाभ होईल. प्रवास, उच्चशिक्षण, संवाद, नवीन उद्योगाची सुरुवात, व्यवसाय या दृष्टीने हे वर्ष अत्यंत अनुकूल आहे. या कालावधीत सगेसोयरे आणि नातेवाईक यांच्याशी वाद होतील आणि कदाचित शत्रुत्वही निर्माण होईल. व्यावसायिकदृष्ट्या तुम्हाला चांगले निष्कर्ष मिळतील. एकूणातच हा काळ अत्यंत अनुकूल असेल.